शांततेचे स्वप्न
जिथे नसावा गलबला, गलका, कोलाहल काही काळालाही शाप नसावा, लगबग वा घिसाडघाई मनस्ताप वा कसली चिंता, गोंगाटही नाही शांततेला मग धीर यावा, नीरवता जिवंत व्हावी ॥ असावी शांततेला एक वात्सल्याची झाक काळालाही नसावा वेळेचा काही धाक ऐकू यावी अंतरीची केवळ हळूवार हाक समाधि लागावी या जगाची न उरे जाग ।। जिथे विहरावा वारा मुक्त आपुलकीचा आज […]
