नवीन लेखन...

प्रवास वृत्तपत्रांचा

प्रत्येक माणसाची सकाळ कुठल्याना कुठल्या वृत्तपत्राने होत असते. भले मग कितीही बातम्या टीव्ही समोर बसून बघीतल्या असतील तरी सकाळ झाल्यावर वर्तमानपत्र वाचल्या शिवाय कुणाही माणसाचा दिवसच सूरू होत नाही. देशात व परदेशात घडणार्‍या सर्व घडामोडींची बित्तम बातमी वृत्तपत्रातून येते. मुख्य म्हणजे टीव्ही वरील बातम्या बघीतल्या व ऐकल्या की पून्हा बघायला व ऐकायला मिळत नाहीत पण वर्तमान पत्रातील मजकूर पुन्हा पुन्हा वाचता येतो कोणाला वाचावयास देता येतो व आपल्या संग्रहाही ठेऊ शकतो. प्रत्येक देशाच्या क्रांतीमध्येह वृत्तपत्रांचे योगदान खूप मोठे आहे. कुठल्याही आपत्तीकाळी वर्तमानपत्रच एक आधार वाटतो. तर या वृत्तपत्राचा प्रवास कसा झाला हे पूढे बघणार आहोत :

युरोपात वृत्तपत्रे व्यापारांतूनच उगवली. व्यापाराला निरनिराळया घडामोडींचे ज्ञान असावे व ते शक्य तेवढे लवकर मिळावे लागते. यासाठी युरोपात सर्व देशांतून व्यापारी वर्गाचे विश्वासू व जिज्ञासू बुद्धीमान हस्तक ठेवलेले असत. म्हणजे अत्ता सारखे हेर डिटेक्टीव्ह एजंट किंवा हस्तक म्हणा हवे तर. ते आपल्या देशात व्यापारावर इष्टानिष्ट परिणाम करणारे जे काही घडले ते इत्यंभूत आपल्या देशाला कळविण्यात तत्पर व दक्ष असत. सरकारी राजदूताच्या विद्यमाने देशोदेशी बातम्यांची जी रीतसर देवाणघेवाण होत असे त्याहूनही व्यापरी वर्गाच्या बातम्या एकमेकांना पुरविण्याचा व्यवहार अधिक त्वरेचा असे. हिन्दुस्थानातही बातम्यांसंबंधात अशीच व्यवस्था होती. मराठेशाहीच्या काळात व्यापार्‍याला ‘सावकार’ म्हणत असत. त्यामुळे व्यापारी वर्गांचा जो आपसात पत्रव्यवहार चाले त्याला ‘सावकारी’ हा शब्द लावून इतिहासकालीन लोक आपले काम भागवीत असत. वृत्तपत्रांशी त्याचा निकटचा संबंध आहे. पानिपतची लढाई होऊन गेल्यावर तिची समग्र हकीगत महाराष्ट्रात प्रथम लोकांना कळली ती सावकारी पत्रांच्या व्दारे. पत्राची भाषा सांकेतीक होती. हिरे मोहरा मोती व खुर्द इ.शब्दानी लढाईतील हानीचा तपशील पत्रलेखकाने सुचविला. “दोन हिरे गळाले”. हिंदुस्थानात मुघलकाली ‘अखबारात’ हा

शब्द मोठया प्रमाणावर आढळतो. त्याचा अर्थ बातमीपत्रे असाच आहे. या व्यवहारातूनच छापखाने निघाल्यावर वृत्तपत्रे सुरू झाली. इंग्लडमध्ये पहिले वृत्तपत्र इ.स. १५६६ वर्षी निघाले.

असे बघण्यात आले आहे की भारतात कुठलीही गोष्ट मग ती आर्थीक सामाजिक किंवा राजकीय असो किंवा त्या काळात स्वातंत्र्य लढयाची असो ती महाराष्ट्राच्या आत्ताच्या राजधानी मुंबई पासूनच होत असे. मुंबईतील वृत्तपत्राचा काळ एकूण सूमारे २०० वर्षांचा आहे.

श्री. भीमजी पारख या व्यापार्‍याने इंग्लडमधून छापखान्याचे यंत्र ईस्टइंडिया कंपनी मार्फत मुंबईत आणले. श्री.मंचरजी मर्झबान या पारशी तरूणाने १ जुलै १८२२ रोजी पहिले गुजराती वृत्तपत्र ‘मुंबई समाचार’ सुरू केले.

