नवीन लेखन...
Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

छंद

बरेच नानाविध छंद अनेकजण जोपासतात अन् त्याच छंदांना आपल्या जगण्याचं , उत्पन्नाचं साधन बनवतात. जो छंद आपण जोपासतोय त्याच क्षेत्रात काहीतरी करायला मिळणं याहून सुंदर अनुभव, समाधान आणि आनंद दुसरा कुठलाच नाही. […]

मिसळ अशांना ‘पावा’यची नाही रे!

अर्थात वर वर्णन केलेले ‘मिसळखाऊ’ आणि अशी ‘मिसळ’ मिळणारी हॉटेल तुम्हाला पुण्यात, कोल्हापुरात किंवा नाशकात नाही मिळणार. हा, ऊपनगरात मिळाली तर मिळतील. पण गावाकडे मात्र तुम्हाला हमखास अशी ‘प्रसिद्ध मिसळ’ची हॉटेल मिळतीलच मिळतील. हे झाले मिसळपुराण. पण हे मिसळ वाले ‘भाऊ’ ‘तात्या’ ‘रामा’ हे एक वेगळेच आणि त्यांच्या मिसळसारखेच चटकदार प्रकरण असते. आमचा मिसळवाला रामाही त्याला अपवाद नाही. […]

आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी…

आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे ! फापट पसारा आवरून सारा , आता सुटसुटीत व्हायचं आहे ! याच्या साठी त्याच्या साठी , हे हवं , ते हवं इथे तिथे – जाईन जिथे , तिथलं काही नवं नवं हव्या हव्या चा हव्यास आता प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे, बॅग हलकी स्वतः पुरती आता फक्त […]

रस्त्याचं दुखणं

औरंगाबाद जळगांव रस्ता खराब आहे, हे समजायला मोठ्या हाॅस्पीटलमधे जाऊन पैसे खर्च करून घ्यावे लागतात, ही झालेली प्रगती काय कमी आहे ? […]

अमेरिका अमेरिका

सिअँटल एक मोठं शहर..समुद्रकिना-यावरचं…बेलेव्ह्यु सिअँटलचंच उपनगर…पण दोन्ही ठिकाणच्या चलनवलनात बराच फरक…अगदी पुण्याच्या गंज पेठेत आणि बाणेर -औंध मधे आहे तसाच… हिरव्यागार टेकड्या टेकड्यांवर वसलेलं…हे एक नितांत सुंदर टुमदार शहर….मोकळे ढाकळे रस्ते.. विकएंडमुळे रस्त्यांवर रहदारी कमी..सुट्टीच्या दिवशी मुंबईच्या फोर्ट भागात असतं तसं… […]

दोन पेगची मजा

थोडी थोडी प्या घाई करायची नाही दोन पेगची मजा चार पेगमध्ये नाही नको तो हॅंगओव्हर दुसरा दिवसही छान पिताना राहू द्या थोडे तरी भान फुकट मिळाली तरी जास्त ढोसू नका घ्या तुम्हीच काळजी नको ते वका वका ग्लासकडे लक्ष द्या खम्ब्याकडे नको मला घरी सोडा मित्रांना विनंती नको चालता आले पाहिजे चालविता आली पाहिजे आपल्याच घरी […]

मे महिन्याची सुट्टी

पोरांना मे महिन्याची उन्हाळी सुट्टी पडली की घरातल्या बायकांना जरा निवांतपणा मिळतो मग याच उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग या बायका इतर वार्षिक घरगुती पदार्थाच्या साठवणीने करतात. जसं कि, चिनीमातीच्या बरण्यांमध्ये लोणचं बनवून वर्षभरासाठी मुरवत ठेवणे, लाल मिरची, शंकासुरी मिरचीचे लाल मसाले (कांडायला) दळायला देणे, नानकटाया बनवून बेकरीत भाजायला देणे, आमपोळ्या, फणसपोळ्या, मुरांबा बनवणे, फणसाचे काप तळणे वगैरे. […]

आयुष्याचा निर्णय कुणाचा ?

आपलं आयुष्य कसं असावं हा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. जे विद्यार्थी आई वडिलांनी पसंतीचं करीयर करू दिलं नाही म्हणून आपल्या अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडतात. तसंच घरच्यांचा विरोध असतांनाही व्यसनं करतात, आपल्याच पसंतीचा जोडीदार आणतात. ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की आपल्याला जेथे सोईस्कर असते तिथे आपण आपले निर्णय घेतो आणि इतर ठिकाणी आपल्या त्रासाचा किंवा अपयशाचा दोष दुसऱ्यांना देतो. […]

बॅड पॅच- एक संघर्ष…!!!

प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी ‘बॅड पॅच’ येतो. शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात, करीयर मध्ये काहीतरी बिघडतं, नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं, व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो, पैशांची बिकट वाट लागते… नड येते ….. आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!! […]

गुरुबोध मात्र विसरू नकोस….

रोज थोडे तरी कार्य केल्यावाचून राहू नकोस, ब्रह्यांडनायक पहातायेत तुला गुरूबोध मात्र विसरु नकोस…. तुझ्या वाटेत आडवे खूप येतीलही… पायात पाय घालून पाडवतीलही…. घाबरून त्यांना तू तुझं उभे राहणं सोडू नकोस.. सद्गुरू पहातायेत तुला गुरूबोध मात्र विसरू नकोस तुझं कौतुक प्रत्येकाला इथं रुचेलच असं नाही… कौतुकासाठी तुझं नाव सुचेलच असंही नाही… तू मात्र इतरांचं कौतुक करण्यास […]

1 32 33 34 35
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..