नवीन लेखन...
सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

माझं मैत्र

अरे हे मैत्र मैत्र काय असतं? अरे हे मैत्र मैत्र काय असतं? मैत्रीच्या घट्ट नात्याने जमलेल्या दुधावरची साय असतं तासंतास शाळेच्या आठवणीत रामल्यावर भावनांच्या मंथनातून निघालेलं लोणी असतं अरे हे मैत्र मैत्र काय असतं? बऱ्याच वर्षांनी अचानक शाळेतील क्रश समोर दिसताच हृदयाच्या आतून उमटलेले हाssssय असतं तरीही मनातलं दुःख बाहेर न दाखवता हसून केलेलं हाय असतं अरे हे […]

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ४

आपल्याच नादात ती काही वेळ चालत राहिली आणि तिच्यापासून काही फर्लांगभर अंतरावर, ओढ्यावर जो पुल होता, त्या पुलाच्या टोकाशी काहीतरी हालचाल होत असल्याचं तिला जाणवलं….. परत निशाच्या मनात चऽऽऽऽर्र झालं. बापरे… आता हे काय नवीन संकट??….. […]

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ३

ते आवाज आता वजनदार आणि जास्त जोरात येवू लागले…. पालापाचोळ्यावरील त्या आवाजांचा वेग तिला जाणवू लागला…. सगळं बळ एकवटून, मनाचा हिय्या करून ती येणार्‍या प्रसंगाला तोंड देण्यासाठी, येणार्‍या आवाजांचा कानोसा घेत सावधपणे त्या दिशेने पाहू लागली आणि ….. […]

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग २

तिची गाडी गचके खात, थोडी वेडीवाकडी होत थांबली. त्या थंडीतसुद्धा निशाला चांगलाच घाम फुटला. ‘आधीच उल्हास नी त्यात फाल्गुन मास’ अशी अवस्था झाली. तिनं गाडी थोडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि मोबाईलच्या उजेडात ती गाडीला काय झालं ते पाहू लागली. […]

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १

भाग एक निशा, 22 वर्षाची, गहूवर्णाची, कुरळ्या केसांची, रेखीव बांधा, हसरा चेहेरा, डोळ्यावर चष्मा असलेली, थोडीशी मितभाषी मुलगी, घरातून बाहेर पडण्यासाठी आवरत होती. तिनं लाल रंगाचा टॉप, निळ्या रंगाची जीन्स घातली होती. त्यावर लेमन कलरचा, फुलांची सुंदर प्रिंट असलेला मोठ्ठा स्टोल घेतला होता. तिची सॅक तिनं पाठीवर अडकवली होती. तिच्या स्कूटरची चावी तिला मिळत नव्हती त्यामुळे […]

हिरवाई – पेढ्याचा भैरोबा

सह्यगिरीच्या डोंगररांगा हिरवाईने नटून बहरल्या | रंगबिरंगी रानफुले गोजिरी भाळावरती त्यांनी माळीली | संततधारा शिरी बरसात होत्या मेघातुनी अलवारश्या रेषा | झाकोळून गर्द रंग हा गहिरा घननीळ नभातच मिसळून गेला | वेध लागले सहस्त्ररश्मीला कधी पाहतो शृंगार धरेचा | हळूच बाजूला करुनी ढगांना थोपविल्या त्या झरझर धारा | अलगद पसरली रवी किरणेही सोन पाऊली धरणीवर उतरली | […]

मोहरली ही अवनी

ग्रीष्माच्या काहिलीने आसमंत तप्त झाला अति उष्णतेने धारित्रीस कासावीस करून गेला ।। 1 ।। भेगाळलेल्या जमिनी आणि बंद पडलेली मोट नाही आला पाऊस तर कसं भरेल पोट? ।। 2 ।। प्रत्येक जण प्रतीक्षेत कधी येईल पाऊस डोळ्यांतून पाणी येईपर्यंत नको वाट बघायला लावूस ।। 3 ।। पाण्याविना तडफडत होते पशू, पक्षी, मानव मग तो प्रासाद असो, […]

थवा राव्यांचा

सकाळच्या या प्रसन्न प्रहरी सूर्यकिरण पसरले अंबरी ।। उदर भरण करण्यासाठी लगबग उडाली ही पक्ष्यांची ।। कावळे, घारी, साळुंखी ही पारवे, चिमण्या, बुलबुल संगती ।। प्रत्येकाचा सूर निराळा गाऊन सवंगड्या साद घालती ।। पटकन आला थवा राव्यांचा मंदिर शिखरी क्षणभर विसावला ।। घाणेरीच्या झुडुपांमध्ये क्षणात हा मिसळून गेला ।। मोबाईल हा गप्प बसेना मग नजारा हा […]

सांजसावल्या….

सायंकाळी क्षितिजावरती पहा पसरल्या सांजसावल्या ।। पाहुनीया मोहक रंगछटा मनमोराचा फुले पिसारा किती साठवू नयनी नजारा वाटे ढगांवर पसरला पारा ।।१।। सायंकाळी क्षितिजावरती पहा पसरल्या सांजसावल्या ।। डोहात नदीच्या चमके धारा लाटांवर खेळे अवखळ वारा काठावर उभा निष्पर्ण वृक्ष हा आकाशातून आला फिरवून खराटा ।।२।। सायंकाळी क्षितिजावरती पहा पसरल्या सांजसावल्या ।। एकत्र पाहुनी हा देखावा मज […]

अजब न्याय नियतीचा – भाग २९

ज्या दिवशी नीलने राजला हॉस्पिटलमध्ये ओळखले त्यानंतर त्याच्यात ट्रिमेंडस बदल होत गेले. नील, तू सांग त्यावेळी काय झालं ते. […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..