नवीन लेखन...

टर्निंग पाँईंटस

 

|| हरि ॐ ||

 

टर्निंग पाँईंटस

 

जीवनातील पहिला टर्निंग पाँईंट म्हणजे लग्न.
लग्न जमवताना शक्यतोवर पत्रिक बघण्याचा घाट न घालता, दोघांच्याही रक्तातील प्रमुख
बाबी मेडिकल सायन्सच्या साह्याने तपासावे ज्याने

एखादा रोग असल्यास चाचणीत स्पष्ट
होईल. उदा. एड्स, टी.बी., कॅन्सर किंवा एखादा असाध्य रोग असल्यास एकमेकांना कळेल व
वेळीच जागे झाल्याने पूढील अनर्थ टळेल. दोघांच्याही चारित्र्याच्या बाबतीत आणि
व्यसनाच्या बाबतीत एकमेकांनी खोटे न बोलता सांगावे. अचानक ऑफिस मध्ये जाऊन
मुला/मुलीस भेटावे. स्वभाव, नोकरी, आर्थिक उत्पन्न, घराण्याचे वैभव व छानछोकीला
भूरळून जाऊ नये. मुला/मुलीच्या कुटुंबाची सखोल चौकशी ज्यानेत्याने करावी. मुख्य
म्हणजे लग्ना आधी मुला/मुलीनी एकत्र भेटून गत आयुष्यातील चुका कबुल कराव्यात व
पुढे होणार नाहीत याची एकमेकांना खात्री पटल्यास पुढे जावे. काही आर्थिक व
वैयक्तीक न्यून आधीच स्पष्ट करावे. सवयी, लकबी व त्रुटी एकमेकांस लग्ना आधीच सांगीतल्यास
भविष्यातील गैरसमज दूर होऊन संशयाला जागा राहणार नाही. परंतू बऱ्याच तरुण मुलमुली आंधळ्या
प्रेमात लग्नाच्या आणाभाका घेतात व एकमेकांच्या वैभवाला, व्यक्तिमत्वाला,
घराण्याला व खोट्या प्रलोभनांना बळी पडल्याने त्यांच्या अब्रुची लेक्क्तरे वेशीवर
टांगली जातात. मुलगा किंवा मुलीच्या मनाचे संतुलन बिघडते. जीवनात वैफल्य व नैराश्य
आल्याने व्यसनाधीन व वाम मार्गाला लागण्याचीच शक्यता जास्त असते. काही वेळा फसव्या
जाहिरातींना मुली बळी पडल्याने पुढे मुलींना कुमारी माता होणे नशिबी येते.

 

धकाधकीच्या व स्पर्धात्मक जीवन शैलीमुळे
कुटुंबात सुसंवाद राहिलेला नाही. कुटुंबात, पती व पत्नीत मर्यादांचे उल्लंघन
होताना दिसते. कुठेतरी संस्कार

कमी पडत आहेत असे वाटते. फुकटचे मनोरथ, आपल्याला न
पेलणाऱ्या जबाबदाऱ्या, मनातल्या मनात इमले बांधण्याच्या हव्यासापोटी तर कधी
शेजाऱ्यांची स्पर्धा करण्यासाठी तर कधी चुकीच्या समजुतीतून तर कधी सिनेमा व
सिरीयल्सचा आपल्या मन व बुद्धीवर झालेल्या प्रभावामुळे कुटुंबे स्वत:चे नुकसान
करताना दिसतात.

 

संसारातील दुसरा टर्निग पाँईंट म्हणजे मुल उशिरा
होणे किंवा न होणे. तसेच लहानसान कारणांवरून आधी सासू-सून, मग नणंद-भावजय आणि
सर्वात शेवटी पती-पत्नीत संशय, अविश्वास मग कुरबुरी, भांडण, एकमेकांना कमी लेखणे
कधी पत्नीने घर सोडून जाणे किंवा पतीने घालवून लावणे आणि सरते शेवटी परिस्थितीचा
उद्रेक व कडेलोट म्हणजे डिव्होर्स किंवा “काडीमोड” हा तिसरा टर्निग पाँईंट.

 

लाग्नासारखे पवित्र संस्काररूपी बंधन झुगारून
कित्येक संसार ‘डिव्होर्स’च्या किंवा ‘काडीमोड’च्या उंबरठ्यावर उभे आहेत. शबदात
दडलेले शब्द शोधण्याच्या कल्पनेतून कुतूहलापोटी “काडीमोड”चा दुसरा अर्थ शोधण्याचा
प्रयास करावासा वाटला. ‘काडीमोड’ या शब्दातील पहिला शब्द ‘का’ शब्दाचा अर्थच
“प्रश्नार्थक”. त्यानंतर राहिलेले शब्द ‘डीमोड’ मग त्यातील “मो” हा शब्द उचलून
बाजूला केला तर राहिला “डीड” हा शब्द घेतला तर यात मला भावलेले दोन अर्थ असे एक
‘डीड’ म्हणजे ‘डू’ चा भूतकाळ (म्हणजे वर्तमान काळात सर्व सहज सुंदर चालू होते ते
भूतकाळात ढकलले.) दुसरा अर्थ ‘कृत्य’ किंवा ‘करार’ “मो” ‘मोडला’ या शब्दाचे आद्य
अक्षर. ‘काडीमोड’ म्हणजे थोडक्यात : का पवित्र लिखित/अलिखित करार मोडला? किंवा का पवित्र
कृत्य मोडले? वैदिक पद्धतीने केलेले लग्न किंवा रजिस्टर पद्धतीने केलेले लग्न म्हणजे
हा एका अर्थाने लिखित करार आहे असे म्हणण्यास जागा आहे. कारण एकदा कायदेशीर लग्न
झाले कि त्याला सामाजिक व कायद्याच्या कक्षेचे बंधन आले आणि काही कारणांनी ते
संपुष्टात आणायचे असेल तर त्याला कायद्याने ‘काडीमोड’ किंवा ‘डिव्होर्स’ घ्यावा
लागतो.

