नवीन लेखन...
जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

अनुत्तरीत राहिलेला प्रश्न, स्त्री अबला का सबला?

आज जगातील बहुतेक राष्ट्रात समाजिक स्थरावर व कायद्याने स्त्रीला बऱ्याच बाबतीती पुर्षांच्या बरोबरीचे स्थान दिले आहे. परंतू देशातील व जगातील स्त्रियांवरील अत्याचार होताना प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मीडियातून वाचले आणि बघितले की वाटते, कुठल्याही गोष्टी कायदे केल्याने किंवा त्याची कठोर अंमलबजावणी केल्याने उद्देश साध्य होतातच असे नाही. त्यासाठी स्त्रीच्या प्रती पुरुषातील पुरुषी अहंकार जावा लागतो, मानसिकता सकारात्मक असावी लागते. “स्त्रीही क्षणाची पत्नी व अनंत काळाची माता आहे” हे कालातीत सत्य लक्षात ठेऊन ते कृतीत आणले तरच आज स्त्रियांवर सर्वत्र होणारे अत्याचार थांबतील आणि समाजात ती सन्मानाने व ताठ मानेने जगायला शिकेल. स्त्रीने जर का चंडिकेचे रौद्र रुप धारण केले तर ती कुठलेही संकट सहज परतवू शकते. अशी कित्येक उदाहरण आपण पाहतो पण…….
[…]

“परी नेत्र रूपे उरावे”

लेखकाने किंवा कवीने निसर्गाचे किंवा चित्राचे तसेच पदार्थाचे सोप्या भाषेत वर्णन केले असले तरी एखाद्या अंध व्यक्तीने ती गोष्ट आपल्या डोळ्यांनी जन्मताच बघितली नसेल अनुभवली नसेल ते फिलिंग नसेल तर त्या वर्णनाचा काय अर्थ आहे? ज्या व्यक्तीला दिसत होते पण अचानक अपघातात दृष्टी गेली तर त्या व्यक्तीला दैनंदिन जीवन जगताना त्या आठवणीने किती यातना होतील? जीव किती कासावीस होईल याचा विचारच करवत नाही. पाच मिनिटे लाईट (वीज) गेले तर आपली काय अवस्था होते ते सर्वांनी अनुभवले असेल ! खेळात आंधळी कोशिंबीर खेळतांना अनुभव घेतला असेल ! […]

टर्निंग पाँईंटस

हे सगळे सांगण्याचा उद्देश हा की आज आपण सर्वत्र बघतो नवरा-बायकोत कुठल्या ना कुठल्या कारणांनी दररोज भांडणे चालू असतात व त्याची परिणीती वेगळ्याच वाटेने होते. काही महिन्यांन पूर्वी मुंबईतच तीन स्त्रियांनी इमारतीच्या वेगवेगळया मजल्यावरून उड्या मारून आत्महत्या केल्या होत्या व नुकतीच २७ जून रोजी कांदिवली (प), लोखंडवाला संकुलातील एका इमारतीच्या १९व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे बोलके उदाहरण आहे. सध्या वारंवार असे का घडते आहे?
[…]

रसिकांच्या मनातलं !

शास्त्रीय गायन व वादन पुर्वापार चालत आलेल्या कला विशेषतः भारतात घराण्यांवरून ओळखल्या जाणार्‍या शैली आहेत. त्यात रागधारी हा शास्त्रीय गायन वादनाचा गाभा आहे. चांगलं गाणं किंवा गीताचा कुठलाही प्रकार उदा. भाव भक्ती व नाटयगीत तसेच कविता जुनीगाणी पोवाडा व लावणी यांच्या शब्दरचना गोड व मधुर सुर ताल व लयीत ऐकायला मिळाल्या तर मनावरील ताण आटोक्यात आणण्यासाठीचे औषध आहे.
[…]

वाढती लोकसंख्या एक दुष्टचक्र

सध्याच्या धकाधकीच्या दैनंदिन जिवनात आज आपल्याला सर्वच स्तरावर स्पर्धांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक कुटुंब होरपळून निघत आहे आणि त्याचे दुषपरिणाम खूप गंभीर होताना दिसत आहेत.
[…]

प्रवास वृत्तपत्रांचा

प्रत्येक माणसाची सकाळ कुठल्याना कुठल्या वृत्तपत्राने होत असते. भले मग कितीही बातम्या टीव्ही समोर बसून बघीतल्या असतील तरी सकाळ झाल्यावर वर्तमानपत्र वाचल्या शिवाय कुणाही माणसाचा दिवसच सूरू होत नाही. देशात व परदेशात घडणार्‍या सर्व घडामोडींची बित्तम बातमी वृत्तपत्रातून येते.
[…]

“तरूण मुलांचा आत्मविकास”

बारीवीच्या परिक्षेत पास झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थी मित्रांचे अभिनंदन आणि ज्यांना यात पाहिजेतसे यश मिळवता आले नाही किंवा यशस्वी होता आले नाही त्यांनी निराश किंवा दुःखी होण्याचे कारण नाही. काही दिवसांत दहावीचा निकाल लागणार आहे. काहींना चांगले मार्कस् तर काही काठावर तर काहीना अपयश. ही काही जीवनातील अंतिम परिक्षा नाही.
[…]

चंचु प्रवेश !

काही महिन्यांत सण व उत्सवांना सुर्वात होईल आणि सर्व वातावरण आनंदी उत्साही व सुगंधाने भरून जाईल पण या आनंदी व उत्साही वातावरणात आपल्या सर्वांवर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आहे हे विसरून चालणार नाही. सध्या पर्यावरण रक्षणासाठी सर्वत्र इकोफ्रेन्डलीचा प्रचार आणि प्रसार होत आहे व त्याला प्रतिसादही उत्तम मिळतो आहे.
[…]

निवृत्ती नंतरच्या व्यथा !

सगळयाच निवृत्तीधारकांसं निवृत्ती नंतर काही दिवस व महिने बरे वाटते कारण रोजच्या धकाधकीच्या घाईगर्दी व लोटालोटीचा ट्रेनचा प्रवास सरलेला असतो. मुख्य म्हणजे मस्टर नसते त्यात पुरूषांना सकाळी आरामात ऊठता येते त्यामुळे वेळ बरा जातो. काही जणांची नोकरी व्यवसायात मिळणारी चिरीमीरी बंद झाल्याने आर्थिक तंगी असते. कुटुंबाची आर्थिक ओढाताण व्यसनं व नसत्या गरजा पैशा विना कशा पुर्‍या करायच्या हे प्रश्न मनात सतावत असतात. तसेच मानाची खुर्ची व पद नसल्याने सगळी कामे स्वतःहून करणे क्रमप्राप्त असते आणि हेच कुठेतरी खटकतं म्हणून निवृत्ती नको असते. निवृत्तीपासूनच निवृत्त असा पृथ्वीतलावर एकच अपवाद असेल तो म्हणजे राजकारणी !
[…]

1 18 19 20 21 22 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..