Avatar
About हिमगौरी कर्वे
मी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.

स्वागत नववर्षाचे करत

स्वागत नववर्षाचे करत, सुखदुःखांच्या संकल्पना, आज नवीन दिन उगवला, प्रार्थित अजोड नव- अरुणां,–!!! कल्पना सुखाच्या करत, दुःखांचे डोंगर मागे सोडा, साजरा करत आनंद, समर्थ होऊनी खडे रहा,–!!! काय दडले काळाच्या पोटात, तोंड उन -पावसा देण्यां, सिद्ध असतो हरेक माणूस, संकटावरती मात करण्यां,—!!! काय शिकवी गतकाळ, सुधाराव्यात आपल्या चुका, नियतीचे जे होती लक्ष्य, त्यांना हात द्यावा नेमका,—!!! […]

विश्व सारे निर्मिलेस

विश्व सारे निर्मिलेस,काय असावे तुझ्या मनात, हेतू असावा का निरलस, खेद वाटे आज अंतरात,—!!! ग्रह गोल ब्रम्हांड तारे, निसर्ग चराचर वारे, आज दिसती सारे भोगत, सातत्याने जणू दिनरात,–!!! प्रदूषणे पृथ्वीला घेरत, मनुष्यप्राण्यात फक्त स्वार्थ, अहंकार कधी न जात, सांग ठेवले काय दुनियेत,–? लतावेली, झाडेझुडपे, सगळे दुःखी प्राणिजात, समस्या सगळ्या या वेढत, अशात तू काय मिळवलेस,–? पसारा […]

माती असशी मातीत मिळशी….

माती असशी मातीत मिळशी, हे तत्वच आहे सृजनी,— दया करुणा उपकार करिती,— तेच होती विलीन पांडुरंगी*–!!!! © हिमगौरी कर्वे

मराठमोळे सौंदर्य तुझे

प्रख्यात अभिनेत्री “स्मिता पाटील”, यांचा काल स्मृतिदिन झाला त्यानिमित्त,—!!! मराठमोळे सौंदर्य तुझे, टपोरे हसरे डोळे, चेहऱ्यावरती भाव झरती, आविर्भावही बोलके ,–!!! चाफेकळी नाक तुझे, सामान्यातील नायिका तू , अवघ्याच स्त्रीजातीला, अभिमानास्पद वाटलीस तू ,–!!! अभिनयातील शिखर गाठले, कर्तृत्वाने आगळे वेगळे, सामाजिक भान जपले, ते तर आणखी निराळे,–!!! स्त्रीत्वाच्या अस्मिता सगळ्या, नारी तितक्या परि,-साकारल्या , असामान्य कलेनेच […]

सुरां – सुरांचे गीत व्हावे

सुरां – सुरांचे गीत व्हावे, अर्थवाही शब्दातुनी, भावनांची गोड पखरण, मंजुळ तराणे नादातुनी,–!!! काळजाचा ठांव घेत असे, स्वाभाविक त्या गानातुनी, आलापातुनी अगदी अल्लद , स्वर्गीय गान निर्मितसे,–!!! शब्द होती जिवंत केवढे, संगीत वाहते निर्झरापरी, सुरेल बनत आरोह अवरोह, अंतिम ते हृदयस्पर्शी गाणे,–;!! सूर लागता भान हरपतसे डोहातून त्या तरंग उठती , स्वरमयी ती विलक्षण थरथर, अंतरातुनी […]

नको राजसा अंत पाहू

नको राजसा अंत पाहू , डोळे वाटेकडे लागले, किती रात्रंदिन साहू , विरहव्यथेने तळमळले,–!!! अजून नाही आलास तू , संजीवनही आता संपले, कोरडा होईल ना रे ऋतू , जरी हिरवेपण ते दाटले,–!!! अंगप्रत्यंगी चिंब भिजू , स्वप्न डोळियांनी पाहिले, तव स्पर्शाची जादू ,– तनमन किती लालसावले,–!!! मिलन आपुले किती योजू , दिन – रात कमी पडले, […]

आरशात चेहरा बघतां

आरशात चेहरा बघतां, किती असेच चेहरे दिसती, मुखवट्यांचे जग हे, अवतीभोवती कसे नाचती,–!!! लागत नाही मुळीच पत्ता, अशावेळी विलक्षण फसगत, होत जाते,केवळ फरपट, तडफड होते मैत्री करतां,,-!!! कोण कुठला आहे तो, पक्के ठाऊकही नसते, तरी नवांगताची पण ओढ, अनावर की असते,–!!! त्याच मोहाच्या क्षणी, घ्यावे आपण आवरते, करती खूप साखरपेरणी, गोड गोड बोलती मुखवटे–!!! अनुभव कडू-गोड […]

मन बावरा पक्षी उडतो…

मन बावरा पक्षी उडतो कल्पनांच्या आभाळातून, अंतरातून हाक देतो, विराण त्या जीवनातून, दिगंतराच्या जवळ जातो विराट त्या उड्डाणातून, दिशादिशांना आवाज देतो, अंतर्नादाच्या शांत शीळेतून, सभोवार ढगात वावरतो विशाल पंख फैलावून, एकटाच मस्तीत जगतो, गजबजत्या दुनियेत राहून, धरेवरुनी नभात जातो, आत्मिक सारे बळ घेऊन, प्रचंड इच्छाशक्ती राखतो उदंड आभाळा मात देऊन,- एकटाच त्याच्याशी लढतो, झुंज खेळून परतून, […]

डोळे अर्धोन्मीलित

डोळे अर्धोन्मीलित, स्वप्नात रंगलेले, पापण्यांचे निमुळते काठ, आसवांत भिजलेले ,–!!! कळी अर्धोन्मीलित, पाकळी कशी उमले, पानांचे भोवती राज्य, सुगंधाने भारलेले,–!!! तन अर्धोन्मीलित, तारुण्याने मुसमुसलेले, चहूकडून फुलत, यौवनाने भरलेले,–!!! काव्य अर्धोन्मीलित, पण अर्थगर्भतेने, मनात राज्य करत, नवरसांनी भरलेले,–!!! सृष्टी अर्धोन्मीलित, चरांचरांत पसरलेले, जीवनदायी संजीवन, जिथे तिथे मुरलेले,–!!! प्रेम अर्धोन्मीलित, हृदय भरलेले, मनातील राजकुमार, अंतरी वसलेले,–!!! पहाट अर्धोन्मीलित, […]

सुगंध पसरे चारही दिशा

सुगंध पसरे चारही दिशा, मधुसंचयाचा करत साठा, फुलाफुलांवर बहर केवढा, वारा वाही, सुवास खासा,–!!! फांदी फांदी डंवरून येई, फुलाफुलांनी लगडतसे, किमया सारी निसर्गाची, तोरणे सतत लावत असे,–!!! जंगी असे स्वागत एवढे, खास चालले कुणासाठी, कोण कोणासाठी झुरे,- -कोण अवतरे पृथ्वीवरती,—? सडा पडतो खाली फुलांचा, का घातल्या पायघड्या, रंगांची अशी मांदियाळी, अत्तराचे कोण शिंपी सडे,–!!! कोमल, मऊ, […]

1 2 3 4 5 19