तंबी दुराईंशी एक (लंबी) मुलाखत

An Interview with Tambi Durai (Shrikant Bojewar)

तंबी दुराई यांचं ‘दोन फुल एक हाफ’ हे सदर आता रविवारच्या सुट्टीचा अविभाज्य भाग बनलंय. या सदरातल्या विनोदाच्या आविष्करणातली विविधता आणि सातत्य हे वाचकांना अचंबित करणारं आहे. मराठी साहित्यातला विनोद संपलाय अशी हाकाटी करणाऱ्यांना हे सदर ही छानशी चपराकच आहे. विनोदी साहित्याचा आढावा घेणार्‍यांना दखल घ्यायला लावीलच अशी तंबी यांची ही कामगिरी आहे.

एवढं सगळं म्हटल्यावर, मी तंबी यांचा त्यांच्या अगणित चाहत्यांपैकी एक चहाता आहे हे वेगळं सांगायला नकोच. ‘मी जवळ असलो तर तुम्हाला थंडी वाजायला लागेल इतका मी तुमचा पचंड फॅन आहे’ असं मी एकदा बोजेवारांना म्हंटलं पण होतं. (‘मग माझ्यापासून दूरच रहा’असं त्यांच्यातल्या तंबीने मला सांगितलं नाही, हे माझं नशीब). तर अशा या माझ्या आवडत्या लेखकाला या मुलाखतीच्या निमित्ताने भेटायला मिळणार याचा मला स्वाभाविकपणे आनंद झाला.

श्रीकांत बोजेवार हे मराठी पत्रकारितेतलं कित्येक वर्षापासूनचं ठळक नाव आहे.सध्या ते लोकसत्तेत निवासी संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे हे नाव आता सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचू लागलंय. तरीही श्रीकांत बोजेवार म्हटल्यावर एखाद्याच्या चेहऱ्यावर समजा पश्नचिन्ह उमटलं तरी तंबी दुराई हे नाव उच्चारताच ओळखीचं हसू त्या वाचकाच्या चेहऱ्यावर फुटल्याशिवाय राहणार नाही इतकी स्वत:ची ओळख तंबी दुराईने निर्माण केली आहे. बोजेवार हेच तंबी दुराई आहेत हे गुपित आत्ता आता उघडकीस आलं असलं तरी ते कित्येकांना अजूनही ठाऊक नाही. तर या श्रीकांतचं तंबीबद्दलचं मत काय आहे? की कानामागुन येऊन तिखट झालेल्या या तंबीचा त्याला दुस्वास वाटतोय याचं मला कुतुहल होतं. त्यावर बोजेवार म्हणाले, मला लोक तंबी दुराई याच नावाने जास्त ओळखतात. मला तर वाटायला लागलंय, तंबी हेच माझं खरं नाव आहे, आणि श्रीकांत हे टोपण नाव. मला तंबी दुराईने इमेज मिळवून दिली. मी नवीन विनोदी साहित्य तंबीच्याच नावाने पसिद्ध करतो, कारण आता ते नाव एक ब्रँड नेम झालंय. तंबीने मला इतकं काही दिलंय की मला तंबीला आवडून घ्यायलाच पाहिजे.

हे वेगळंच अमराठी नाव कसं जन्माला आलं हे सांगतांना बोजेवार म्हंणाले, ‘या नावाचा दोन फुल एक हाफ या कॉलमशी संबंध आहे (गंमत म्हणजे, याला एक फुल दोन हाफ असं म्हणणारेही अनेकजण आहेत). ही कल्पना लोकसत्तेचे तेव्हाचे संपादक, अरूण टिकेकर यांची. मी तेव्हा रंग तरंग या पुरवणीत चालबाज या टोपणनावाने (म्हणजे टोपणनावाच्या टोपीची ही सवय पहिल्यापासूनची दिसतेय) सुनिये मिस्टर, हा सिनेजगतातल्या गॉसिपवर आधारीत कॉलम लिहायचो. त्यात चार ओळीची बातमी आणि दहा ओळीचा माझा मसाला असायचा. त्यातल्या माझ्या लिखाणामुळे अणि इतर वेळा बोलताना मी करत असलेल्या कोट्या यामुळे टिकेकरांना माझ्यातल्या विनोदी लेखकाची कल्पना आली असावी. हे सदर मीच लिहावं असं त्यांनी ठरवलं’.

