नवीन लेखन...

घरगुती समारंभ साजरे करताना याचा विचार व्हावा…!

महागाई कमी व्हावी म्हणून रिझर्वबँकेने नामी युक्ती शोधून काढली. बँकांच्या सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याजांचे दर एक-दोन वेळा नाही तर चक्क १३ वेळा वाढविले तरीही महागाई काही अजून आटोक्यात येत नाही उलट त्याने विकासाची गती मात्र मंदावली. दैनंदिन जीवनात सातत्याने भेडसावणाऱ्या अडीअडचणींचे विशेषता महागाईचे गणित सोडवायचे असेल तर त्यासाठी चिंतन, शोध व अभ्यास करणे गरजेचे आहे.सध्या महागाईचे चटके सगळ्यांना एवढे लागत आहेत की त्या चटक्याने झालेल्या जखमा बरे होण्याची चिन्हे नाहीत. पेट्रोल, डिझेल, सीएनजी गॅस आणि घरगुती गॅससिलेंडर यांच्या किंमती वाढल्यामुळे जीवनोपयोगी आणि एकंदरच रोजच्या घरगुती वापरातील सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. इंधनाची मागणी कमी झाल्यास किमती स्थिर किंवा कमी होण्यासाठी मदत होईल आणि यासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी सार्वजनीक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करावा. याने दुसरा फायदा असा होईल की रत्यावरील खाजगी वाहनांची गर्दी कमी होऊन रहदारी सुटसुटीत होण्यास मदत होईल तसेच वातावरणात धूर आणि विषारी वायूंचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. प्रत्यके जण महागाई बद्दल कंठशोष करत असतो पण स्वत:च्या कृतीतून काही करीत नसतो. उलट कधीही बघा सोनाराच्या दुकानात दागिने घडविण्यासाठी किंवा खरेदीसाठी गर्दी असते. हल्लीचे दिवस अंगार सोन्याचे दागिने घालण्याचे आहेत का? तसेच इतर वेळी सिनेमागृह, हॉटेल्स, मॉल येथे नेहेमी तुडुंब गर्दी असते. जनतेच्या या कृतीतून कोणाला महागाईचे चटके लागल्याचे जाणवत नाही. प्रत्येक नागरिकाने आपल्या गरजा कमी करणे, काटकसर करणे, फाजील खर्च न करणे, दैनंदिन जीवनात आर्थिक नियोजन करणे व त्यांची कठोर अंमलबजावणी केल्यास मागणी आणि पुरवठ्याचे प्रमाण सम राहण्यास मदत होऊन बाजारात जीवनोपयोगी वस्तूंची नैसर्गिक च चण व्यापारी व साठेबाज करणार नाहीत. दोन पैसे शिल्लक राहून बचत होईल आणि महागाई आणि तदनुषंगाने होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यास मदत होईल. इतकेदिवस असे वाटत होते की फक्त सण व उत्सवांनाच स्पर्धेचे स्वरूप राजकारण्यांमुळे निर्माण झाले आहे पण सध्या सगळीकडे साखरपुडा, लग्न, मुंज व इतर समारंभांना स्पर्धेचे स्वरूप येऊ लागले आहे असे वाटते. सर्रास सर्वत्र असे दुष्य दिसते की साखरपुडा, लग्न, मुंज व इतर समारंभात नातलग व पाहुणेमंडळी कोंडाळे करून गप्पा मारत असतात. नातलग आणि पाहुणेमंडळी जेवण, फोटोसेशन आणि आहेर दिला की झाले एवढेच कर्तव्य समजून निघून जातात. मुंज केली की बहुतेक वेळा बटू एक दोन दिवस संध्या व गायत्री मंत्र म्हणतो पुढे जानवे खुंटीला आणि पळीपंचपात्र फडताळात. मला सांगा काय उपयोग झाला रुढी, परंपरांच्या संस्कारांचा? जीवनावश्यक संस्कारांना महत्व आहेच आणि ते ज्याच्या त्याच्या रुढी व परंपरे नुसार व्हायलाच पाहिजेत यात दुमत नाही. परंतू हे संस्कार करितेवेळी कळत नकळत मित्र व नातलगांशी स्पर्धा केली जाते आणि त्यावर होणारा खर्च कुठेतरी वास्तवाचे भान न ठेवता होतांना दिसतो. सध्याच्या आर्थिक मंदीचे चटके लागत आहेत हे कारण तर आहेच पण खरोखर एवढे पैसे खर्च करून वरील समारंभ करण्याची आवशकता आहे का? संस्कारांना महत्व आहे का खर्चाला? समारंभाला किती नातलग, पाहुणे व मित्रमंडळी जेवली, समारंभ कसा भव्यदिव्य व नेत्रदीपक होता, माझे सगळ्यांनी कसे तोंडभरून कौतुक केले? या विषयी प्रत्येकाने आत्मचिंतन, शोध व अभ्यास करणे काळाची गरज आहे आणि कळकळीची विनंतीही आहे. हा कोणाचा किंवा एखाद्या व्यक्तीचा व्ययक्तीक विचार असू शकतो. प्रत्येकाला कर्म स्वातंत्र्य आहे आणि हा जाच्यात्याच्या विचारसरणीचा भाग आहे. समाज अनुकरण प्रिय आहे आणि म्हणून ही एक सामाजिक चळवळ आणि बांधील की समजून प्रत्येकाने आपल्या कृतीतून या खर्चावर बंधन आणून पैश्याची बचत केली तर महागाई व त्या अनुषंगाने होणारे प्रदूषण आटोक्यात येण्यास हातभार लागेल. प्रत्येकालाच वाटत असते की परमेश्वराचा कृपाआशीर्वाद आपल्यावर असावा म्हणून काही माणसे देवाला सोन्याचा मुकुट व सिंहासन देऊन तो मिळविण्याचा प्रयत्न करतात पण अश्याने परमेश्वर प्रसन्न होतो का? हीच गोष्ट आपण जीवनात विशिष्ट संस्कार करते वेळी ते अवास्तव स्पर्धात्मक खर्च टाळणे गरजेचे आहे. सकारात्मक विचार आणि इच्छाशक्तीच्या जोरावर विशिष्ट संस्कार व दैनदिन जीवनात होणारा अतिरिक्त खर्च टाळून काही रक्कम आपला विश्वास असलेल्या संस्थेला देणगी स्वरुपात द्यावी जेणेकरून आपल्याला अभिप्रेत असलेले शांती, तृप्ती व समाधान मिळविता येईल किंवा मुलामुलींच्या भावी आयुष्यासाठी चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करावी जी त्यांना अडीअडचणीच्या वेळी उपयोगी येईल. संस्कार हे भक्ती, सेवा व कुठलीही अपेक्षा न ठेवता खरोखरच्या गरजवंताला दिलेल्या दानाच्या कृतीतून वाढत असतात. जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..