नवीन लेखन...

अजाणतेपणातील वांडपणा

 

अनघा दिवाळी अंक २०१९ मध्ये किरण वालावलकर यांनी लिहिलेला लेख 


माझा अजाणतेपणाचा काळ सुखाचा होता की दु:खाचा याचा जमाखर्च मला नाही मांडता यायचा. पुन्हा सुख-दुःखाचे निकष व्यक्तिसापेक्ष आणि आपल्या भावनांचा कस कुणी ऐरणीवर घासून तपासतो का?

एवढं कळतं… आणि माझ्या बाबतीत ते खरंही आहे की, माझ्या संस्कारक्षम वयात माझ्यावर, नकळतपणे जे संस्कार झाले, त्यानं माझा पिंड पोसला गेला. आमची आर्थिक परिस्थिती तशी बेताची. माझे वडील… आम्ही त्यांना बाबा म्हणायचो… हे एलआयसीचे एजंट म्हणून काम पाहत असत. आई शिक्षिका आणि आम्ही तीन भावंडं. माझ्यापेक्षा थोरला किशोर, मी आणि धाकटी कल्पना. म्हणायला आमचं पाच जणांचं कुटुंब. पण आमच्या त्यावेळच्या दोन खोल्यांत आम्ही पाच जण एकत्र राहिलोय. असं क्वचितच घडलं असेल, आमचं हे दोन खणी घर, आल्या-गेल्यांसाठी, गावातील लोकांसाठी, गरजूंसाठी, पै-पाहुण्यांसाठी हक्काचे छप्पर होतं. त्यांचं खाणं-पिणं, त्यांचं हवं-नको ते पाहणं आई अगदी निगुतीनं आणि आपुलकीनं करायची. घरात जे असेल, ते रांधून भुकेल्यांच्या पोटी गेल्यावर आई-बाबांच्या चेहेऱ्यावर तृप्ती जाणवायची. प्रसंगी अर्धपोटी राहूनही त्यांनी आगंतुकांच्या समाधानाचा विचार सतत केला. घरात तसे ऐश्वर्य नाही, पण उंबरठ्याबाहेरच्या पादचाऱ्यांवरून आई-बाबांच्या दार्तृत्वाची आणि त्यांच्या मनाची श्रीमंती माझ्या मनात वास्तव्यास राहिली. त्यामुळे प्रेम, जिव्हाळा यांची तोंडओळख झाली ती तेव्हापासून! आम्ही भावंडं स्वतःला भाग्यवान समजतो, कारण आम्हाला आई बाबांसारखे पालक लाभले. त्यांनी आम्हाला कधीच या परिस्थितीची झळ लागू दिली नाही.

आई-बाबांचा आम्हाला तसा धाक असूनही माझ्यातला वांडपणा, व्रात्यपणा काही मला सोडून गेला नव्हता. तो मला सवंगड्यासारखाच बिलगलेला होता. हा वांडपणा माझ्यात कुठून आला हा ‘करमचंद’च्या संशोधनाचा विषय. मला आठवतंय, शाळेतून एकदा मी माझ्या सहव्रात्य मुलांबरोबर, शत्रुघ्न सिन्हाचा ‘कालिचरण’ बघायला गेलो. सिटीलाईट थिएटरमध्ये. मी आणि माझे मित्र दांडी मारून तो पिक्चर बघायला गेलो होतो. चित्रपट संपल्यावर, कुणी पाहू नये म्हणून, थिएटर बाजूच्या पतांची गल्लीतून मिसळण्याचा माझा मानस. या बाबतीत माझा मेंदू म्हणजे आईन्स्टाईन.

