नवीन लेखन...

ऍबॉर्शन! ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – ४

डॉ. कर्णिक, साठीच्या आसपास वय असलेले, नावाजलेले गायनीक होते. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेहमीच गर्भवती महिलांची गर्दी असायची. आजचा दिवसहि त्याला अपवाद नव्हता. रात्रीचे साडेनऊ वाजत आले होते. शेवटचा पेशंट तपासला कि, मॅटर्निटी वॉर्डातून राऊंड आणि मग ते या कामाच्या रगाड्यातून मोकळे होणार होते.
शेवटचे पेशंट, एक तेवीस चोवीस वर्षाची तरुणी होती. ती त्यांच्या केबिन मध्ये येताना डॉक्टरांनी तिचे निरीक्षण केले. श्रीमंतीकडे झुकणारी रहाणी. सुशिक्षित असावी. चालण्यात शहरी झाक म्हणजे थोडी ‘बिन्धास’ म्हणता येईल अशी. तिच्या हाती एक, जेमतेम वर्षाच्या आतले बाळ होत, आडवं धरलेलं.
डॉक्टरांनी स्मितहास्य करून तिला समोरच्या खुर्चीत बसण्यासाठी निर्देश केला. ती काळजीपूर्वक त्यांच्या समोर बसली.
“बोला, माधवी. काय त्रास होतोय?” तिच्या रजिस्ट्रेशनच्या फॉर्म वरून नजर फिरवत डॉ. कर्णिकांना तिचे नाव समजले होते.
“डॉक्टर, मला तुमच्या मदतीची नितांत गरज आहे. आणि मी मोठ्या आशेने तुमच्याकडे आली आहे.” तिच्या आवाजात एक प्रकारचा आत्मविश्वास डॉक्टरांना जाणवला.
“मी त्या साठीच येथे बसलोय. बोला माझ्या कडून कसली मदत तुम्हाला अपेक्षित आहे?”
“हे पहा, मी तुम्हाला स्पष्टच सांगते. माझी छकुली अजून वर्षाचीपण झालेली नाही. आणि —- आणि मी पुन्हा प्रेग्नन्ट आहे! मला ऍबॉर्शन करून हवाय!”
“प्रेग्रंसीबद्दल अभिनंदन. पण ऍबॉर्शन कशाला?”
“कशाला काय? दोन मुलात अंतर खूप कमी आहे. मला ते मुळीच पटत नाही. आणि मला जॉब सांभाळून या दोन दोन लेकरांची देखभाल –नाहीच. झेपायच मला!”
“माधवी, आता कितवा महिना आहे?”
“साधारण पाचवा आठवडा असावा.”
“ऍबॉर्शन साठी तुमचे शरीर सक्षम आहे का नाही. गर्भातल्या बाळाची परिस्थिती कशी आहे?, अश्या अनेक गोष्टी आपल्याला तपासाव्या लागतील. मगच तो गर्भपाताचा निर्णय ठरवता येईल. पण माझा तुम्हाला हाच सल्ला असेल कि, तुम्ही गर्भपात नका करू!”
या वाक्य सरशी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. कोठे तरी तिच्या आत्मसन्मानाला ठेस लागली असावी.
“डॉ. मी ऍबॉर्शन करावं का? करु नये? हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे! हा देह माझा आहे! त्यातला गर्भाशय माझाच आहे! आणि त्यात वाढणारा गर्भही माझाच! तेव्हा तो वाढवायचा का पडायचा हे मीच ठरवणार!!”
“ओके! एकदम मान्य! अश्या एक्ससाईट होऊ नका. तुमची नेमकी अडचण माझ्या लक्षात आली आहे. तुम्हाला दोन दोन लहान मुलं हाताळणं जमणार नाही. ठीक आहे ना?”
“हो. अगदी बरोबर! मघापासून मी हेच तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे!”
“एक बाळ अगदी आरामात सांभाळलं?”
“हो, अगदी आनंदाने!!” डॉक्टर बहुदा ऍबॉर्शनला तयार होणार असं दिसतंय. न व्हायला काय झालं? दाबून पैसे घेणार ना! डॉ. कर्णिकसारख्या गायनीकच्या हाती, प्रत्येक गर्भवती सेफ असते हि त्यांची ख्याती आहे.
क्षणभर डॉक्टर विचारात पडल्या सारखे दिसले. त्यांच्या निर्णय झाला असावा. त्यांनी घसा खाकरला.
“तुमची अडचण सोडवण्यासाठी माझ्याकडे एक उत्तम उपाय आहे. त्यात तुम्हाला कसलाही धोका किंवा वेदना होणार नाहीत. सांगू का?”
“जरूर सांगा डॉक्टर. मला त्रास न होता माझी अडचण दूर होणार असेल तर छानच आहे.”
“ठीक आहे. आपण असेच करू. एक बाळ कमी करू, म्हणजे तुमची अडचण दूर होईल. आपण या तुमच्या हातातील छकुलीला निरोप देवू! पोटातलं बाळ वाढावा. ते एकटच असेल. तुम्हाला सांभाळायला त्रास पण होणार नाही. तुमच्या मनाप्रमाणे होईल!”
