अनुकरण सोडा

अनुकरण करणे हा स्वभाव

काय मग म्हणू मी त्याला हो…।।धृ।।

 

स्वतंत्र बुद्धि तुम्हां असूनी

निर्णय शक्ति असते मनीं

दुजाचे जीवन यश बघूनी, अनुकरण त्याचे करता हो….१,

अनुकरण करणे हाच स्वभाव,  काय मग म्हणू मी त्याला हो …

 

त्याची स्थिती वेगळी होती

म्हणून यश पडले हातीं

वातावरण निराळे असती

तुम्हास सारे हे कळते हो…..२,

अनुकरण करणे हाच स्वभाव,  काय मग म्हणू मी त्याला हो …

 

यशस्वी ठरला कुणी एक

जेव्हां केले प्रयत्न अनेक

विसरू नका नशीब ठिक

जे यशांत सहभागी होते हो….३,

अनुकरण करणे हाच स्वभाव,  काय मग म्हणू मी त्याला हो…

 

सोडून घ्या अनुकरण ते

निर्णय घ्या जे बुद्धी सांगते

तुमचा आत्मा प्रभू असूनी

त्याजवरती विश्वास करा हो…..४

अनुकरण करणे हाच स्वभाव,  काय मग म्हणू मी त्याला हो …

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 



About डॉ. भगवान नागापूरकर 1252 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…