नवीन लेखन...

आहारातील बदल भाग ५९ – चवदार आहार -भाग २१

कोणालाही मनापासून न आवडणारी पण, यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देत असल्यामुळे वैद्य मंडळीना आवडणारी चव म्हणजे कडू.

खरंच आहे. रोग नावाने कितीही मधुर वाटला तरी, प्रत्येक औषधात दडून बसलेली कडू चव मात्र रूग्णाचे जीवन गोड बनवते. या कडू चवीचा वापर युक्तीने जो वैद्य करतो, तो यशवान, गुणवान आणि परिणामी धनवान बनतो.

जसा कडू रस आपल्याला तो आवडत नाही, तसा पोटातील कृमींनाही तो आवडत नाही. त्यामुळे कृमींना बाहेर काढण्यासाठी कडू चवीची औषधे वापरावी लागतात.

कडू चवीची औषधे आईच्या दुधातील दोष दूर करतात. म्हणजे आईच्या दुधातून बाळाच्या पोटात जाऊन बाळाचे आजार कमी करू शकणारी, एवढी शक्ती असलेली ही कडू चव आहे.

आंबट, तिखट, गोड चवींप्रमाणे चविष्ट नसल्यामुळे खाण्याची इच्छा कमी करणारी असते. त्यामुळे साहाजिकच प्रमेहनाशक परिणाम दाखवते. आणि पचनशक्तीवरचा ताण आपोआपच कमी होत असल्यामुळे पाचन वाढवणारी ठरते.

कफ आणि पित्तनाशक गुणाची ही कडू चव तहान ताप मूर्च्छानाशक आहे. गळा, तोंड घशाची शुद्धी करणारी आहे. तसेच आमातून निर्माण होणारा चिकटपणा (क्लेद ) कमी करणारी, चरबी, मल मूत्र यांचे शोषण करून शुद्धीकरण करणारी, पचायला हलकी, आणि स्वभावाने थंड गुणाची आहे.

विशेषतः तापावर गुणकारी, रक्तदोष कमी करणारी, शरीरातील आजारानंतर राहिलेली उष्णता किंवा औषधांचे दुष्परिणाम कमी करणारी आहे.

व्यवहारात कारले, मेथी, हळद, औषधांमधे कडू किराईत ही जार कडू आहेत.

कडू उपाय तात्कालिक बरा न वाटणारा असला तरी उज्वल आरोग्यासाठी तो आवश्यक आहे.

अतिप्रमाणात वापरल्यास पित्त वाढते, साखर कमी होते, त्यामुळे थरथर होणे, शरीर आतून बाहेरून रूक्ष होणे, घसा कोरडा पडणे, बारीक होणे अशी लक्षणे दिसतात.

कडू म्हटलं तरी चेहेऱ्याच्या सर्व शिरा आखडून घेतल्या जातात. कडू चव, चवीला रूचकर नसली तरी, तोंडाची गेलेली चव परत आणण्यामधे मात्र एक नंबर आहे.

गेलेले धन परत आणण्यासाठी आणि बाहेर जाणारे धन बाहेर जाण्यापासून, वाचवण्यासाठी जसा एखादा कडू निर्णय घ्यावा लागतो, तसे रोग मुळातून घालवण्यासाठी कडू औषध देणे हा जालीम उपाय होतो.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
21.11.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..