रागाने तिच्या मुठी आवळल्या गेल्या. संतापाने तिची लाही लाही होत होती.
“डॉक्टर आहेत का खाटीक? हा असला अघोरी उपाय सुचविण्याची तुमची हिम्मत झालीच कशी? तुमच्या सारख्या लोकांनी या पवित्र व्यवसायाला काळिमा फसलीयय! आम्ही डॉक्टरांच्या रूपात देव पहातो, अन तुम्ही तर साक्षात यमदेव निघालात! बेशरम! नीच !”
“माधवी, मी नाही, तुम्हीच ‘खाटीक’ आहेत! तुम्हाला माहित नसेल, मी गेली तीस वर्ष, म्हणजे तुमच्या वयापेक्षा अधिक काळ, रोग्यांच्या वतीने मृत्यूशी झुंज देतोय. डॉक्टर झाल्यावर,  ‘मी प्रत्येक जीव वाचवण्याच्या पराकोटीचा प्रयत्न करीन’ अशी शपत घेतली होती. आणि आजही ती मला पूर्णपणे लक्षात आहे! जसा तुमच्या या छकुलीला जीव आहे, तसाच त्या गर्भातील बाळाला पण आहेच! मी तो हि वाचवणार! मला ‘खाटीक’ म्हणताना, तुम्ही किती सहजपणे ऍबॉर्शन करा म्हणालात? हे आठवून पहा! तुम्हाला होणार त्रास फक्त, तुम्हाला ठळकपणे दिसला. तो पोटातला जीव नाही दिसला? त्याला जन्माला येण्याचे आमंत्रण कोण दिले होते? तुम्हीच ना? मग का, त्या जीवाला बोलावून मारताय?”
माधवी खाली मान घालून बसली होती.
“स्वतःला सुशिक्षित म्हणवता. मुलं नको होत तर, योग्य काळजी का घेतली नाही? म्हणे करा ऍबॉर्शन! अहो, नैसर्गिक गर्भपात वेगळा, तेथे निसर्ग गर्भाला सगळाच्या सगळा बाहेर फेकतो! आणि हे ऍबॉर्शन वेगळे! तुम्हाला ठाऊक तरी आहे काय? ऍबॉर्शनच्या वेळेस काय करावं लागत आम्हा डॉक्टरराना?  त्या तुमच्या पोटातल्या बाळाचे नुकतेच फुटू पहाणारे हात, पाय तोडावे लागतात! मान कापावी लागते! त्याचे बारीक बारीक तुकडे बाहेर काढावे लागतात!”
माधवीला ते एकवेना. डॉक्टरांनी डोळ्यासमोर उभेकेलेले ते रक्तरंजित चित्र तिला सहन होईना. आपल्याच रक्त मासाच्या इवल्याश्या जीवाचे तुकडे? हात डॉक्टरांचे तरी इच्छा आपलीच!
“बस करा डॉक्टर! बस करा! नाही ऐकवत!” ती कशीबशी म्हणाली आणि ओक्सबोक्शी रडू लागली.
डॉक्टर आपल्या जागेवरून उठले. त्यांनी  सांत्वनासाठी मायेने माधवीच्या पाठीवरून हात फिरवला.
“सांभाळा माधवी, स्वतःस सांभाळा. मी फक्त डॉक्टर नाही. मी अनावश्यक गर्भपात टाळावेत म्हणून जी संस्था आहे, तिचा एक सच्या कार्यकर्ता सुद्धा आहे. मी याबाबतीत सुपदेश आणि मार्गदर्शनपण करतो. म्हणून इतकावेळ तुमच्यासाठी दिला.”
माधवी आता बरीच सावरली होती.
“सॉरी डॉक्टर. मी मघाशी तुम्हास रागाच्या भरात बरच वाईट साईट बोलले. मला तुमचे म्हणणे पटतंय. थोडी गैरसोय होईल, पण ठीक आहे.करीन मी मॅनेज! मी दोन्ही मुलं वाढवीन.”
” थँक्स! मला तुमची हीच प्रतिक्रिया अपेक्षित होती. एक गंमत दाखवतो तुम्हाला. तुम्हास त्या बाहेर बसलेल्या बाई दिसतात का?” त्यांनी तिला, केबिनच्या काचेतून बाहेर बसलेली एक पोक्त बाई दाखवली.
“हो. त्यांचं काय?”
“त्यांच्या चेहऱ्यात गेल्या पंचेवीस वर्षात फारसा फरक पडलेला नाही. माझ्या करियरच्या सुरवातीच्या काळात, नेमकी तुमच्यासारखीच समस्या घेऊन माझ्या कडे आल्या होत्या. मी त्यांनाहि ‘गर्भपात नका करू.’ हाच सल्ला दिला होता.”
“हो. त्या बद्दल मी तुमची आभारी आहे! कारण ती बाई माझी आई आहे! मी आणि माझ्या मोठी बहीण यांच्या वयात जेमतेम एक वर्षाचे अंतर आहे!”
डॉक्टरांना हि माहिती नवीन होती. म्हणजे या बाबतीत सुद्धा इतिहासाची पुनरावृत्ती होत होती.
डॉक्टरांना त्यांच्या ‘ अनावश्यक गर्भपात विरोधी’ चळवळीसाठी माधवीच्या रूपाने एक कार्यकर्ती मिळाली. हे कार्य तिने स्वतःहून स्वीकारले होते!
— सु र कुलकर्णी.
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.
(मूळ कल्पना नेट वरून.)

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..