‘या कॉलममधे, दोन मोठे तुकडे आणि एक छोटा टेल पीस असा आराखडा त्यांच्या मनात होता. या कॉलमसाठी वेगवेगळ्या नावांचा विचार करता करता, मला दोन फुल एक हाफ, हे नाव सुचलं. ते क्लीकही झालं. टोपणनावाचा विचार करत असतांना मला हॉटेलातला, आपल्याला चहा वगैरे सर्व्ह करणारा तंबी आठवला. हे नाव टिकेकरांनाही आवडलं. पण हे नाव अधिक खरं वाटावं म्हणून त्यांनी त्याला तेव्हा पसिद्ध असणाऱ्या अन्ना दुराईसारखं तंबी दुराई केलं’.

‘टोपणनाव शोधून काढायची पत्रकारांना फार वाईट खोड आहे. त्यांनी हा तंबी कोण आहे याचा शोध घ्यायचा पयत्नही केला. माझ्यावर तेव्हा सिनेपत्रकार हा शिक्का होता, म्हणून माझा संशय कुणालाच आला नाही. मी लेख पाठवायचो तोही दुसऱ्यांच्याच हस्ताक्षरात, त्यामुळे अगदी कंपोझरलाही कोणी लिहिलंय, हे कळायचं नाही. अशापकारे हे तंबीचं सिक्रेट माझ्यात आणि टिकेकरांत दीड वर्ष राहिलं’.

या नावाला मिळालेली सर्वात मोठी दाद सांगायची म्हणजे, तंबीला चारपाच वर्षपूर्वी पुण्याहून एक फोन आला. पुण्यात राहणाऱ्या तमिळ भाषिक संघटनेचा एक पदाधिकारी, थोड्या अशुद्ध मराठीत बोलत होता की, एक तामिळ माणूस इतकं शुद्ध छान मराठी लिहितो, याबद्दल तंबी दुराईचा सत्कार करायची त्यांची इच्छा आहे. ‘अहो, मी मराठी आहे’ असं सांगून बोजेवारांनी स्वत:ची सुटका केली. तरीही, एक तमिळ नाव मराठीत पॉप्युलर केल्याबद्दल, त्या तामिळ लोकांना बोजेवारांचा सत्कार करायची इच्छा होतीच. पण तंबीला सत्काराची अॅलर्जी आहे, आणि सत्काराला तो फार घाबरतो, इति बोजेवार.

हा कॉलम चालू होऊन बारा वर्ष झालीत. त्या काळात लोकसत्तेत तीन संपादक झाले, त्याबद्दल बोलतांना बोजेवार म्हणाले,’या बारा वर्षात टिकेकर, केतकर, आणि गिरीश कुबेर असे तीन संपादक झाले. या तिघांनाही माझ्या कॉलमबद्दल पेम आहे. त्यामुळे सुदैवाने माझ्यावर कोणताच दबाव नव्हता. सुरवातीला माझी राजकीय समज किती आहे याचा अंदाज नसल्याने तीनचार महिने टिकेकरांनी, लेख छापण्या आधी वाचले. नंतर मात्र लिहित रहा, असंच ते म्हणायचे. सध्याचे संपादक गिरीश कुबेर छापून आल्यावरच लेख वाचतात’. केतकरांचं या कॉलमवरचं पेम सर्वांनाच माहित आहे. दोन फुल एक हाफ ची पस्तावनाच त्यांनी लिहिलेय. तंबीचं कौतुक करतांना त्यांनी लिहिलंय,’तंबीचा विनोद हा वाचकाला सजग करतो, आनंद देता देताच अत्मपरीक्षण करायला लावतो, आणि त्यातील निर्विषपणामुळे आल्हाददायक गुदगुल्याही करतो’. त्यांनी तोंड भरून केलेलं कौतुक मुळातूनच वाचण्यासारखं आहे.

मला या सदराचं विशेष हे वाटतं की सातत्याने बारा वर्ष, दर आठवड्याला रतीब घालूनही, तंबीने कधी पातळ दूध घातलेलं नाही. गुणवत्तेत कधीच घसरणं न होणं हे तसं अवघड काम तंबीने साध्य कसं काय केलं, यावर बोजेवार म्हणाले,विजय तेंडुलकरांनी, हे सर्व येतं कुठून या नावाचा लेख लिहिला होता. लिखाणाच्या पोसेसचं उत्तर देणं

तसं अवघडच हेच त्यांनी म्हंटलं होतं. पण हा कॉलम लिहिताना, काही गोष्टी स्पष्ट होत्या. एका माणसाला किंवा पक्षाला टारगेट करायचं नाही. भाषेच्या फॉर्ममध्ये मोनोटोनी येऊ द्यायची नाही.”

ही सर्व पथ्य तंबीने पूर्णपणे पाळलेली आपण जाणतोच. त्यांच्या विनोदाच्या रडारवर सगळेच पक्ष कधी न कधी आलेले आहेत. आणि भाषेच्या फॉर्मबद्दल बोलायचं तर, अभंग, गवळण, पोवाडा, ओवी असे कवितेतले अनेक पकार, वऱ्हाडी, कोकणी, नवतरूणाईची टपोरी असे भाषेचे इतके पकार तंबीने हाताळलेत, की इतक्या विविध अंगाने विनोदाचा विचार करणारा दुसरा लेखक सापडणंच अशक्य.

