नवीन लेखन...
जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

घरगुती समारंभ साजरे करताना याचा विचार व्हावा…!

महागाई कमी व्हावी म्हणून रिझर्वबँकेने नामी युक्ती शोधून काढली. बँकांच्या सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याजांचे दर एक-दोन वेळा नाही तर चक्क १३ वेळा वाढविले तरीही महागाई काही अजून आटोक्यात येत नाही उलट त्याने विकासाची गती मात्र मंदावली. दैनंदिन जीवनात सातत्याने भेडसावणाऱ्या अडीअडचणींचे विशेषता महागाईचे गणित सोडवायचे असेल तर त्यासाठी चिंतन, शोध व अभ्यास करणे गरजेचे आहे.
[…]

किंकर्तव्यमूढम् !

मुंबईत तरी रस्त्यातून चालताना फुटपाथ शोधणे हा एक संशोधनाचा विषय झाला आहे. फेरीवाले व दुकानदारांचा असा समाज आहे की फुटपाथ हे नागरिकांना चालण्यासाठी नसून आपल्यासाठीच बांधण्यात आले आहेत. सर्व भारतीय नागरीकांस व्यवसाय करण्याचा हक्क आहे पण रस्त्यावर व फुटपाथ व्यापून किंवा त्यावर बसून नाही कारण तो कायद्याच्या चौकटीत बसत नाही.
[…]

विरोधाभास !

झाडे लावा झाडे जगवा असे जनसामान्य म्हणतो. पण एक झाड जीवन देते, वाढविते, पुष्ट करते, पर्यावरणाचे रक्षण करते. तर भ्रष्टाचार रूपी झाड मनाच्या मातीत रुजते आणि मानवाला सैरभैर करून सोडते. या झाडाची फुले व फळे विषारी असतात. वडाच्या झाडाला आलेली फुले व फळे औषधी असतात. याच्या पारंब्या जमिनीत खोल जाऊन झाडाला आधार देतात. तर भ्रष्टाचार रूपी झाडाच्या पारंब्या खोल जाऊन झाडाला पोकळ करतात.
[…]

ट्रेन प्रवासात स्त्रिया किती सुरक्षित?

मुंबईची लाइफलाईन समजल्या जाणार्‍या मध्य व पश्चिम रेल्वेच्या स्थापनेस शनिवारी ६० वर्षे पूर्ण झाली. परंतू प्रवाशांच्या सुरक्षेविषयी ६० वर्षात तेवढी सुधारणा झाल्याचे दिसत नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. मुंबईतील ८० टक्के जनता ट्रेनने प्रवास करते त्यात नोकरी करणार्‍या स्त्रिया, शाळा व कॉलेजात जाणारे विद्यार्थी/वाद्यार्थिनी, वृद्ध, अपंग, दृष्टीहीन यांचे प्रमाण खूप आहे. दळणवळ क्षेत्रात रेल्वेवेचा देशात पहिला नंबर लागत असेल परंतू प्रवाश्यांच्या सुरक्षेविषयी रेल्वे फारच उदासीन आहे असे सध्या घडत असलेल्या घटनांकडे बघितल्यास प्रकर्षाने जाणवते.
[…]

“ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज”

श्री गोंदवलेकर महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १८४५ साली (माघ शु.१२ शके १७६६) गोंदवल्यास झाला. त्यांचे मुळ घराणे माणदेशातील दहिवडी जवळ वावरहिरे या गावचे. त्यांचा मुळ पुरूष रूद्रोपंत व त्यांचे आडनाव घुगरदरे. घुगरदरे वासिष्ठ गोत्री शुक्ल यजुर्वेदी ब्राम्हण असून रूद्रोपंत पंढरीच्या विठ्ठलाचे एकनिष्ठ उपासक होते. महाराजांचे पणजोबा कुलकर्णीपण करण्यासाठी गोंदवल्यास येऊन स्थायिक झाले तरी पंढरीचीवारी घराण्यात कायम होती.
[…]

मुखवटे आणि चेहेरे !

बरेचजण दैनदिन जीवनात मुखवटे धारण करतात किंवा त्यांना करावे लागतात. अश्याच मुखवटे व चेहेर्यांचे कथन.
[…]

भ्रष्टाचार आणि उपाय !

माणूस जन्माने भ्रष्ट नसतो त्याला आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती तसेच इर्ष्या, अतृप्त इच्छा, हव्यास, दुर्बलता, लोभ, राक्षसी प्रवृत्ती भ्रष्टाचार करण्यास भाग पाडते त्यात श्रद्धा-सबुरीचा अभाव आणि अयोग्य मार्गदर्शनाने भ्रष्टाचारापेक्षा भयंकर अश्या विविध अत्याचारासारखी दुष्कृत्ये करण्यास उद्युक्त होतो. दैनंदिन जीवनात माणूस सर्व जगाला फसवू शकतो पण स्वत:च्या मनाला कधीच फसवू शकत नाही ती भिती कुठेतरी असतेच.
[…]

बोलण्याच्या ओघात……..!

आपल्या प्रत्येकाला काहीना काही सवयी व लकबी असतात. बोलण्याच्या ओघात, काहींना आपले मुद्दे मांडतांना व पटवून देताना हातवारे करून सांगण्याची सवय असते तर काहींना दातांने हाताच्या बोटांची नखे कुडतरत बोलण्याची व ऐकण्याची सवय असते. तर काही व्यक्तींना डोळे मिचकावत बोलण्याची सवय असते. असो.
[…]

रेनवॉटर हार्वेस्टींग काळाची गरज

वाढत्या लोकसंख्येच्या रेटयाने माणसांच्या मुलभूत गरजा भागवीताना सुखसोयी व विकासाच्या नावाखाली सुंदर वसुंधरेचे अगणित लचके तोडले जात आहेत याला कुणीही अपवाद नाही. पर्यावरणाचे ऐवढया प्रमाणात प्रदुषण होत आहे की तापमान वृद्धीने नैसर्गिक ऋतू बदलत आहेत. पाऊस कुठे कमी तर कुठे जास्त तर कधी अवेळी पडल्याने शेतकर्‍यांचे व नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे. पाणी टंचाईने शहर व गावातील माणसांना टँकरने किंवा मैलोंनमैल लांब जाऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
[…]

1 16 17 18 19 20 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..