स्वातंत्रयप्राप्ती पूर्वी इंग्रजी राज्याचा कारभार हा प्रतिकूल टिकेचा एकच एक मुख्य विषय होता. आता सुद्धा थोडीफार तशीच परिस्थिती आहे. अठराव्या शतकात इंग्रजांनी जन्मास घातलेली काही वृत्तपत्रे देशी भाषेतील पत्रांच्या प्रतिकूल टिकेचा कित्ता गिरवीत होती. त्या काळात इंग्रजी राज्यकर्त्यांनी वृत्तपत्रावर नियंत्रणे घालायला सुरूवात केली व हळूहळू या स्वातंत्रयाच्या मर्यादा पक्या केल्या. इंग्रजानी काढलेल्या वृत्तपत्रांना फारशी बंधने नव्हती.

‘बॉम्बे कूरियर’ ने सरकारची तरफदारी करण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे त्याला १७९२ पासून सर्व सरकारी जाहिराती मिळू लागल्या. १८३० मध्ये सरकारच स्वतःचे ‘बॉम्बे गव्हर्मेंट’ पसिद्ध करू लगल्यामुळे ‘बॉम्बे कुरियर’चा तो आधार गेला. १८१९ मध्ये कॅप्टन स्टॉकेलर या लष्करी अधिकार्‍याने नोकरी सोडून ‘अर्गस’ नावाचे वृत्तपत्र विकत घेतले व त्याचे ‘बॉम्बे क्रॉनिकल’ नावाने प्रकाशन सुरू केले. त्याने १८२७ मध्ये आधीचे बंद पडलेले वृत्तपत्र ‘आयरिस’ नावाने काढले.

१८३८ साली ‘बॉम्बे टाइम्स’ निघाले. १९३० साली त्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ मध्ये रूपांतर झाले. पहिले नाव १८६१ मध्ये बदलले. सुरवातीस बॉम्बे टाइम्स हे दैनिक नव्हते. आठवडयातून बुधवार व शनिवारी प्रसिद्ध होत असे. १८५० मध्ये दैनिक झाले. मालकही वारंवार बदलत गेले.

वृत्तपत्र नियंत्रणाचा कायदा १८६२ मध्ये प्रचारात येऊन आमलात आला. ‘इंडियन पीनल कोड’ हे फौजदारी कायद्याच्या पुस्तकाचे नाव.

देशी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘मुंबई समाचार’ १८२२ च्या जुलै महिन्यात काढण्यात आले. प्रथम साप्ताहिक होते. जानेवारी १८३२ ला दैनिक झाले. श्री.विनायक व जनार्दन वासुदेव हे मुंबई समाचरमध्ये दोन महाराष्ट्रीयन संपादक होऊन गेले.

१८३२ मधील पहिले मराठी भाषेतील वृत्तपत्र ‘दर्पण’ होय. संपादक बाळ गंगाधर शास्त्री हे होते. अमेरिकन मिशनरी मंडळाने १८४२ मध्ये ‘ज्ञानोदय’ हे वृत्तपत्र अहमदनगरास निघत असे. “ज्ञानसागर” हे पत्र तावी साच्यांचे शिळाछापावर आठवडयांत तीन वेळा निघायचे. छापणारे श्री.रघुनाथ त्रंबक जोशी मुंबई. ‘प्रभाकर’ व ‘धूमकेतू’ साप्ताहिक पत्र छापणारे श्री.गोविंद पांडुरंग जोशी मुंबई. ‘वर्तमानदीपिका’ साप्ताहिक रॉयल फोलिओ म्हणजे मोठया पानांचे. वार्षिक वर्गणी आगाऊ दिल्यास रू. ५/- मागून दिल्यास रू. ६.०० महिन्यास ८ आणे छापणारा कान्होबा गणपत मुंबई. इंग्रजी मराठी मिश्रीत सोळा पानाचे अष्टपत्री ‘ज्ञानोदय’ महिन्यातून दोन वेळा. वार्षिक किंमत रू १११/- . ‘ज्ञानप्रसारक’ ‘चंद्रिका’ ‘ज्ञानदर्शन’ ‘ज्ञानवर्धक’ अशी अनेक वृत्तपत्रे होती. ‘हिन्दुहितेच्छु’ वृत्तपत्र आठवडयास निघत असे.गुजराथी साप्ताहिक ‘मुंबई परहेजगार’ ने मादक पदार्थ सेवनाविरूद्ध खूप प्रचार केला. ‘इंदुप्रकाश’ १८६२ मध्ये पसिद्ध झाले. नाव दोन भाषांत प्रसिद्ध होत असे. पत्रातून विधवा विवाहाच्या कार्याचे प्रबोधन होत असे. प्रार्थना समाजाचे ‘सुबोधपत्रिका’ हे वृत्तपत्र १८७३ मध्ये पसिद्ध झाले.