पुढे बोलतांना बोजेवार म्हणाले, ‘तेंडूलकरांचा उल्लेख यासाठी की. कॉलम वाचल्यावर खूपदा त्यांचा फोन यायचा, आणि पश्न असायचा केव्हा येतोयेस भेटायला?’ आम्ही तीनचारदा भेटलो तरी दुर्दैवाने सावकाश भेटायचं, गप्पा मारायचं राहूनच गेलं. ते गेल्यावर सुषमा तेंडुलकरांनी लेख लिहिला होता, त्यात म्हंटलं होतं की आठवड्यात एखाद वेळेला फोन झाला नाही तरी रविवारी बाबांचा फोन यायचा, ‘तंबी दुराई वाचलास का?’

एवढा मोठा लेखक फॅन व्हावा अशी अर्थात तंबीची लेखनात दमदार फलंदाजी आहेच.

मराठीत अमुक अमुक लेखकांनंतर विनोद संपलाय अशी आवई उठवणारे बरेच आहेत. त्यांना आपल्या कामगिरीने चोख उत्तर देणार्‍यात तंबीचं नाव अग्रभागी आहे, असं मला वाटत असलं तरी तंबीचं सध्याच्या विनोदी साहित्याबद्दल काय म्हणणं आहे याबद्दल मला जाणून घ्यायचं होतं

‘विनोदी लेखन हे तसं कठीणच. विनोद चाललाय की पडलाय हे एका सेकंदात कळतं. गंभीर समस्येवर लिहिलं तर त्या पश्नाला त्याच्या वजनानुसार कालांतराने मार्क मिळतात. पण विनोद हा रोखीचा व्यवहार आहे. लाफ्टर मिळाला, टाळी मिळाली तर विनोद चालला नाहीतर पडला. विनोदी लिहिणं सोपं आहे असा गैरसमज असल्यामुळे विनोदी लेखकांची संख्या वाढत असली तरी, चांगले लिहिणारे दोनचार आणि बाकीचे पयत्न करणारे अशी परिस्थिती नेहमीच असते, तशी आत्ताही आहे’.

तंबीने सर्वच पुढार्‍यांची धोतरं फेडली आहेत, टोप्या उडवल्या आहेत, साहित्यिकांच्या फिरक्या घेतलेल्या आहेत. केतकरांनी पस्तावनेत म्हटलंय तसा यात विखार नसला, किंवा जखमा करण्यासाठी नाही तर इशारा देण्यासाठी तंबीने पक्षांवर काढलेला हा बार असला तरी. ही सर्व मातब्बर मंडळी ही मस्करी कशी घेतात

हा पश्न मनात डोकावत होता. त्यावर तंबीचं म्हणणं, ‘या लेखनाने साहित्यिक दुखावलेत, पण राजकारणी नाहीत. अणि पुढे मल्लीनाथी ही की,’ यातनं एवढाच निष्कर्ष की राजकारण्यांची कातडी खरंच गेंड्याची आहे, किंवा त्यांना कोण काय लिहितोय याची फिकिर नाही किंवा मी काय विनोद केलाय, तेच त्यांना कळत नसेल.

शिवसेनेचे नेते टीका कशी घेतात यावर बोलतांना बोजेवार म्हणाले, ‘बाळासाहेबांचा पत्यक्ष, अपत्यक्ष निरोप माझ्यापर्यंत पोचला होता, की मी दर रविवारी तंबीचं वाचतो. छान असतं. त्याला सांगा भेटायला. गडावर बोलवायची ही त्यांची पद्धत आहे. मी काही असा जाणार नव्हतोच. पण एकदा उद्धव ठाकरे यांची मुलाखत घ्यायला मी मातो श्रीवर गेलो होतो. तर बाळासाहेबांना द्यायला मी ‘दोन फुल एक हाफ’ ची कॉपी घेतली. तेव्हाच त्यांना तपासायला डॉक्टरांचं पथक आलं होतं. त्यामुळे आता वेळ जाईल तरी संध्याकाळी भेट घेतली तर बोलायला वेळ मिळेल असा मला निरोप आला’

राजकीय नेता म्हणून त्यांची जी काही भूमिका आहे त्याच्याशी आपण सहमत असो वा नसो, पण मी त्यांना एक थोर कार्टुनिस्ट मानतो आणि म्हणूनच भेटायला गेलो होतो. तर मी थांबलो. मग मस्त दीड पावणे दोन तास बोलले. त्यांची विनोदबुद्धी पचंड आहे, आणि ती त्याच्या बोलण्यातही दिसते. मी त्यांना पुस्तक दिल्यावर, मुखपृष्ठ पाहून ‘सरवट्ययांचं कारे’ हा पश्न आलाच, आणि त्यानंतर ‘काय …अजून तशीच चित्र काढतोय, ही कॉमेंटही. पुस्तक चाळून म्हणाले, जे काम मी कुंचल्याने करत होतो,ते काम तू शब्दांनी करतोस’.

