Avatar
About हिमगौरी कर्वे
मी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.

लाटांवर लाटा उसळती

लाटांवर लाटा उसळती, तुषारांचे बनती मोती, अथांग सागराच्या ह्या, सुंदरतेची काय गणती,–!!! निळेशार पसरलेले पाणी, दूरवर क्षितिजी पोहोचलेले, जितके विस्तीर्ण तितुके, सखोल आत गेलेले,–!!! एक लाट उठता उठतां, दुसरी उभी टाके, टक्कर दोघींची होता, पाणलोट होती जागे,–!!! रत्नाकराची दुनिया, सारी अजब किती, पारणे फिटे डोळ्यांचे, तृप्त होतसे दीठी,–!!! थेंबांचे मोती उधळतो, तो रात्रंदिवसा, किंमत नसे त्याची, […]

हे परमेश्वरा.. हे परमेश्वरा

(मुक्तछंदात्मक) थोडा वाकून पहा खाली, काय चाललंय या पृथ्वीतली, सत्ता, लत्ता, अधिकार, पैसा, यामधून एवढा माततो का कुणी,-? जनावरे बरी म्हणायची पाळी, संकेत, भाषा, सभ्यता, निष्ठा, कशी पाळतात ती सारी,–!!! समूहनियम, कर्तव्येही माहित, अधिकाराचे बडगे दाखवत नाहीत, नुसतीच माणुसकीचा आंव आणून,—- पैसा इतका प्रिय असावा की, म्हाताऱ्या आई-बापांनी जावे वृद्धाश्रमी, खस्ता जराही आठवत नाहीत, त्यांनी भोगलेल्या; […]

मुक्तछंद…..

थोडंसं झुकून माझ्या डोळ्यांवर , तुझ्या पापण्या ठेव,— त्यांच्यातील ओलावा घे टिपून, अलगद हृदयापर्यंत थेट,— जखमी मनाला असा दिलासा, तूच देऊ शकशील बघ, घायाळ मनाची करूण व्यथा, तुलाच फक्त समजेल,—!!! त्यातली शल्यें, टोंच, बोंच, त्यातला सगळा आक्रोश, तुझ्यापर्यंतच ना पोहोचेल,-? रक्ताळलेला तो प्रत्येक अश्रू , बघण्याची, पुसण्याची कुवत,— तुझीच असते नेहमीच,—!!! त्या दुःखाला जीवघेण्या, सुखात करतोस […]

लेक चालली सासरी

लेक चालली सासरी, डोळ्यांच्या कडा पाणावल्या, आज निघाली आपल्या घरी, तिच्याही पापण्या ओलावल्या,–!! काळीज तिचे धपापे, अंतर्नाद ऐकू येती, उलघालीचे स्वर बोलके, थेट कानास बघा भिडती,–!!! बदलले जीवन सारे, मांडेल नवीन संसारा, मने आमुची कृतार्थ झाली, लेक निघता त्या घरा,–!!! जावई समजूतदार ते, सासू सासरे सूज्ञ असती, लेकी सुनांनी घर भरले, एकत्र कुटुंब म्हटल्यावरती,–!!! माणूस म्हटल्यावर […]

पाहताना तुला पावसाळी

पाहताना तुला पावसाळी, थेंबा–थेंबानी जादू पसरे, तनी मनी प्रीत ओघळती, रोमारोमात प्रेमगंध उधळे,–!!! बरसताना मेघ गडगडाटी, विद्युल्लता कशी उचंबळे, जिवलगाची ओढ केव्हाची, मिटल्या ओठी यौवन उन्मळे,–! सर येता मोठी पावसाची, अणू रेणू ओलाचिंब करे, भिजण्यातही रूक्षपणा भारी, जोवर नाही आपण सामोरे,–!!! सर्द हवा कशी ओली, मनातलेही काहूर तसे,– अवचित तुझी मूर्त पाहिली, हृदयी, कारंजे उडत असे,–!!! […]

विचार आतला…

विचार आतला, काळोख दाटला, उजळत्या घरां, आत्मा पाहिला,–!!! चिंता दु:खे, बोचरी सुखे, विलक्षण खंता, हृदयाला भिडतां,–!!! मी तूपणा गळतां, अंतरात्मा छळता, प्राणातील परमात्मा, मोक्ष मागतां,–!!! जीव सुटेना, कर्मात,भोगात, अडकून राहिला, दार उघडतां,–!!! मुक्काम बदलतां, नसते हातां, व्यथा हृदयां, जिवा छळतां,–!!! स्वर्ग-नरक, कल्पना नुसत्या, माणसांच्या वस्त्या, नकोशा-नकोशा,–!!! © हिमगौरी कर्वे

पण आणि परंतु….

पण आणि परंतु, मध्ये सारखे येती, निर्माण करती किंतू , जीवनही ते बिघडवती –!!! गोष्ट कुठली सरळ , आयुष्यात होत नाही, प्रत्येकाचे त्यांच्यावाचून , पदोपदी अडत राही,–!!! सुख– दु:खांची असो भेळ, असो अडसर भोवती, मार्ग नसण्यात निव्वळ चोख भूमिका निभावती,–!!! ते नसते तर आयुष्याची, मग न्यारी नसती कुठली गंमत, त्यांच्याशिवाय भाषा अडतसे, सतत सारखी केव्हाही अविरत,–! […]

कितीही वर गेला तरी, पतंगाला ठाऊक असते….

कितीही वर गेला तरी, पतंगाला ठाऊक असते, उतरायचे जमिनीवरी, कधीतरी ते होणार असते,–!!! उंच — उंच झोके घेऊनी, उडत राहतो निळ्या आभाळी, त्याचाच सारखा वेध घेत, स्वारी वर कशी पोहोचते,–!!! उंच, उदंड त्या गगनी, सुखद गारव्याची मजा असते, इकडून तिकडे विहरत राहून, धुंदी कशी पहा चढते,–!!! जमीन भासे अगदी छोटी, तुच्छ सारी दुनिया वाटते, लाथ मारून […]

उत्फुल्ल झाली जास्वंद

उत्फुल्ल झाली जास्वंद, केवढी ही तिची मिजास,-? वाऱ्यावर उठते डंवरून, झाडाभोवती जशी आरास,–!!! लालचुटुक रंग तिचा, जिवाचा आपल्या ठांव घेई, टपोरे फुलते फूल जसे, फांदीवर झोके घेई,–!!! सुंदर रंगसंगती केवळ, निसर्गराजाचाच वास, कुठलाही ना तिला गंध, तरीही भासे जणू खास,–!!! आखीव रेखीव पाकळ्या, गडद रंगी उमललेल्या, भुंगे अधीर पराग टिपण्या, इतक्या पहा मुसमुसलेल्या,–!!! बिंदू छोटे पिवळे […]

पाण्यात सोडल्यावर, पिल्लू कसे पळाले..

पाण्यात सोडल्यावर, पिल्लू कसे पळाले, भय भीती ना डर, लाटांशी खेळत निघाले,—!!! समुद्री उठे लाट, अलगद पायात येते, तिलाच खेळणे समजून, पिल्लू नाचत राहते,—–!!! क्षणभर बावरून, एकदा वळून बघते, टाकत पुढे आपले पाय, घराकडे कसे निघते,—!!! फेसाळत आता समोर, समुद्र स्वागत करे, जणू लेकरू बघून, आनंद गगनी न मावे,—!!! तो असीम अथांग, अपार, पिल्लाला धाशत नसे, […]

1 2 3 4 5 6 19