जरासंघी प्रकार मोडला. ‘केसरी’ हे मराठी व ‘मराठा’ हे इंग्रजी वृत्तपत्रे १८८१ पासून पुण्यास निघू लगली. त्या नंतर केसरी सुधाकर काळ व करमणूक इ. वृत्तपत्रे पुण्यास लोकप्रिय झाली.

१९२३ साली कृ.प्र.खाडिलकरांनी स्वतःच्या मालकीचे ‘नवाकाळ’ हे दैनिक

मार्चमध्ये काढले. याच कुटुंबातील चार पिढया एकाच व्यवसायात दिसाव्या म्हणजे एक प्रकारचे कौतुकच आहे. स्वराज्य पूर्वकाळातील नवशक्ती लोकसत्ता इ. ‘फ्री प्रेस जर्नल’ हा मुळात फ्री प्रेस ही बातमी पुरवणारी संस्था होती. म.गांधीची विचारसरणी व साम्यवाद यांचे मिश्रण असणारे कै. शंकरराव जावडेकर नवशक्तीचे संपादक होते.

कार्यकारी संपादक डॉ. अनिरूद्ध धैर्यधर जोशी यांनी बिगर राजकिय “दै.प्रत्यक्ष” २००५ च्या दत्त जयंतीला प्रथम प्रसिद्ध केले. ज्यात आजच्या घडीला आवश्यक असलेल्या सर्व बाबींचे उत्तम मार्गदर्शन. संस्कृत क्रिडा कला मनोरंजन अभ्यास विज्ञान तंत्रज्ञान व खेळ या सारख्या विषयसह अनेक जगातील बातम्या जे हे वृत्तपत्र देते. मुख्य म्हणजे अग्रलेख व रविवारच्या दिवशी पैलूच्या अवती भोवती सदरांचा अमराठी वाचकांस वाचता यावा व कळावा हया साठी राष्ट्रभाषा हिन्दीत अनुवादीत केला जातो. माझ्या मते अखंड भारातातील एकमेव असे वृत्तपत्र जे अग्रलेखाचे हिन्दी अनुवाद छापते.

कार्यकारी संपादक डॉ. अनिरूद्ध धैर्यधर जोशी यांनी बिगर राजकिय “दै.प्रत्यक्ष” २००५ च्या दत्त जयंतीला प्रथम प्रसिद्ध केले. ज्यात आजच्या घडीला आवश्यक असलेल्या सर्व बाबींचे उत्तम मार्गदर्शन. संस्कृत क्रिडा कला मनोरंजन अभ्यास विज्ञान तंत्रज्ञान व खेळ या सारख्या विषयसह अनेक जगातील बातम्या जे हे वृत्तपत्र देते. मुख्य म्हणजे अग्रलेख व रविवारच्या दिवशी पैलूच्या अवती भोवती सदरांचा अमराठी वाचकांस वाचता यावा व कळावा हया साठी राष्ट्रभाषा हिन्दीत अनुवादीत केला जातो. माझ्या मते अखंड भारातातील एकमेव असे वृत्तपत्र जे अग्रलेखाचे हिन्दी अनुवाद छापते.

कादाचित यापुढील जग एवढे बदलेले असेल की लोकांना कदाचित वृत्तपत्र वाचावयास वेळ ही कमी पडेल. ठळक घडामोडींचा तपशील मोबाईल व टीव्हीच्या ब्रेकिंग न्युज प्रमाणे बघायला मिळतील. सध्या ईवृत्तपत्रही वाचकांचा आवडता विषय होत चालला आहे. येणार्‍या काळात झाडांची अशीच तोड होत राहिली तर कागद मिळणारच नाहीत किंवा महाग होतील आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाना चांगले दिवस येतील.

जगदीश पटवर्धनवझिरा बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..