बाळासाहेबांच्या संवेदनाशीलतेचा पत्यय तंबीला लगेच आला. तिथल्या पथेपमाणे पाहुण्यांचा फोटो काढायला फोटोग्राफर आला होता. ते फोटोसाठी उभे राहिले, पत्रकाराने कुठल्याही नेत्याला नमस्कार करू नये अशा मताचे असलेले बोजेवार, नमस्कार करावा की नाही या संभ्रमात क्षणभर होते. पण एक विनोदी लेखक एका वयाने बुजुर्ग आणि थोर व्यंगचित्रकाराला नमस्कार करतोय या भावनेने ते वाकले, तेव्हा बाळासाहेबांनी फोटो ग्राफरला थांबवत सांगितलं,’हा फोटो काढू नकोस’

यापुढची गंमत सांगतांना बोजेवार म्हणाले, ‘मी ट्रेनने परत येत होतो तर एका मित्राचा फोन’ काय रे बाळासाहेबांना काय केलंस, ते हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालेत मला वाटलं तो गंमत करतोय. पण आणि एक दुसर्‍याचा फोन. मी जरा तंतरलो, कारण मीच शेवटी त्यांना भेटणारा. तेवढ्यात उद्धव ठाकरेंचा फोन,’बाबांना अॅडमिट केलंय. टेन्शनमध्ये असाल. पण टेन्शन घेऊ नका. तुम्ही गेल्यावर एअर इंडियातल्या एक बाई भेटायला आल्या होत्या, तेव्हाच बाबांना बरं वाटेनासं झालं होतं’. हा किस्सा सांगतांना एरवी गंभीर असणाऱ्या बोजेवारांना चांगलंच हसू फुटत होतं.

तंबीने भाषेचे जे वेगवेगळे पकार हाताळले आहेत ते पाहून खरंच आश्चर्य वाटायला लागतं. मला तर वाटतं, विनोद करण्यासाठी वापरलेल्या या पकारांचा अभ्यास करून एखादा सहज डॉक्टरेट मिळवू शकेल. तर हे सर्व कुठून जमवलं? तर त्यांना लहानपणापासुनच वाचायची आवड होती. अर्थात सर्वच वाचणारे लेखक होत नसले तरी तो भाग्ययोग तंबीच्या आयुष्यात होता. त्यांचे वडील लिखाण करायचे, त्यांचा पिंड विनोदी लेखनाचा. लोकांना हसतं ठेवायची कला त्यांना अवगत होती. तर विनोदी लेखनाचा हा फ्लेवर तिकडून आला असावा, असं तंबीला वाटतं. आजी निरक्षर असली तरी तिला गोष्टी ऐकायची पचंड आवड. यांच्या आईलाही पुस्तक वाचायला आवडायची. तर अर्धवट राहिलेली गोष्ट सुनेने पूर्ण वाचून आपल्याला सांगावी यासाठी, ‘मी काम करते,जा तू ती गोष्ट संपव’ असंही आजी म्हणायची. आईने आजीला सांगितलेल्या गोष्टींचे तंबीवर संस्कार झालेच. तर असं हे वाचनातून, ऐकण्यातून झालेले संस्कार.

तंबी सर्वांचीच फिरकी घेण्यात पटाईत, त्यातही समारंभाला न जाणारा. मग ही सगळी माहिती कुठून जमवतो. मागे मी एका समारंभाला गेलो होतो, तेव्हा पाडगावकरांना नागीण झाली होती, आणि ते थोडे त्यामुळे त्रासलेले होते. लगेचच्या रविवारी त्याचा मजेशीररित्या उल्लेख आलेला वाचून मला खरंच आश्चर्य वाटलं होतं.

