नवीन लेखन...
Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

डस्टबिन

नका हो नका लादू माझ्यावर रोजरोजच हे शिळेपण…. जरा पहा डोळे उघडून…. मीही एक माणूस आहे….डस्टबिन नाही !! उरलं अन्न, शिळ्या भाज्या घालतेच रोज याच्या पोटात नको वाटे वाया जाया, पण हे का रोज माझ्याच वाट्यात दिवसभराचा शीण, त्रागा आणि चिडचिड तुमची साचलेली गरळ नि मळमळ… चक्क येता नि सरळ ओतून देता या गृहीत धरलेल्या डस्टबिनपोटी […]

मोह

मोह होतोय मोहाचा स्वछंदी मोकळ जगण्याचा गगनातल्या उंचचउंच भरारीचा मुक्त उन्मेषी श्वासांचा स्वतःमध्ये रमण्याचा नि सुंदर रंग झेलण्याचा खळखळून बागडून हसण्याचा नि आनंद सोहळ्यात हरपण्याचा मोह वाटे इंद्रधनू रंगांचा गंधित भारित शहाऱ्यांचा मोहासंगे झुलण्याचा .. प्रवाहात वाहत जाण्याचा मोह नव्या उमेदीचा नि नव्या वाटा शोधण्याचा…. — वर्षा कदम.

बाई

एक बाई पाहिजे… घराला मायेच घरपण देण्यासाठी, चार भिंतींना बांधून ठेवण्यासाठी एक आई पाहिजे… संस्कारांची शिदोरी देण्यासाठी, मायेनं कुशीत घेण्यासाठी एक ताई पाहिजे… हक्काने पाठीशी घालण्यासाठी, मनातलं गुपित सांगण्यासाठी एक उमलती जाई पाहिजे… आपलं बालपण पाहण्यासाठी, प्रेमाचा झरा वाहण्यासाठी एक जाईची आई पाहिजे… आपलं सुखदुःख वाटण्यासाठी, साठीला साथ देण्यासाठी एक मायेची अंगाई पाहिजे…. निवांत घरट्यात विसावण्यासाठी, […]

शेवटी जगणं सोडू नको

जाणिवा ओल्या हव्या सखे शब्दांचं कोरडेपण नको शुभेच्छा ते श्रद्धांजली एकाच मापात तोलणं नको दिवसामागून रात्री जातात तसेच प्रहर ढकलू नको एक एक क्षण जगून घे शेवटी राहीलं जगायचं असं नको भेटून घे हवं त्याला नुसते आभासी चेहरे नकोत नाहीतर किमान बोलून बघ फक्त लेखणीचे खेळ नकोत माझ्यातला ‘मी’ शोधून बघ एकांत हवाचं एकटेपण नको छंदांत […]

चिऊताई

चिऊताई चिऊताई भिजतोय गं मी, दार उघड तू नको माझ्या घरात,जा कुठेतरी दड चिऊताई चिऊताई कुडकुडतोय गं मी, दार उघड उठ जा इथून रे, मला नाही सवड चिऊताई चिऊताई खिडकीचे तरी कवाड उघड खिडकीतून येईल पाणी नकोचं ती धडपड चिऊताई चिऊताई मनाचे तरी दार उघड मला ऐकायचीचं नाही तुझी बडबड चिऊताई चिऊताई मी गेलो, आता तरी […]

मुक्त

झुगारून द्यावीत बंधने स्वतःची मनाची, तनाची नि बांधल्या बंधांची, अदृश्य बेड्यांची नि भावनिक गुंत्यांची! ओलांडून यावेत उंबरठे लोकलाजेचे मान नसलेल्या दाराचे नि नासलेल्या शेवाळी नात्यांचे! उधळून लावाव्यात शेजा रत्नमाणकांच्या हवा कशाला मोह त्या सोन्याच्या पिंजऱ्याचा पारतंत्र्यात हरवतात जाणिवा किमान जगण्याच्या! पेटवून द्यावेत लोळ तप्त आगीचे वडवानलाचे नि धगधगत्या निखाऱ्यांचे ओतावे स्वत्व त्यात बनण्या कणखर लोहाचे! तुडवावी […]

खरी संक्रात

आज संक्रातीचा गोड सण शुभेच्छांसाठी आला ताईचा फोन सांगे खुशाली अन मोकळे करे मन जिवाभावाच्या गोडव्याचा सण आज संक्रातीचा गोड सण सांगे ती केलीत घरी, किती पंचपक्वान्न सुग्रास ताटभरुन आहे इथे अन्न सोबतीला आहे पुरण नि वरण आज संक्रातीचा गोड सण विचारे आता खुशाली भाच्याला पण सांग म्हणे काय छान जेवलास जेवण केलेस का नवे कपडे, […]

भोग

तुला जाणवल कसं माज जगणं, सोसणं वाट पाहून राह्यले कधी सरल ह्ये जिणं घाम गाळू तरी किती किती जुंपू गं कामाला दिस सरूनही जातो थार नाही गं जीवाला तुज्या अंगणी सडा गं जाई जुई चमेलीचा कशी गुंफू केसात गं गुंता घामाच्या बटांचा सण येती आणि जाती बाया जिवाने नटती बघू बघू तुटती गं काया उनात रापती […]

सुखाचा छंद

सुखाचा छंद,न लागो जीवाला आहे तो निवारा, अपुला बरा मोहविते कायम, सुखाची जरतार वेदनेचे ठिगळ, मिरवूया जरा सुखावते सारे,फुलणारे रंगपिसारे एकचि रंग सावळा, अपुला बरा दुखावते मन, यातना कठीण गोंजारु तयाला, लाडाने जरा सुख हे क्षणिक, मृगजळ जाण शोधावा निवारा, समाधानी खरा तुझे माझे काही, कमी नि अधिक आहे त्यात सुख, मानावे जरा! — वर्षा कदम.

मुखवटा

मुखवटे स्वतःचे चक्क फाडून द्यावे कि कुणाला तरी उधार जरा द्यावे जगाला, नात्याला चांगले ते दिसावे उरात दुःख बाळगून खोटे उगी हसावे चेहरा आर्त वेदनेचा न कुणाला दिसावा कृत्रिम रंगलेला रोज मुलामा चढवावा टांगते झुले ते भूत भविष्याचे सुरक्षित झापडांचा मुकुट मिरवावा नको नकोसे होते न सापडे खरा निवारा जेथे मिळे तेथे वारा स्वार्थाचा वाहणारा!! — […]

1 24 25 26 27 28 35
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..