पण दुर्दैव मागगं असलं की ते डेटॉलनीच हात धुवून मागे लागते. कर्मधर्मसंयोगाने म्हणजे खरं तर आमच्याच कर्मानं. आम्ही पकडले गेलो. ते आमच्या पुरुषोत्तम नाईक सरांच्या नजरेनं. ते त्यावेळी आपल्या स्कूटरवरून तिथून जात होते. त्यांनी आमच्या गणवेषावरून आम्हाला पकडले.पण याची चाहूल आम्हाला तेव्हा लागली नव्हती. म्ही शाळेजवळ पोहोचताच आमच्या खबऱ्यांनी खबर दिली, की ‘माझी आई शाळेत आलीय. पली चोरी पकडली जाऊ नये, म्हणून आम्ही कुंपणावरून उडी मारून शाळेच्या इमारतीत घुसलो आणि तसेच जिन्यावरून खाली येऊ लागलो. जसं काही आम्ही वर्गातून येतोय आत्ताच.आणि आईला समोर पाहून, ळसूदपणे, आश्चर्यचकीत होत विचारलं, ‘आई, तू?’

आई सहजच नाईक सरांना भेटायला आलेली. ग सर शाळेत नाहीत, आणि काहीतरी थातुरमातुर कारण सांगून आईला, सरांना न भेटताच, परत पाठवून दिलं.. ‘कालिचरण’ आपल्याला वल्याच्या नादात मी खूष. आमच्या नाईक सरांच्या हजेरी घेण्याची पद्धत आगळी होती. वाऐवजी ते रोल नंबर पुकारत आणि कुणाची ‘हजेरी’च घ्यायची असली की शेवटून नंबराचा पुकारा करीत. ‘कालिचरण’चा दुसरा ‘चरण’ नाईक सरांनी उलटी हजेरी सुरू केली. लावलकर म्हणजे ‘डब्ल्यू’. माझा नंबर पुकारताच मी ‘येससर’ म्हणून खणखणीत हजेरी दिली, तसे नाईक सरांनी एक जळजळीत कटाक्ष माझ्याकडे टाकला. ‘इकडे ये वालावलकर’ मी त्यांची नजर चुकवून त्यांच्यापाशी जाऊन उभा राहिलो. ‘कालिचरण कसा होता, कालिचरण?’

आता खरं तर, या प्रश्नानं सावध होऊन शरणागती स्वीकारायची ना? पण आधीच वांड, त्यात कालिचरणचे भूत मानगुटीवर. मी व्रात्यपणे त्यांना सांगितले, ‘सर, अप्रतिम आहे. तुम्ही पण बघा.’ या वाक्याचा पूर्णविराम होताक्षणीच नाईक रांच्या बोटांचे वळ माझ्या गालावर. त्या चपराकीने माझ्या डोळ्यांसमोर तारांगण तर लेच, पण आई-बाबांचे ईश्वरतुल्य चेहरेही आले. विशेषत: आईचा. केवळ घरासाठी, त्या ऊलीनं आपल्या काळजावर दगड ठेवून,केवळ दहा दिवसांच्या नवजात मला घरात ठेवून, करी केली होती. त्यावेळी तिची काय घालमेल ली असेल? तिच्या मातृत्वाच्या भावनांना, तिच्या वात्सल्यालाच मी काय फसवलं त्या चतुराईमध्ये आपली हुशारी वाटते? तिच्या ममतामयी नजरेला पण नजर देऊ शकू का? सरांच्या बोटांचे वळ लांवरून माझ्या मनावर उतरले. त्या ‘वळां’नी माझ्या पुढच्या आयुष्याला ‘वळण’ लावायचं काम केलं.

