श्री अंबिका योग कुटीर ठाणे – एक सेवाव्रती संस्था
ही कथा आहे जवळजवळ सत्तर वर्षांपूर्वीची. तत्कालीन मुंबई इलाख्याच्या पोलीस खात्यामध्ये काम करीत असलेल्या पुंडलिक रामचंद्र निकम नावाच्या कॉन्स्टेबलची, म्हणजेच परमपूज्य हठयोगी निकम गुरुजी यांची. त्यावेळी कोणाला कल्पनाही नसेल की ही व्यक्ती किती महान बनणार आहे व केवळ स्वकर्तृत्वाचे बळावर योग क्षेत्रामध्ये आपली छाप पाडणार आहे. […]
