तेजोवलय (Aura) भाग २

वैशाली देशपांडे यांच्या WhatsApp वरुन आलेल्या लेखाचा हा दुसरा भाग…


नमस्कार मंडळी,

आपण पाहिले की तेजोवलय उर्जास्वरूपात असल्याने ज्यांचे आज्ञाचक्र किंवा तृतीय नेत्र विकसित झाला आहे, जसे थोर संत, योगी, किंवा अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती, यांना ते सहज बघता येते.

1939 साली सायमंड कीर्लियन या एका रशियन शास्त्रज्ञाला इतर काही संशोधन करत असता अपघातानेच अशा एका तंत्राचा शोध लागला ज्यायोगे त्याला मशिनद्वारे तेजोवलय बघता आले. त्याने त्या तेजोवलयाचे छायाचित्र (photograph) घेतले. व तेजोवलयावर आणखी संशोधन करून Aura किंवा तेजोवलय खरोखर अस्तित्वात असते हे सिद्ध केले. ह्या तंत्राला कीर्लियन फोटोग्राफी असे नाव पडले.

भारतात प्राचीन काळी ऋषीमुनींना त्यांच्या यौगिक सामर्थ्याने तेजोवलयाचे सर्व ज्ञान होते व ते त्यांना सहज पहाता येत असे. तेजोवलयाला सुद्धा विविध रंग असतात आणि त्या रंगांना अर्थ असतात, किंवा रंगांमधून आपल्याला तेजोवलयाबद्दल अधिक माहिती मिळते ह्याचे सखोल ज्ञान आपल्या अंतर्चक्षूंद्वारे त्यांना होते. यावर अनेक पौराणिक आणि इतर ग्रंथांमध्ये माहिती उपलब्ध आहे. कीर्लियन फोटोग्राफीने घेतलेल्या तेजोवलयाच्या छायाचित्रात सुद्धा असे विविध रंग आढळून आले. आणि अखेर आधुनिक विज्ञानाने तेजोवलयाचे अस्तित्व मान्य केले. गुगल वर कीर्लियन फोटोग्राफी या विषयावर सर्व माहिती उपलब्ध आहे.

तुमचे तेजोवलय ही तुमची पर्सनल सिग्नेचर म्हणता येईल. जो माणूस आंधळा आणि बहिरा आहे, तो सुद्धा त्याच्या जवळ येणाऱ्या इतर लोकांचे अस्तित्व बरोब्बर ओळखतो.. सांगू शकाल , कसे..? कारण, देवाने दिलेल्या पंचेंद्रियां पैकी जेव्हा एखादे काम करत नाही तिथे बाकीची वइंद्रिये अतिसंवेदनशील होतात. ही लोकं इतरांचे अस्तित्व त्यांच्या तेजोवलयावरून ओळखतात. प्रत्येक माणसाकडे तेजोवलय बघायची, ते ओळखायची, त्याचा अर्थ जाणून घ्यायची जन्मजात क्षमता आहे. फक्त ती विकसित करावी लागते.

तेजोवलय clean आणि strong का ठेवावं..?कारण याचे खूप फायदे आहेत.
1. आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम रहातं.
2. आपलं आपल्या भावनां वर नियंत्रण रहातं. व्यक्तिमत्व balanced रहातं.
3. व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी होतं. नातेसंबंध.. जो आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे.. ते छान रहातात. सर्व आघाड्यां वर यशप्राप्ती होते.
4. तुमची intuitive power वाढते.
5. तुम्ही तुमच्या स्वतः च्या प्रकाशात रहाता. Victim होण्यापासून किंवा इतरांच्या प्रभावा पासून दूर राहता.

पहिल्या भागात बघितल्या प्रमाणे कुठल्याही interaction किंवा नातेसंबंधां मधे (personal, professional, social) ऊर्जेची देवाणघेवाण होत असते.

अगदी दैनंदिन आयुष्यात बघायचं झालं तर आपण सकाळी उठून आवरून आपल्या ऑफिसला जायला निघतो..( घरातल्या कटकटी असतील तर त्याही आल्या ) जाताना रस्त्यात ट्रॅफीक मधे इतर वाहन चालकांबरोबर वाद होतो..किंवा ट्रेन मध्ये गर्दीत उभे असताना कोणी ओळखीचा भेटतो आणि तो आपल्या अडचणींचा पाढा वाचतो.. ऑफीस मधे बॉस किंवा सहकाऱयां बरोबर अनबन होते..असं बऱ्याच लोकांशी आपलं interaction होत असतं.. सकारात्मक संवाद असेल तर ठीक पण बऱ्याचदा नकारात्मक बोलणं होतं आणि लोकांच्या विचारां मधली, बोलण्यातली ऊर्जा आपल्या तेजोवलयामधे येते.. आपली त्यांच्याकडे जाते. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा रात्री घरी येता तेव्हा विचार करा की किती जणांची नकारात्मक ऊर्जा तुम्ही घेऊन येता.

खालील कारणां मूळे तेजोवलय संक्रमित किंवा दूषित होऊ शकतं..
1. नकारात्मक विचार, भावना, शब्द, कृती, आपली किंवा इतरांचीही
2.भीती (social conditioning, beliefs)
3. Low self esteem, low self confidence, lack of self love.
4. कुसंगत
5. कोमा, ऑपरेशन, ऍक्सिडेंट, मानसिक धक्का
6. दुसऱ्याचे जाणीवपूर्वक फेकलेले वाईट विचार किंवा intentions
7.वाईट जागा, अपवित्र स्थळे
8. नशा, इतर वाईट सवयी
8. All internal and external factors beyond our control.

तेजोवलय दूषित असेल तर पुढील लक्षणे आढळतात..
1. अकारण भीती, सतत चिडचिड, राग, चिंता, मत्सर, depression.. Emotional imbalance.
2. Strained relationships
3. Accidents, अडचणी.
4. Imbalanced personality and life.
5. अनारोग्य

वरील लिस्ट वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की जशी आपण दररोज शरीराची स्वच्छता ठेवतो तसेच तेजोवलय clean ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हे केलं नाही तर उर्जारूपात जो नकारात्मक कचरा तिथे साठत जातो, त्याने हळूहळू आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

तेजोवलय clean ठेवणं अतिशय सोपं आहे. आपल्या पूर्वजांनी यासाठी वागण्याचे खूप छान नियम, रीतीरिवाज घालून दिले आहेत. आपण आजही त्यातील बरेचसे नियम पाळतो. बदलत्या काळानुसार काही पाळणं शक्य नसतं. पण तरीही आधुनिक जीवनशैलीशी सांगड घालून, याविषयीचे आवश्यक ज्ञान घेऊन, आपण काही छोटे बदल केले, नियम केले, तर आपण आपले तेजोवलय रोजच्या रोज नक्की cleanआणि strong ठेवू शकतो.

पुढच्या भागात आपण आपण यासाठीचे उपाय बघू आणि तेजोवलया संबंधी अधिक जाणून घेऊ.

पहिल्या भागाची लिंक कॉमेंट मध्ये देत आहे.पुन्हा भेटूच..

– वैशाली देशपांडे
17.04.2017

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..