पण माझ्या नकळतपणे मी माझ्या पालकांना ती त्रास दिला, त्यांची गणतीच नाही. पण ‘समजून घेणं म्हणजे काय आणि क्षमाशील किती सावं, यात आपली आई अगदी एव्हरेस्ट! आम्ही शाळेत स्कूलबसनं जात होतो. (खरे तर व्हाही तेवढी आर्थिक परिस्थिती नव्हती.) पण एकदा स्कूल बस आली नाही म्हणून टॅक्सीनं ण्याचं ठरवलं. तेव्हा टॅक्सीचं प्राथमिक भाडं ऐंशी पैसे. पण टॅक्सी थांबवली आणि तेवढ्यात स आल्यानं आम्ही बसनं शाळेत गेलो. इकडे खाली थांबलेल्या टॅक्सी ड्रायव्हरनं चौकशी करीत मचे घर गाठलं. तोपर्यंत ‘वेटींग’चे बिल दहा रुपयापर्यंत झालं होतं. आईनं ते त्याला दिलं. सारासाठी पै पै चे मोल जपत गाडा ओढणाऱ्या त्या माऊलीला माझ्याकडून नकळतपणे मी यातना दिल्या होत्या. आईच्या मायेचे मोल आपण करूच शकत नाही. मी तिच्याकडे हक्कानं (खरंतर हट्टानं) पेन्सिलीचा बॉक्स मागितला होता. माझ्या मित्राकडे होता तसाच. आपल्या मुलाला, इतर मुलांच्यात कमीपणा वाटू नये, न्यूनगंड येऊ नये म्हणून त्या माऊलीनं तो आमच्या दृष्टीनं महाग पेन्सिल बॉक्स मला आणून दिला होता. अगदी भर पावसात भिजत जाऊन…!

आज, मी जेव्हा त्यांच्या भूमिकेतून विचार करतो… तेव्हा त्यांच्या मातृत्वाचे, त्यांच्या त्यागाचं, खस्ता खाण्याचं मोल मला उमजलं… आपल्या शब्दांमुळे, आपल्या कृतीमुळे कुणी दुखावता नये… एवढं तर आपल्या हातून व्हावं.

मी जेव्हा प्रथमच नोकरीसाठी निघत होतो तेव्हा आबांनी मला जवळ बोलावलं. म्हणाले, ‘तू आता आयुष्याच्या नवीन पर्वात पदार्पण करतोयस. तर पुढच्या आयुष्यात असा वागत राहा की तुझ्याकडून एखादी चांगली गोष्ट घडली, किंवा केलीस तर ती समुद्राच्या वाळूवर लिही. पण चुकीची गोष्ट घडली तर मात्र ती काळ्या दगडावर लिही.’

वांडपणा अजून पुरता न संपलेल्या मला, हे पचनी पडायला थोडं जडच गेलं. पण आबांना आजवर कधीच उलट उत्तर केलं नव्हतं. पण ‘टिनएज’मधल्या मला ते धारिष्ट्य कुठून आलं माहित नाही. मी विचारलं ‘आबा, असं का हो?’ त्यांनी माझ्याकडे पाहत सांगितलं, ‘तू जे वाळूवर लिहिशील, ते लाटेच्या एका फटकाऱ्यासारशी पुसलं जाईल. जेणेकरून त्या चांगलेपणाचा उन्माद तुला होणार नाही, मस्ती राहणार नाही पण तुझ्यापासून कुणी पांथस्थ आबा, त्याने दगडावरची तुझी चूक वाचली तर तो सावध होईल आणि चुकीपासून परावृत्त होईल. त्याच्याकडून तीच चूक होणार नाही. त्याला त्याच्या आयुष्यात त्रास होणार नाही.”

अशा संस्कारांचं महत्त्व आज मला पटलंय. सभोवताली तत्त्वच्युत समाजात वावरताना, सदाचरणाला तिलांजली देत स्वार्थांध समाजकारणात आई-आबांसारख्या ईश्वरतुल्य माता-पित्यांच्या संस्कारांची शिदोरी, नाईक सर, कमलाबाई आणि दादासाहेब रेगेंसारख्या ऋषीतुल्य शिक्षकांच्या शिकवणीनं पुढचे आयुष्य चालतोय. माझ्या अजाणतेपणातील सुख-दुःखांचा लेखाजोखा मांडण्यापेक्षा या साऱ्या व्यक्तिंचे ऋण मान्य करणं, हेच हितकर!

–किरण वालावलकर
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..