नवीन लेखन...

“परी नेत्र रूपे उरावे”

परमेश्वर निर्मित निसर्गातील विविध आकारातील, रंगातील, चवीची फळे, रंगीबेरंगी आकाराची मादक सुहासिक फुले, उंच उंच डोंगर, दर्याखोरी, खोल व खळखळनाऱ्या अवखळ नद्या, निळागर्द शांत क्षितिजाला भिडलेला अथांग समुद्र, वनराया, विविध आकारातील व रंगातील प्राणी, पक्षी, कीटक तसेच चित्र, शिल्प, देवांची निर्गुण रूपातील अनेक चित्र व रूपं व सगुण रूपातील सदगुरुंना भरभरून बघून हृदयात साठवून ठेवणारे इंद्रिय म्हणजे डोळे. कोणी म्हणेल काय नुसती सगळ्याची यादी देत आहेत? अगदी सुंदर रेखीव मासोळीदार काळेभोर टपोरे डोळे आहेत पण ते जगातील सृष्टीसौंदर्य बघू शकत नाहीत तर त्यांचा काय उपयोग? दैनंदिन जीवनात पदोपदी डोळ्यांची आवशकता भासते.

प्रत्येक गोष्ट बघण्याची क्रिया डोळ्यांनी होते पण तेच कमकुवत किंवा अजिबात दृष्टीहीन असतील तर काय होईल? लेखकाने  किंवा कवीने निसर्गाचे किंवा चित्राचे तसेच पदार्थाचे सोप्या भाषेत वर्णन केले असले तरी एखाद्या अंध व्यक्तीने ती गोष्ट आपल्या डोळ्यांनी जन्मताच बघितली नसेल अनुभवली नसेल ते फिलिंग नसेल तर त्या वर्णनाचा काय अर्थ आहे? ज्या व्यक्तीला दिसत होते पण अचानक अपघातात दृष्टी गेली तर त्या व्यक्तीला दैनंदिन जीवन जगताना त्या आठवणीने किती यातना होतील? जीव किती कासावीस होईल याचा विचारच करवत नाही. पाच मिनिटे लाईट (वीज) गेले तर आपली काय अवस्था होते ते सर्वांनी अनुभवले असेल ! खेळात आंधळी कोशिंबीर खेळतांना अनुभव घेतला असेल !

जसे आपण जिवंतपणी रक्तदान किंवा एखाद्या आपल्या जवळच्या नातलग व्यक्तीला किडनी किंवा अवयव दान करतो तसेच आपल्या मरणा नंतर आपण नेत्र दान करू शकतो. यासाठी अगोदर आपली लेखी संमती एका विहित नमुन्यातील अर्जात भरून आपल्या नजीकच्या अधिकृत नेत्र पेढीशी संपर्क साधून करावी लागते. किंवा कुठल्याही सरकारी अथवा पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये याची माहिती मिळू शकते.

हो, आज आपल्या देशात आज कोट्यांनी अशी बालके, स्त्री/पुरुष आहेत की जी जन्मताच अंध आहेत तर कोणाला थोडे तर कोणाला आजिबात दिसत नाही. दैनंदिन जीवन फार हाल अपेष्टात जगत आहेत. तसेच ते निसर्गाच्या विलोभनीय दृष्यांपासून वंचित आहेत. त्यांच्या पुढे अंधार आहे. त्यांचा वयक्तिक, सामाजिक व आर्थिक विकास म्हणावा तसा झाला नाही का तर त्यांना दृष्टी नाही ते हे सुंदर जग पाहू शकत नाहीत व सगळ्या गोष्टींपासून वंचित आहेत. त्यांची हालचाल मंदावली आहे. कोणाला असे वाटू नये की ते आपल्यावर अवलंबून आहेत कारण शासन त्यांच्यासाठी मदत करत आहे, तसेच बऱ्याच सामाजिक आणि औद्योगिक आस्थापने त्यांना आर्थिक व नोकरी मिळवून देण्यासाठी मदतीचा हात पुढे करीत आहेत. आपले मित्र/मैत्रिणी, शेजारी व नातलग यांना नेत्रदानाचे गांभीर्य पटवून सांगून त्यांना यात सहभागी करून घेऊ. कुठल्या चांगल्या गोष्टीची सुरवात करायाला मुहर्त बघावा लागत  नाही. म्हणून आज आपण सर्व असा निर्धार करुया की आपण आपले डोळे मरणा नंतर आपल्या अंध देश बांधवांसाठी दान करून परमेश्वराने आपल्याला डोळस जन्माला घातल्याचे व समाजाचे आपल्यावरील ऋण या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन फेडू. आपल्या नेत्र दानाने देशातील दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते.

जगदीश पटवर्धन
वझिरा, बोरिवली (प)

 

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..