‘बाहेर न जाणं आणि जनसंपर्क या वेगळ्या गोष्टी आहेत. माझा जनसंपर्क खूप आहे. बोलतांना काय लक्षात ठेवायचं काय लिहायचं, याचा विचार चालू असतो. पाडगावकरांच्या नागिणीबद्दल बोलायचं तर, पेपरात टिकेकर, पाडगावकर अणि फुटाणे यांचा फोटो आला होता. तेव्हां फुटाणेंना फोन केला तर ते सहज बोलले, पाडगावकरांना नागिण झालीये ते मग मी लिहितांना त्याचा वापर केला, तर टिकेकरांचा मला फोन,’अरे तू त्या कार्यक्रमाला आला होता का म्हणून. मिळालेल्या माहितीचा असा उपयोग होतो’

म्हणजे बोजेवारांशी बोलताना समोरच्याला काळजीपूर्वकच बोलायला हवं, कारण त्यातलं तंबी काय टिपून घेईल, काही सांगता येत नाही.

बोजेवार लहानशा गावातून आलेले, तर त्यामुळे सुरवातीला न्यूनगंड वाटत होता का (आता त्यांच्यासमोर दुसऱ्यांना इन्फिरीयर वाटावं अशी त्यांची कामगिरी आहे, तरीही) या पश्नावर ते म्हणाले,’मी छोट्या गावातून आलेला. इथे मोठ्या शहरात लोक इंग्रजी बोलायचे, त्यामुळे सुरवातीला दडपण आलं तरी नंतर माझ्या लक्षात आलं की इथले लोक सराईतपणे चुकीचं इंग्रजी बोलतात. मग मी त्यातून धडा घेतला की इथे चुकीचं बोललं तरी चालेल पण सराईतपणे इंग्रजी बोललं की झालं’ हे उत्तर आपल्या तिरकस शैलीत तंबीने दिलंय असच मला वाटलं.

ऋतुरंगच्या दिवाळी अंकात मी बोजेवारांचा लेख वाचला होता. शीर्षक  होतं आणि मी रस्ता ओलांडला. वसईत नक्की मिळू शकणारी ट्यूनर कंपनीची मुलाखत आणि एका नवीन दैनिकामधे कदाचित मिळू शकणारी, पूर्णत: नवीन क्षेत्रातली,शिकाऊ पत्रकाराच्या पोस्टसाठीची मुलाखत एकाच दिवशी आणि एकाच वेळी होती. पण अंधारात उडी घ्यावी तसा काहीशा उर्मीने त्यांनी पत्रकारितेच्या नोकरीसाठी जायचा निर्णय घेतला, आणि आपल्या करीयरचाच मार्ग बदलला, या संबंधी तो लेख होता. अर्थात, त्यांनी तो रस्ता ओलांडला म्हणून आपल्याला अशा निखळ विनोदाची मेजवानी मिळू लागली. पण जीवनाचा मार्गच बदलवून टाकणारा असा पसंग जीवनात घडल्यामुळे तुम्ही दैववादी झाला आहात का, या पश्नावर बोजेवार म्हणाले, मी ठरवून पत्रकार झालो नाही. मी रेडिओ मेकॅनिक म्हणून अडीच वर्षं नोकरी केली होती. पण हा योग आला, तिथे भाऊ तोरसेकर भेटले. त्यांच्यामुळे सकाळ पेपरात पोचलो. अशोक राणेंनी चित्रपट समीक्षा लिहिणं बंद केलं म्हणून मी लिहायला लागलो तर तिथून लोकसत्तेत गेलो. यात योगायोग म्हणायचा तर मला चांगली माणसं भेटत गेली. मी कंपनीत नोकरीला होतो तिथे गायकवाड नावाचा देव माणूस भेटला. मला काम येत नसतांनाही त्यांनी मला कामावर ठेवलं. चेहरा बघून ते ओळखायचे की मी उपाशी आहे, मग जेवायला घालायचे”

‘सकाळचे संपादक राधाकृष्ण नार्वेकर भेटले. माझी परिस्थिती पाहून त्यांनी नोकरी सुरू व्हायच्या आधीच मला पाचशे रुपये दिले. नंतर टिकेकर,केतकर अशी ग्रेट माणसं भेटली. या योगायोगाने मी जो काही आहे तो झालो. पण दैवगती, भविष्य या गोष्टींवर माझा विश्वास नाही.

कुठलीही पूर्वपिठिका नसतांना पत्रकारितेत येऊन एवढं ठोस काम करणारे बोजेवार कुणाला गुरू मानतात? यावर ते म्हणाले, ‘मला पत्रकार व्हायची ना महत्वाकांक्षा होती ना बॅकग्राउंड. मी पत्येकाकडून शिकत गेलो. राधाकृष्ण नार्वेकरांकडून मी शिकलो की पत्रकाराला एकवेळ डोकं नसलं तरी चालेल, पण हृदय असलं पाहिजे. टिकेकर मला म्हणाले होते’,आत्ता तुझं वय असं आहे की पत्रकारितेतला तुझा कालखंड निर्णायक आहे, तू या काळात जे होशील, तेच आयुष्यभर राहशील. तुझ्यात वाईट घडायची पवृत्ती नाही. आहेस तसाच रहा.

