नवीन लेखन...

आनंदी जीवन

जिवन हे आनंददाई आहे त्याचा आनंद प्रत्येकाने भरभरुन घेणे अपेक्षित असते. याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःच्या घरापासुन केली तर सर्वच घर आनंदाने भरून जाईल. कुटुंबातील सर्व व्यक्ती आनंदात असल्याने सर्वांचे आपापसातील संबंध आपुलकीचे व जिव्हाळ्याचे राहतील. घरातील कौटुंबिक वातावरणाचा परीणाम संपुर्ण वास्तूवर होत असतो. घराची वास्तू सभोवतालचे वातावरण सर्वच आनंदी राहते.

आता प्रश्न उभा राहतो की आपण खरोखरच या आनंदाचा ऊपभोग घेतो का. याचे प्रामाणिक ऊत्तर द्यायचे झाले तर बहुतेकांचे ऊत्तर नाही असेच येईल.या सर्वांचे कारणाचा विचार करायला गेलो तर असंख्य कारणे समोर येतील पण त्यातील सर्वात महत्वाचे व बहुतांश ठिकाणी समोर येणारे कारण म्हणजे पैसा किंवा संपत्ती. आपणास जगण्यासाठी खरोखर किती पैशाची आवश्यकता आहे याचा कोणी गांभीर्याने विचार करताना आढळून येत नाही. संपत्तीचा निव्वळ हव्यास हेच खरे कारण त्या मागे असते.  व त्या अती हव्यासापाई आपण जिवनातील निखळ आनंद घेऊ शकत नाही याचीही कुणाला फारशी खंत वाटत नाही.

सध्याची महानगरातील परीस्थीती तर अतिशय वाईट व मनाला क्लेश देणारी आहे. पती व पत्नी दोघेही नोकरी करणारे घरात दरमहा लाखात पैसे येत असतात. एकुलते एक मुल, मोठा चार पाच खोल्यांचा फ्लॅट, चार चाकी गाडी अशी सर्व भौतिक सुखांची रेलचेल. पण खरोखरच त्याचे कुटुंब सुखी व आनंदी कुटुंब म्हणता येईल का. घरात दरमहा भरपूर पैसा येतो एवढेच खरे पण त्यापायी जिवनातील किती आनंदाच्या क्षणांना पारखे झालेत याचा विचार केला तर त्यांचे जिवनाचा ताळेबंद हा तुटीचा असल्याचे दिसून येईल व ही तुट भरून काढण्यासाठी प्रत्येक विकेंडला कोठे तरी बाहेर जाणे व त्या तुटीची भरपाई करण्याचा प्रयत्न केला जातो. पण अशा वरवरच्या मलमपट्टीने ती आनंदाची तुट भरुन निघते का? त्या विकेंडला जो अनावश्यक व अति खर्च होतो तो भरून काढण्यासाठी पुन: आठवडाभर कामाला जुंपून घेणे. ही न संपणारी जिवघेणी धडपड कशासाठी व यातून खरोखरच आनंद मिळतो का याचा कोणी विचारच करत नाही.

