नवीन लेखन...

अ‍ॅडव्हर्सिटी कोशंट (प्रतिकूलता गुणांक)

आजकाल आयुष्य एकदम फास्ट झालंय. त्या सुपरसॉनिक विमानांसारखे! आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने पळणाऱ्या आयुष्यात पालकांना आपल्या मुलांचा ‘आवाज’ कुठे ऐकू येणार? मुलांसाठी चांगली शाळा, चांगले मार्क्स, चांगले कॉलेज, चांगली नोकरी .. बस्स झाली पालकांची कर्तव्यपूर्ती.

काही दिवसांपूर्वी माझ्या एका मानसोपचार तज्ञ असणाऱ्या मित्राने एक नवीन संज्ञेशी परिचय करून दिला ती म्हणजे AQ अर्थात Adversity Quotient जो प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याच्या क्षमतेची कल्पना देतो. आपण त्याला प्रतिकूलता गुणांक म्हणू.

लहानपणी आयक्यु (बुद्ध्यांक) हाच शब्द सर्वत्र ऐकू यायचा. नंतर नोकरीला लागल्यावर त्यात भावनिक गुणांकाची म्हणजे इमोशनल कोशंट ची भर पडली. भावनांवर कुठे ताबा मिळवतो न मिळवतो तोच SQ म्हणजे Social Quotient कुणीतरी शोधला. खरे तर व्यक्तिशः याची गरज तशी कधी भासली नसल्याने ( म्हणजे अंगीभूत असल्याने) त्याविषयी एवढी आपुलकी वाटली नाही. आता हा AQ म्हणजे Adversity Quotient याचा उल्लेख सर्वत्र होतोय. आजकाल नोकरीला माणसे निवडताना पण हा प्रतिकूलता गुणांक पाहिला जातो.

पॉल स्टॉल्त्झ यांनी १९९८ मध्ये “अ‍ॅडव्हर्सिटी कोशंट: टर्निंग ऑब्स्टेक्चल्स इन ऑपर्च्युनिटीज” या पुस्तकात हा शब्द प्रथम वापरला. AQ निश्चित करण्यासाठी, स्टॉल्त्झ यांनी एक मूल्यांकन पद्धत विकसित केली ज्याला अ‍ॅडर्व्हिटी रिस्पॉन्स प्रोफाइल (एआरपी) म्हणतात. AQ हा जीवनात यशस्वी होण्याचा  एक संभाव्य निर्देशक आहे असे आपण म्हणू शकतो. एखाद्या मनुष्याचा आजूबाजूच्या बदलांना प्रतिसाद देण्याचा दृष्टीकोन, मानसिक तणाव, चिकाटी, दीर्घायुष्य, शिक्षण या गोष्टींचा अंदाज लावण्यास AQ प्रामुख्याने उपयुक्त आहे.

मुले जेव्हा लहान असतात तेव्हा  कोणत्या गोष्टीकडे पालक सर्वात जास्त लक्ष देतात? पालक आपल्या मुलांचे भविष्य घडविण्यासाठी म्हणजेच चांगले मार्क्स मिळावेत , चांगल्या उच्चशिक्षण मिळावे म्हणून लाखो रुपये खर्च करतात. मुलांचाही बराच वेळ अभ्यासातच जातो. परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी करायची हे शिकणे राहून जाते. उलटपक्षी मुले आयुष्याच्या शर्यतीत पळणाऱ्या पालकांकडे पहात असतात. या शर्यतीत जेव्हा अडचणी येतात तेव्हा पालक त्याला कसे तोंड देतात यावर बऱ्याचदा मुले पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यातल्या कठिण प्रसंगांना कशी तोंड देतात हे अवलंबून असते.

बर्‍याच काळापासून असे मानले जात होते की चांगली बुद्ध्यांक (इंटेलिजन्स कोशंट) असणे हे यशाचा एकमेव उपाय आहे. ते खरे नाही. यशस्वी होण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे चांगला इंटेलिजन्स कोशंट (आयक्यू), सोशल कोशंट (एसक्यू), इमोशनल कोशंट (ईक्यू) आणि अ‍ॅडव्हर्सिटी कोशंट ( एक्यू) चांगले गुण असणे आवश्यक आहे.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आयक्यूपेक्षा चांगले एक्यू जास्त महत्त्वाचा आहे.

प्रतिकूल परिस्थितींचा सामना करणे आणि त्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्याची क्षमता हे एक आवश्यक जीवन कौशल्य आहे जे आपल्याला लहान वयात मुलांना शिकवणे आवश्यक आहे. मजबूत एक्यू (AQ) असणे हे आरोग्यासाठी आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी  देखील महत्त्वाचे आहे. आयुष्य हे एकसमान कधीच नसते, तर उतार चढावांनी ते भरलेले असते. लहान वयापासून जेव्हा आव्हानांना तोंड द्यायला मुलांना शिकविले जाते तेव्हा आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांना, पराभवांना अशी मुले धैर्याने सामोरी जातात.

थोडा वेळ काढून आपल्या मुलांकडे लक्ष द्या आणि काही गोष्टींचे निरीक्षण करा. त्यातून तुम्हाला आपल्या मुलांचा AQ चांगला आहे की नाही ते कळेल. मानवी वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या सायंटिस्ट  एम्मी व्हर्नरच्या मते, अत्यंत चांगला AQ असलेल्या मुलांमध्ये खालील वैशिष्ट्ये आढळून येतात.

-अशी मुले एक्टिव्ह लर्नर असतात, सामोर येणाऱ्या समस्या सोडविण्याचा स्वतःहून प्रयत्न करतात. याउलट काही मुले जरा जरी काही अडले तर दुसऱ्याकडून मदतीची अपेक्षा करतात.

– कोणत्याही समस्यांचे निराकरण करताना  विधायक दृष्टिकोन बाळगतात.

– अशी मुले सहजा सहजी हार मानत नाहीत. याउलट काही मुले प्रयत्न करणेच सोडून देतात.

– अशा मुलांमध्ये विश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन बघायला मिळतो.

लक्षात ठेवा, आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच किंबहुना त्याहून जास्त महत्वाचे आहे त्यांना प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात कसे करायचे ते शिकविणे.

या लेखावर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा https://youtu.be/rV4hreeFqdY

— श्रीस्वासम 

Avatar
About श्रीस्वासम 15 Articles
अभियांत्रिकी शिक्षणाच्या आणि करिअर मार्गदर्शनाच्या क्षेत्रात गेल्या एकवीस वर्षांपासून कार्यरत. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी विविध अभ्यासक्रमांची आखणी व अभियांत्रिकीशी संबंधीत दोन पुस्तकांचे लेखन. शालेय जीवनापासून मराठी साहित्यामध्ये विशेष रुची. कविता, प्रवासवर्णन, द्वीपदी, आठवणी यांच्या माध्यमातून होणारे मराठी लेखन हे मुख्यत्वेकरून जीवनानुभवांवर आधारीत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..