केतकरांकडून मी शिकलो की कुठल्याही विषयावर अभ्यास नसेल तर कॉमेंट करू नका. सिद्ध करू शकत असलात तरच बोला (म्हणूनच बोजेवार इतके मितभाषी  असावेत) आणखीन एक म्हणजे, कितीही मोठं पलोभन समोर आलं तरी तुम्ही स्वत:शी कमिटेड असलं पाहिजे. केतकरांकडून मी मोकळेपणा शिकलो. आपल्या मताच्या अगदी विरुद्ध मतही ऐकून घ्यायची तयारी आणि तरीही आपलं मत बदलू न द्यायची क्षमता हे त्यांचे गुण घेण्याजोगेच आहेत. केतकर आणि टिकेकर हे मराठी पत्रकारितेतले शेवटचे दीपस्तंभ आहेत. या उंचीची माणसं यापुढे पत्रकारितेत व्हायची शक्यता दिसत नाही.

तर असे हे थोर थोर गुरू आणि त्यातून हवं ते टिपून घेणारा शिष्योत्तम.

तंबीवर आता एक अग्रगण्य विनोदी लेखक हा शिक्का बसला आहेच. आपण विनोदबाह्य काही लिहिलं तर तो त्या सरस्वतीचा अपराध ठरेल, किंवा त्यामुळे मायबाप वाचक आपल्यावर रूष्ट होतील की काय अशी भीती वाटत असल्यासारखे काही विनोदी लेखक विनोदाच्या रिंगणाच्या बाहेर जायला नाखुष असतात. तर लिहितांना या इमेजचा बोजेवारांना काही त्रास होतो का?या पश्नावर ते म्हणाले,’विनोदी वगैरे शिक्के हे समाजाने दिलेले आहेत. तो मी घेतलेला शिक्का नाही, त्यामुळे तो मी गंभीरतेने घेत नाही. मला जसं लिहायचं असतं तसंच मी लिहितो. माझी पहिली कादंबरी’ पावणे दोन पायाचा माणूस (बोजेवारांना अपूर्णांकाचं जसं की दीड, अडीच यांच काहीतरी आकर्षण असावं) यामधे गमतीदार पसंग, फँटसी,विनोद होते,त्यामुळे मी नेहमी लिहितो त्याचच ते विस्तारित रूप वाटत असेलही, पण माझी पुढली कादंबरी पूर्ण गंभीर आहे. लिखाणात मला जे पयोग करावेसे वाटतात, ते मी करतो’.

लोकसत्तेच्या रविवारच्या अंकात येणारी हास्यरंग ही पुरवणी आता वाचकांच्या चांगलीच सवयीची आणि आवडीची झालीये. तिच्या जडणघडणीत बोजेवारांचा संपूर्ण सहभाग होता. मी कधीकधी हास्यरंगमधे लिहिलं असल्याने एक लेखक म्हणून आणि त्या पुरवणीचा नियमित वाचक म्हणून अधिक जाणून घ्यायचं होतं.

‘अरूण टिकेकर हा माणूस व्हिजनरी होता.वर्तमानपत्राचं स्वरूप कसं बदलेल याचा त्यांना अचूक अंदाज असायचा. वाचकाला रिलॅक्स वाटावं असं एक पान द्यायचं त्यांच्या मनात आलं. या पानाचा दर्जाही गंभीर लेखाइतकाच उच्च हवा, थिल्लर नव्हे,ही अपेक्षा होती. मी अणि नायगावकरांनी याची जबाबदारी घेतली तेव्हाच मनाशी खूणगाठ बांधली होती, की हे पान आपल्याला सांभाळायला दिलेलं आहे. हे पान आपलं नाही. त्यामुळे आम्ही नवीन लेखकांना पोत्साहन दिलं. त्यातुन आम्हाला दहाबारा चांगले लेखक मिळाले’.

‘नवीन लोकांना चान्स देतांना काहीजणांना भिती वाटते की हा आपल्याहून चांगला लिहायला लागला तर? पण अशी इनसिक्युरिटी मला वा नायगावकरांना कधीच वाटली नाही, कारण माझ्यासारखं मीच लिहू शकतो. एखाद्या क्रिएटिव्ह माणसाच्या डोक्यात येतं ते दुसऱ्याच्या डोक्यात कसं काय येईल? आणि मी म्हणतो, एखादा झाला मोठा तर होऊ द्या की, त्याने आपलं काय बिघडतंय?’

हा स्वत:वरचा विश्वास तंबीला नक्कीच शोभून दिसणारा आहे.

