जगरहाटी
मी शांत बसलेला असताना मी एकटा असतो; स्वत:शीच जगापासून दूर… मी जगाचा तिरस्कार करतो हे जग स्वार्थी आहे, ढोंगी आहे भयानक क्रूर आहे, आपमतलबी आहे हे जग माझ्यासाठी नाही मी या जगाचा धि:कार करतो माझ्यापुढे ठाकलेला असतो आदर्शाचा हिमालय सुंदर, स्वच्छ, स्फटिकधवल दूरदूरुन मला खुणावत असतात विवेकानंद, राम नावाची त्या हिमालयाची उंच शिखरे शिवाजीच्या असामान्यतेची विविधरुपे […]