 

हे सगळे सांगण्याचा उद्देश हा की आज आपण सर्वत्र
बघतो नवरा-बायकोत कुठल्या ना कुठल्या कारणांनी दररोज भांडणे चालू असतात व त्याची
परिणीती वेगळ्याच वाटेने होते. काही महिन्यांन पूर्वी मुंबईतच काही तीन स्त्रियांनी
इमारतीच्या वेगवेगळया मजल्यावरून उड्या मारून आत्महत्या केल्या होत्या व नुकतीच २७
जून रोजी कांदिवली (प), लोखंडवाला संकुलातील एका इमारतीच्या १९व्या मजल्यावरून उडी
मारून आत्महत्या केल्याचे बोलके उदाहरण आहे. सध्या वारंवार असे का घडते आहे?

 

काडीमोड किंवा डिव्होर्सचा प्रश्न फक्त भारतदेशा
पुरता मर्यादित नसून हा एक ग्लोबल वॉरर्नींगचा प्रश्न बनला आहे. दरवर्षी ६४%
डिव्होर्स रेटिंग हे एकटया क्युबा देशाचे आहे. गंमत म्हणजे डिव्होर्स घेऊनही नवरा
बायको एकाच घरात राहतात कारण तेथे घरांचा मोठा प्रश्न आहे. भारतातील डिव्होर्सचे
खटले देशातील कित्येक न्यायालयात या ना त्या कारणाने प्रलंबित आहेत. या प्रश्नांच्या मुळाशी गेल्यास ठळक कारणे दिसतात
ती अशी :- हुंडा, व्यसन, वैचारिक भिन्नता, मुल न होणे तसेच पत्नीने कुलादिपकास
जन्मास न घालणे किंवा सर्व मुळीच होणे, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव, करिअर,
आंतरजातीय व आंतरराष्ट्रीय विवाह, अविश्वास, गंभीर आजार, तडजोडीचा अभाव व गरीब
किंवा बेकारी. या अनुषंगाने येणाऱ्या समस्या म्हणजे नवविवाहित पत्नी प्रेग्नंट
असेल तर त्यात येणाऱ्या बाळाचे काय? ते कोणाकडे राहील? काय संस्कार होणार

त्या
निर्प्राध जीवावर? जोडप्यांना मुळे असतील

तर परिस्थिती अधिकच बिकट बनते. त्यांचे
प्रश्न वेगळे. याला जबाबदार कोण? संस्कृती, जात, धर्म, पंथ, समाज, अंधश्रद्धा,
रितीरिवाज, कुटुंबे, कायदे, सरकार का आपण स्वत:.

 

बऱ्याच वेळा असे पाहण्यात आले आहे की सूड व बदला
घेण्यासाठी पती किंवा पत्नी एकेमेकांना काडीमोड न देता राग,द्वेश व तिरस्कार प्रगट
करीत असतात. पण यात आर्थिक व मानसिक नुकसान तसेच अमुल्य वेळेचा अपव्य कोणाचा होतो?
वेळ अशी गोष्ट आहे ती तशीच परत येत नाही. आयुष्यात चांगल्या संधी परत परत येत
नसतात याचा दोघांनी निट विचार कारणे गरजेचे आहे. आज आपण सर्वत्र पाहतो माणसांची
जीवनाकडे बघ्यण्याची वैचारिक नैसर्गिकता जाऊन कृत्रिमता येऊ लागली आहे व त्याने
त्यांच्या घकाधाकीच्या दैनंदिन जीवनात वैफल्यता आल्यासारखे दिसते आहे. माणसं सुखी,
समाधानी व आनंदी नाहीत असे एकूणच आजचे चित्र दिसते. याला आपणच जबाबदार आहोत कारण
आपली सामाजिक मानसिकता त्यांची मूल्ये दिवसागणिक ढळत चालली आहेत.

 

कायद्याला पळवाटा असल्याने कोर्टकचेरीतून प्रश्न
सुटणे मानसिक व आर्थिक दृष्ट्या न परवडणारे व निर्णायक दृष्ट्या वेळकाढू असू शकते.
परंतू कायद्याच्या बंधना पोटी काही प्रश्नी कोर्टाकडून निर्णय घ्यावा लागतो. तसेच
प्रश्न प्रतिष्ठेचे, गुंतागुंतीचे व हळवे असल्याने समजुतीने व समुपदेशाने सुटतील असे
वाटते. अर्थात, त्याला संस्कारक्षम भक्ती, सेवा, श्रद्धा व सबुरीची जोड असायला हवी
व त्या बरोबर संतांनी लिहिलेल्या ग्रंथातील मर्यादा मार्ग निर्धाराने व
सत्यसंकाल्पाने नित्य जीवनात आचरणात आणला पाहिजे. मुख्य म्हणजे जीवनातील व
संसारातील प्रश्नांची उकल करताना किंवा कुठलाही निर्णय घेताना टोकाची भूमिका न
घेता कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सल्ला व विचार ऐकून घेऊन सुवर्णमध्य गाठावा
ज्यामुळे कुटुंब व पतीपत्नीत दुरावा निर्माण होणार नाही व भविष्यात
कोर्टकचेर्यांचे व पोलीस स्टेशनचे हेलपाटे घालावे लागणार नाहीत त्यामुळे
संसारासाठी वेळ, पैसा व श्रम उपयोगी आणता येईल.

 

जगदीश पटवर्धन

 

वझिरा, बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..