बोजेवार यांनी चित्रपट समीक्षाही लिहिली आहे ‘सकाळ’ मध्ये अशोक राणे यांनी ती जबाबदारी गळ्यात अडकवल्यानंतर. बोजेवारांनी ती इतक्या छान पकारे निभावली की त्यामुळेच त्यांना लोकसत्ताचे दरवाजे उघडले. तर सिनेमासंबंधी लिखाण त्यांना कसं जमलं, त्याची काही पूर्व पिठिका आहे का, हे जाणून घेण्यात मला रस होता. ‘आमच्या घरात चित्रपट हा सर्वांच्याच आवडीचा विषय होता, माझे वडील तर व्ही.शाताराम यांच्याकडे काम करण्यासाठी घरातून पळून मुंबईला आले होते. त्याचवेळी माझे आजोबा वारल्यामुळे, त्यांना गावी परत यायला लागलं आणि नंतर ते गावातच राहिले’.

बोजेवारांच्या आजीलाही सिनेमाचं भलतंच आकर्षण होतं. गावच्या टॉकिजमध्ये तेव्हा स्त्रियांना पन्नास पैसे तिकिट असायचं, आणि कडेवरलं मूल फ्री. आजी पत्येक सिनेमा पाहायची, आणि दहा वर्षं होईपर्यंत तिच्या कडेवर बसून जाऊन बोजेवारही सिनेमा पाहायचे. त्यांना सिनेमाचं परिक्षण वाचायची आवड होती. रिव्ह्यू कसा लिहितात, त्याचा आराखडा कसा असतो, त्यातलं चांगलं, वाईट हे त्यांना या वाचनातून आपोआप कळायला लागलं होतं.

पुढे तर त्यांनी सिनेमाच्या पटकथा लिहिल्या. चित्रपट समीक्षक असल्याचं तेव्हा काही दडपण वाटलं का या पश्नावर ते म्हणाले, ‘तसं थोडंसं दडपण वाटलं, पण विशेष नाही. अलका कुबल मुख्य भुमिकेत असलेला ‘भक्ती हीच शक्ती’ या नावाच्या सिनेमाचे मी संवाद लिहिले. आधीचे संवाद शहरी भाषेत लिहिलेले होते, मला त्यावर ग्रामीण साज चढवायचा होता. मी ते काम सात दिवसात करून दिलं. त्याचा निर्माता फार हुषार होता. त्याने हा सिनेमा फक्त तंबूत दाखवून, पस्तीस लाखाच्या खर्चावर दीड कोटीचा धंदा केला’.

त्यावेळची एक गंमत बोजेवारांनी सांगितली. त्यातल्या क्लायमॅक्सच्या सीनमधे खलनायक असलेल्या अशोक सराफांना देवीच्या मागे असलेला वाघ जिवंत होऊन खाउन टाकतो. हा बिनडोक सीन करायला सराफ तयार नव्ह्ते.’अरे तू असं कसं लिहिलंस हा त्यांचा बोजेवारना पश्न होता मी फक्त संवाद लिहिलेत, कथा नाही हे सांगून त्यांनी स्वत:ची सुटका केली. पण या सीनवर टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडायचा हे बोजेवारांनी स्वत: तंबूत सिनेमा पाहताना अनुभवलेलं आहे’.

या पसंगावर भाष्य करतांना बोजेवार म्हणाले, ‘सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. ते टीमवर्क असलं तरी लेखकाचं माध्यम नाही. लेखकानं लॉजिकल लिहिण्याचा पयत्न करावा. पण दिग्दर्शक त्या कथेचं अक्षरश: काहीही करू शकतो.’सदाशिव अमरापूरकर असलेला ‘तहान’, ‘कांचन नायकांचा’ ‘आई’, अणि हल्ली हल्ली ‘लोणावळा बायपास’ हे त्यांचे इतर सिनेमे.

हल्ली ते निवासी संपादक म्हणून लोकसत्तेत कार्यरत आहेत. नवीन जबाबदारीमुळे साहित्य निर्मितीत अडथळा येतो का,यावर ते म्हणाले,’काम वाढली आहेत. पण मला पुरवणीचं काम किंवा बातम्यांच्या स्वरूपाच्या बाबतच्या चर्चा खूप आवडतात.मी ते काम खूप एन्जॉय करतो. तो वेळ सोडून राहिलेल्या वेळेत मी लिखाण करतो. मला त्यासाठी कामात सूट नकोच असते’.