पैशापेक्षाही मोठा आनंद जिवनात हरघडी असतो फक्त त्याची जाणीव असणे व तो आनंद मिळवण्याची आंतरीक तळमळ असणे जरुरीचे आहे. वरील ऊदाहरणातील पती, पत्नी दोघेही नोकरी करणारे. दोघांच्या कामाच्या वेळा वेगवेगळ्या असतील तर एक सकाळी लवकर बाहेर पडणार तर दुसरी व्यक्ती त्या वेळी झोपेत असणार व दुसरी व्यक्ती जेव्हा कामावरुन घरी येईल त्या वेळी पहिली व्यक्ती दमून झोपलेली असणार. दोघांचे साधे संभाषण जिथे होत नाही तिथं प्रेमाच्या चार गोष्टी बोलायला वेळ कुठून देणार. मुल पाळणाघरात किंवा सांभाळायला बाई ठेवलेली. त्याला आई वडिलांचे प्रेम कुठून मिळणार. अशा वेळी त्या मुलास एकटे ठेऊन आपण त्याच्या बालपणाचा आनंदच हिराऊन घेत असतो त्याचा परीणाम नकळत त्या मुलावर होत असतो. त्यातुनच अशी  मुले एककल्ली होण्याचा धोका असतो. तसेच एकुलता एक असल्याने खर्चसाठी भरपू पैसे दिले जातात ज्याचा हिशोब मागीतला जात नाही. त्या मुळे पैसे टाकले की सर्व मिळते अशी भ्रामक समजूत त्या मुलाची होते काही वेळा नको त्या वयात हाती पैसा व घरात प्रेमाचा अभाव याची परीणीती व्यसनाधिनता व गुन्हेगारी कडे मुल वळण्याचा धोका असतो. पण याचा कोणी विचारच करत नाही.वास्तविक लहान मुलांच्या वाढीच्या प्रत्येक टप्यात खुप आनंद दडलेला असतो. त्याचे बोबडे बोल , हाताला धरुन दुडुदुडू चालणे, त्याची अंघोळ पाण्यात खेळणे ईत्यादी प्रत्येक क्षणात आनंद दडलेला आहे. व पैशामागे पळताना त्याचे आईवडिल या स्वर्गीय आनंदास मुकतात. पण हे सर्व मानले तर अन्यथा पैशामागे लागलेल्यांना ह्याचे महत्व कसे कळणार.

वासतविक जिवनात आपणास खरोखर किती पैशाची आवश्यकता आहे. या बाबत नुकताच नोटबंदीच्या काळात अनुभवलेला किस्सा आवर्जून नमूद करावा वाटतो. सेव्हींग खात्यातील रक्कम काढताना आठवड्यात फक्त रु.२४०००/- काढण्याची परवानगी होती. अर्थात बँकांकडे तेवढी रक्कम सुध्दा ऊपलब्ध नसल्याने प्रत्येक बँक काही ठराविक रक्कम ५००० ते १०००० पर्यंत देऊ शकत होत्या. माझ्या बँकेत आम्ही एकावेळी रु.१००००/-  देत होतो. दुसरे दिवशी पुन्हा रु. १००००/- अशी विनंती करत होतो. बहुतांशी लोक आमची विनंती मान्य करीत. एकदा एक खातेदार त्या बाबत माझ्याशी हुज्जत घालू लागला. त्यावेळी एका अशिक्षीत खातेदाराने त्याला समजावून सांगत असता जे सांगितले ते ऐकून खरोखर त्या अशिक्षीत माणसाच्या विचाराने मन सुन्न झाले. तो म्हणाला आहो आपल्याला आपल्या चार माणसाच्या कुटुंबास चांगल्या पध्दतीने जगण्यासाठी किती पैसे लागतात, फार तर महीन्याकाठी २०००० ते २५००० , मग आज दहा हजार नेले पुन्हा आठवड्यानी दह हजार नेले तर चालू शकेल. आपण आपल्या गरजा विना कारण वाढवल्यात. पुर्वी आजच्या एवढ्या सोई नव्हत्या तरीही माणसं सुखात रहात होतीच ना. त्याचे विचार ऐकून मन क्षणभर सुन्न झाले. कोठे या अशिक्षीत माणसाची विचारसरणी व कोठे आजच्या सुशिक्षित म्हणवून घेणारी पैशापाठीमागे धावणारी तरुण पिढी.

आपले जिवन क्षणभंगूर आहे. त्या जिवनाचा परिपूर्ण आनंद घ्या. निसर्गाने सम्रुध्द अशा नदि पर्वत जंगल यांच्या सानिध्यात वेळ घालवा. आई, वडील  मुले मित्र मैत्रीणी यांना वेळ द्या. त्यांच्या सुख दु:खात सहभागी व्हा. जिवनाबद्दल वेगळ्या पध्दतीने विचार करा तुम्हाला तुमचे जिवन खुपच आनंददायी वाटेल व तुमचे जिवन परीपुर्ण होईल.एकदा आवश्य विचार करा.

— सुरेश काळे
सातारा

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..