नवीन लेखन...

रामायण – नेतृत्व गुणधर्म

रामायण हा भारताचा गौरवशाली इतिहास आहे. देव, नर, वानर, राक्षस ह्या सर्व मानव जातीच होत्या. त्यांच्यामधील परस्पर संबंध, रावणाची दहशत, त्या दहशतीचा कायमचा नि:पात करण्यासाठी राम जन्माला येण्यापूर्वीच त्याकाळच्या सक्रिय ऋषीवृंदाने केलेला रावण वधाचा संकल्प व ह्यासाठी एकत्र येऊन कोणी कोणी काय काय करायचे या तपशीलासह केलेली योजना व रामाच्या माध्यमातून तो रावणवध प्रत्यक्ष घडवून आणणे हे सर्व त्यावेळच्या जागतिक राजकारणाचे रोमहर्षक वर्णन वाल्मीकिंनी रामायणात केलेले आहे.  […]

कौल रघुनाथाचा

कौल रघुनाथाचा हे 27 ओळींचे अत्यंत मौलिक असे वेणास्वामीने रामरायाला मागितलेले पसायदान आहे. कौल म्हणजे आधार, आश्वासन, संमती. या कौल रघुनाथामध्ये वेणास्वामींनी आपल्या कल्पनेने रामरायाच्या राज्याभिषेकाचे वर्णन फार सुंदर शब्दात केले आहे. […]

स्वाध्याय

उपनिषदातील अनुशासनात ज्या अनेक आज्ञा केल्या आहेत त्यातील एक आहे ‘स्वाध्यायान्मा प्रमदः म्हणजे स्वाध्यायात प्रमाद ‘होऊ नये. यथास्थित स्वाध्याय घडावा यासाठी काही व्रतांचे आचरणही त्यात आलेले आहे. ऋत स्वाध्याय प्रवचने, सत्यं स्वाध्याय प्रवचने – इत्यादी, थोडक्यात सदाचरण, सत्यनिष्ठा, संयमित जीवन इत्यादींनी स्वाध्याय संपन्न असावा. […]

वरळी चाळ ते दुबई – गिनीज रेकॉर्ड

मेहनत, जिद्द, काहीतरी वेगळे करण्याची धडपड, प्रवाहाविरुद्ध जाणे आणि हे करताना जीवनसखीची जोड असली की, माणसाचे आयुष्य कमालीच्या उंचीवर झेप घेते, याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे अशोक कोरगावकर. एक काळ वरळीतील चाळीत घालवलेल्या अशोक कोरगावकरांच्या नावे आज दुबईत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची नोंद आहे. व्यवसायाने स्थापत्यतज्ज्ञ अर्थात आर्किटेक्ट असलेले अशोक कोरगावकर यांच्यामुळे मुंबईचे नावही आज आखाती देशात गाजत आहे. […]

जनसंघाचे प्रथम महामंत्री दीनदयाळ उपाध्याय

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला. […]

श्रद्धा

बुद्धीच्या कक्षेत न येणारे ज्ञानही श्रद्धायुक्त अंतःकरण असल्यास प्राप्त होते असे म्हटले जाते. आयुष्यात श्रेष्ठतम गणलेले सम्यम् ज्ञान कसे प्राप्त होईल? त्यासाठी काय असणे आवश्यक आहे? […]

श्रीराम कथा सदा विजयते

अशी ख्याती प्राप्त झालेली राम कथा म्हणजे वाल्मिकींच्या अलौकिक प्रतिभेचा अनुपम आविष्कार! वाल्मीकिंनी रचलेले रामायण हे महाकाव्य म्हणजे संपूर्ण विश्वाच्या साहित्यातील पहिले महाकाव्य होय. म्हणून त्यांना आदिकाव्य आणि महर्षी वाल्मिकींना आदि कवी संबोधिले जाते. या ग्रंथात कवीने 24000 संस्कृत श्लोक 7 कांडामध्ये विभागून संपूर्ण श्री रामचरित्र अत्यंत कौशल्याने गुंफले आहे. […]

वनवासींचे राम

आपला 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येला परत आले, तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. वनवासाला गेलेला राजा राम परत आला तो प्रभू रामचंद्र म्हणून. यामागे तपश्चर्या होती. त्याग होता. समर्पण होते. सर्वांना हृदयात सामावून घेण्याचे लोकोत्तर गुण होते. […]

सौभाग्यलेणं – जोडवी

जोडवी हा मंगळसूत्रानंतर घातला जाणारा सौभाग्यलंकार आहे. सप्तपदी दरम्यान नववधूच्या पायात जोडवी घालण्याचा स्वतंत्र विधी असतो. म्हणजेच मंगळसूत्र आणि जोडवी हे दोन अलंकार सौभाग्याचे प्रतिक मानले जातात. ते आयुष्यभर ठेवण्याची प्रथा आहे. […]

सोंभाग्यलेणं – पैंजण

स्त्रियांच्या पायातील पैजण हा एक अलंकार अगदी लहान वयापासून पायात घातला जातो. पायातील पैंजण लहान मुलांना घालतात त्याला वाळे म्हणतात. वाळे लहान मुलं ,मुली दोघांनाही घालावयाचा अलंकार आहे. […]

1 2 3 219
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..