नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

शुद्धीसाठी गुरू

कितीक वेळा धुतला कोळसा,  रंग न बदले त्याचा  । उगाळता झिजून जाई,  परि काळेपणा कायमचा  ।। भट्टीत घालून त्यास जाळता,  घेई रंग लाल कसा  । शुभ्रपणा हा दिसून येतो,  राही न जेंव्हा कोळसा  ।। मलीनता ही मनामधली,  खोल  रूजली असे  । विचारांतील तर्कज्ञान ,  शुद्धीसाठी पुरे नसे  ।। गुरू लागतो अग्नी सारखा,  चित्त शुद्धी करिता  । […]

विश्वासातील शंका

एक लहानशी घटना परंतु अध्यात्म जगांत एक महान तत्वज्ञान सांगून जाते. श्री कृष्ण एकदा जेवण्यासाठी बसले होते. रुख्मिनी त्याना जेवन वाढीत होती. अचानक श्रीकृष्ण उठले व लगबगीने जावू लागले. ते घराच्या दारापर्यंत गेले. ते क्षणभर तेथेच थांबले. थोडावेळ थांबून परत आले. पुन्हा जेवण्याच्या पाटावर बसले. रुख्मिनीला हे सारे अघटीत वाटले. तीच्या लक्षांत  श्रीकृष्णाच्या ह्या हालचालीचा अर्थ […]

जीवन एक “जाते”

जात्याच्या पात्यामध्ये, भरडला जाई दाणा  । दोन चाकांत येईल,  मोडेल त्याचा कणा  ।। जीवन मृत्यूची चाके,  सतत फिरत राही  । येई जो मध्ये त्याच्या,  मागे न उरेल काही  ।। मध्यभागी राही स्थिर,  आंस त्यास म्हणती  । वरचे चाक फिरे,  त्याच्या भोवती  ।। आंसाजवळील दाणा,  दूर तो चाकापासूनी  । परिणाम चाकाचा तो होईल,  मग कोठूनी  ।। जन्म […]

रचली जाते कविता

मिळता मजला बाह्य एकांत, छळते गर्दी विचारांची मन गुंतविण्या कुणी नसता, चलबिचल होते भावनांची…१, शब्द वर्णांचा घेवून आधार, भावना काढी मार्ग आपला आविष्कार घडविण्यासाठी, विचार करितो मदत तिला…२, शब्दांना नटवी थटवी, ध्वनी लहरी नि सूर गेयता अलंकार मिळता अंगी, रचली जाते एक कविता…३   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com        

सदैव जागृत रहा

झोप घ्या हो शांत, जागृत राहूनी तुम्ही, विचित्र वाटे ही रित, परि येई तुमचे कामी …१ विश्रांती लागत असते, गरज म्हणून शरिराला ती तर मिळत नसते, केव्हांही तुमच्या मनाला ..२ चंचलता हा स्वभाव, आहे आपल्या मनाचा, शांत करण्या मना, उपाय नसे झोपेचा..३ एकाच दिशेने धावूनी, मिळवते मन विश्रांती एकाग्र चित्त असणे, उपाय हाच त्यावरती…४ चित्त करूनी […]

मुरब्बी

लोणच्याला चव येते, थोडे मुरल्यानंतर  । आंबाही स्वादिष्ट लागे, आंबून गेल्यानंतर….१, विचारांची मजा वाटे, ऐकता ज्ञानी विचार  । परिपक्वता त्यांच्यातील, देई आनंदाला धार…२, परिपक्वता येण्यासाठीं, अनुभवाची भट्टी हवी  । ज्ञान चमकते, जेव्हां तर्कज्ञान पाही….३, विचारांत मुरलेला, मुरब्बी तो असतो  ।। अनुभवाच्या शक्तीनें, योग्य पाऊल टाकतो…४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com       […]

जागृत आंतरात्मा

कोण उठविते प्रात:समयी निद्रेमधूनी, न ऐकीली कधीही हाक तयाची कानी ।।१।।   चाळविली न निद्रा शरिरा स्पर्श करूनी, नित्य जागवी तरीही तीच वेळ साधूनी ।।२।।   निद्रेसाठी जाण्यापूर्वी प्रभू वंदन केले, प्रात:काळी ध्यान करावे हेच मनी योजिले ।।३।।   नाम प्रभूचे घेता घेता डोळे मिटले, निद्रेच्या आधीन जाता जग परि विसरले ।।४।।   तोच अचानक जाग […]

संधी

गंगा आली मार्गामध्ये         तहान आपली भागवून घे संधी मिळता जीवनामध्ये     उपयोग त्याचा करून घे ठक ठक करुनी दार ठोठवी      संधी अचानक केव्ह्ना तरी गाफील बघुनि चित्त तुझे        निघून जाईल ती माघारी चालत राही सुवर्ण संधी           हाका देवूनी वाटेवरी बोलविती जे प्रेमाने  तिज       सन्मान तयांचा सदैव करी धुंदी मध्ये राहून आम्ही       चाहूल तिची विसरून जातो जीवनातले अपयश बघुनी       नशिबाला परी दोष देतो यशस्वी ठरती तेच जीवनी      उपयोग करुनी  संधीचा साथ देऊनी प्रयत्न्याची        मार्ग निवडती योग्य दिशेचा डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

जीवन गुलाबा परि

जीवन असावे गुलाबा सारखे, सहवासे ज्याच्या मिळताती सुखे ।।१।। सुगंध तयाचा दरवळत राही, मनास आमच्या समाधान होई ।।२।। नाजूक पाकळ्या कोमल वाटती, सर्वस्व अर्पूनी गुलकंद देती ।।३।। विसरूं नका ते काटे गुलाबाचे, बसती लपूनी खालती फुलांचे ।।४।। सुखाचे भोवती सावट दु:खाचे, जीवन वाटते झाड गुलाबाचे ।।५।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

वेळेची किमया

वेळ येता उकल होते, साऱ्या प्रश्नांची  । जाणून घ्या तुम्ही, रीत निसर्गाची…१, जेंव्हां यश ना मिळते, एखाद्या प्रश्नी  ।। वेळ नसे योग्य आली, हेच घ्यावे जाणूनी…२, प्रयत्न सारे चालूं ठेवतां, यश ना मिळे  । कांहीं काळासाठी थांबवा, प्रयत्न सगळे…३, काळ लोटतां प्रयत्न होती, पुनरपि सारे  । उकल होऊन गुंत्यांची, आख्खे निघती दोरे…४, कुणी म्हणती ग्रह अनूकुल, […]

1 139 140 141 142 143 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..