पर्यटकांसाठी काश्मीर खोरे खुले
काश्मीरसह भारताच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करून धुमाकूळ घालण्याचा कट ‘लष्कर ए तोयबा’ ने आखला आहे. शेकडो प्रशिक्षित सशस्त्र दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसणार असल्याची माहिती अबू जुंदाल याने दिल्ली पोलिसांना चौकशीत दिली आहे. मुंबईवरील हल्ल्यातील प्रमुख आरोपी असलेला अबू जुंदाल सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. लष्कर ए तोयबाच्या विशेष संपर्कात राहिलेल्या जुंदालच्या चौकशीतून अनेक गुपिते उघड होत आहेत. काश्मीरमधील शांतता दहशतवाद्यांना खुपत आहे.
[…]
