नवीन लेखन...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा वर्धापन दिन

मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले व २० जून १८८७ रोजी वापरण्यास सुरुवात झाली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे.
सीएसएमटी हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे.

१८७८ मध्ये या स्थानकाच्या बांधकामाची सुरुवात झाली. या स्थानकाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी दहा वर्ष लागले. त्या काळात कोणतीही इमारत बांधण्यासाठी लागलेला सर्वाधिक वेळ आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे स्थानक मुंबईतील सर्वात मोठे रेल्वेस्थानक असून त्याची उभारणी आणि त्याच्यावरील नक्षीकाम हे पाहण्याजोगे आहे.सीएसएमटी स्थानकात प्रत्येक दिवशी हजारो नागरिकांची वर्दळ दिसून येते. या स्थानकाची रचना ही लंडनमधील सेंट पॅकार्स रेल्वे स्थानकाशी मिळतीजुळती आहे.

सीएसटीएमटी स्थानकाची रचना ही व्हिक्टोरियन इटालियन गॉथिक रिव्हायवल प्रकारची आहे. त्याचसोबत युनेस्कोचे जागतिक वारसा लाभलेले असे हे रेल्वेस्थानक आहे. सीएसएमटीच्या परिसरात अनेक पर्यटक सुद्धा तेथील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी जगभरातून येत असतात.

या स्थानकाची रचना फेड्रीक विल्यम स्टीव्हन्स या ब्रिटीश स्थापत्यकाराने केली आहे. या कामासाठी फेड्रीक यांना त्याकाळी १६ लाख १४ हजार रुपयांचे मानधन देण्यात आले होते.

स्थानकाच्या मुख्यभागी असलेल्या घड्याळाखाली क्विन एलिझाबेटचा पुतळा होता. मात्र १९५० साली भारत सरकारच्या आदेशानुसार सर्व इमारतींवरील ब्रिटिशांचे पुतळे हटवण्यास सरुवात करण्यात आली. त्यामध्येच हा पुतळाही काढून टाकण्यात आला. हा पुतळानंतर १९८० पर्यंत राणीच्या बागेत उघड्यावर पडून होता. नंतर त्याचे काय झाले यासंदर्भात माहिती अधिकारा अंतर्गत दिलेल्या अर्जात या पुतळ्यासंदर्भात सरकारकडे कोणतीची माहिती नसल्याचे समोर आले. हा पुतळा तस्करीच्या माध्यामातून भारताबाहेर नेऊन विकण्यात आला किंवा नष्ट करण्यात आला असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मार्च १९९६ पर्यंत या स्थानकाचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) असे होते. मात्र या स्थानकाचे नामकरण करुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) असे ठेवण्यात आले.

मार्च १९९६ ते जून २०१७ दरम्यान हे स्थानक छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) नावाने ओळखले जायचे. २०१७ साली जून महिन्यामध्ये स्थानकाच्या नावात महाराज हा शब्द लावण्यात आला आणि तेव्हा पासून हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) म्हणून ओळखले जाते.

सीएसएमटी स्थानकामध्ये १८ फलाट असून फलाट क्र. १ ते ७ हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकाचे आहेत.
फलाट क्र. ८ ते १८ हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या पॅसेंजर / जलद गाड्या मार्गस्थ होतात.

महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी छत्रपती शिवाजी टर्मिनस हे एक आश्चर्य ठरले आहे. या स्थानकामध्येच रेल्वेचे एक संग्रहालय असून त्यामध्ये या स्थानकाचा इतिहास चित्ररुपात मांडण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. २००८ साली झालेल्या मुंबई हल्ल्यांमध्ये या स्थानकालाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. रात्री साडेनऊच्या सुमारास अजमल कसाब आणि त्याचा साथीदार ए के ४७ बंदूका घेऊन अंदाधुंद गोळीबार करत स्थानकामध्ये शिरले. या हल्ल्यात सीएसटी स्थानकावरील ५८ जणांचा मृत्यू झाला तर १०४ जण जखमी झाले.

स्लमडॉग मिलेनियर या सिनेमातील जय हो हे गाणे या स्थानकात चित्रित करण्यात आले आहे. तसेच २०११ साली आलेल्या रा वन चित्रपटामध्येही हे स्थानक दाखवण्यात आले आहे. मुंबईतील सर्वात गजबजलेले स्थानक असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील प्रवाशांची संख्या घटली आहे. या स्थानकामधून दर चार ते पाच मिनिटांनी एक लोकल ट्रेन सुटते.

२०२१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे सीएसएमटी स्टेशनला महाराष्ट्रातील पहिले ग्रीन स्टेशन म्हणून सन्मानीत करण्यात आले आहे. ग्रीन स्टेशनचे हे सर्टिफिकेट भारतीय उद्योग संघाच्या आयजीबीसी म्हणजे इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून देण्यात आले आहे. ग्रीन स्टेशनसह सीएसएमटी स्टेशन गोल्ड अवॉर्डने सन्मानित होणारे पहिले स्टेशन आहे. या स्टेशनला हे अवॉर्ड हरित क्षेत्र बनवणे, सौर पॅनल लावणे, एलईडी बल्ब, अपंग आणि वरिष्ठ नागरिकांसाठी कम्प्युटर फ्रेंडली बनवण्यासारख्या अनेक वैशिष्ट्यांसाठी मिळाले आहे. सीएसएमटी स्टेशनवर स्मार्ट प्रवाशी सुविधा जसे की, वायफाय, स्वयंचालित तिकिट वेंडिंग मशीन्स, पर्यटन माहिती आणि बुकिंग केंद्र, खाद्य स्टॉल, फार्मसी आणि वैद्यकीय सुविधा इत्यादी उपलब्ध आहे. प्लास्टिक प्रतिबंधसंबंधी उपाय करण्यात आले आहेत. स्टेशनमध्ये प्लास्टिक बॅगचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्लास्टिक बॅगचे पर्यावरणावरील प्रतिकूल परिणामांची माहिती देणारे डिजिटल डिस्प्ले बोर्ड आहेत.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4227 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..