हल्ली काही पत्रकार खासदार म्हणून एखाद्या पक्षाच्या नावावर निवडून येतात. त्यामुळे त्याच्या लिखाणात थोडं डावं उजवं व्हायची शक्यता असते का, आणि तुम्हाला अशी खासदारकी कोणी दिली तर ती तुम्ही घ्याल का, या पश्नाच्या शेवटच्या भागाला बगल देत ते म्हणाले, ‘तुमचा पक्ष लिखाणात दिसून येऊ नये. नाहीतर लिहू नये. तुम्ही जरी एखाद्या पक्षाचे साधे कार्यकर्ते असलात तरी नैतिकदृष्ट्या पत्रकार असू नये’.

हल्ली मराठीच्या भवितव्याबद्दल बरेचजण गळा काढताहेत. तर मराठीचं भवितव्य काय यावर बोलतांना बोजेवार म्हणाले.’मराठी मृत्यूपंथाला लागली आहे असं शंभर वर्षापूर्वीपण लोक लिहित होते. तरी ती शंभर वर्ष तर नक्कीच टिकली आहे ती अशीच पुढेही टिकेल’

‘दोन फुल एक हाफ’ वर बक्षिसांचा वर्षाव झाला होता. पण या पुरस्काराबद्दल तंबीला काय वाटतंय?

‘पुरस्कार देणार्‍याचा अधिक्षेप न करता मी सांगतो की मला पुरस्कारांचं महत्व वाटत नाही. त्या निमित्ताने पुस्तकाची चर्चा होते, खप वाढतो, लोकपयतेची त्यावर मोहोर उमटते, हे खरं असलं तरी पुरस्कार ही व्यावसायिक गरज झाली. त्याचा दर्ज्याशी काहीही संबंध नाही. श्रीनिवास कुलकर्णींची ‘डोह’, राम पटवर्धनांची ‘पाडस’ यावर पुरस्काराची मोहर नसली तरी ती ग्रेट पुस्तकं आहेत. पामाणिकपणे सांगायचं तर मला, कॉलम मनासारखा जमणं हाच पुरस्कार वाटतो’.

तर असे हे मराठी साहित्यात नाव कमावूनही, कुठलाही अहंकार नसलेले, कुणालाही न दुखावता आपली मतं ठामपणे मांडणारे. मितभाषी असले तरी आवडत्या विषयावर दिलखुलासपणे बोलणारे, तंबी दुराई, उर्फ श्रीकांत बोजेवार. ज्याच्यावर लाखो लोक फिदा आहेत असा त्यांचा ‘दोन फुल एक हाफ हा कॉलम मला विनोदी कसं लिहायचं याचा वस्तुपाठ वाटतो. त्या संकलित लेखांचं पुस्तक मला पचंड आवडलेलं आहे. त्याच्या पुढील भागाची पतिक्षा ही माझ्या सारख्या अनेकांना तंबी दुराईची लंबी जुदाई वाटते, तर अशा तंबीच्या फॅनक्लबसाठी खुषखबर आहे की ‘दोन फुल एक हाफ’ चा पुढला भाग छपाईला गेलेला आहे. तो लवकरच वाचायला मिळेल. त्याआधी ‘हास्यमेव जयते’ च्या संकलनाचं पुस्तक छापून तयार आहे. फक्त ते लिहित असलेल्या गंभीर विषयावरची कादंबरी हे तब्येतीत चाललेलं काम आहे. तिला नक्की किती वेळ लागेल त्याबद्दल त्यांनाच सांगता येत नाही, कारण ती आजच्या काळासंबंधी लिहिलेली आहे, आणि काळाबरोबरच पुढे लिहिली जाते आहे. म्हणजे आता आपणा सर्वांनाच बोजेवारांच्या लिखाणाची मेजवानी नजिकच्या काळात मिळणार आहे.

आमच्या गप्पा संपल्या.शनिवारी बोजेवारांना सुट्टी असते म्हणून त्या दिवशी आम्ही भेटलो. सौ.बोजेवार सामाजिक कार्याची आवड म्हणून लहान मुलांना शिकवायला गेलेल्या.त्यांची चुणचुणीत मुलगी सलोनी. (जी रविवारला थँक यू डे म्हणते, कारण बोजेवार त्या दिवशी सतत येणाऱ्या फोनवरती समोरच्याने केलेली कॉलमची स्तुती ऐकल्यावर सारखे थँक यू म्हणत असतात)आमचा फोटो सेशन करायला पुढे आली. आणि त्यानंतर आम्ही तंबीने केलेला चहा प्यायलो. त्या चहाची मस्त चव घेतल्यावर श्रीकांत बोजेवारांच्या अंगात तंबी किती भिनलाय याची साक्षच पटली.

डॉ. प्रमोद बेजकर

6, कृष्णामाई रोड,
पोस्ट ऑफिस समोर,
डोंबिवली (प) 421202
मो: 93240 76859
Email :
pramodbejkar@gmail.com

 

1 Comment on तंबी दुराईंशी एक (लंबी) मुलाखत

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…