नवीन लेखन...

आरोग्य

शाळेत असताना आपण हा सुविचार एकदा का होईना फळ्यावर लिहिला असेल च कि “Health is Wealth” पण या धकाधकीच्या जीवनात खरंच आपण स्वतःची काळजी घेत आहोत का ???

चांगले आरोग्य म्हणजे नुसते आपले चांगले खाणे पिणे नाही.निरोगी माणूस म्हणजे शारीरिक आणि मानसिक रित्या फिट असणे गरजेचे आहे शरीराची काही दुखणे वर आले कि होईल बरे असा विचार करून आपण दुर्लक्ष करत असतो.चौरस आहार,नियमित व्यायाम हे सगळे पुस्तकात च वाचतो आपण.पण तस प्रत्यक्षात घडत नाही.
आताच च बघा ना ह्या कोरोनाच्या परिस्थितीत अजून हि कोरोना वगैरे काही नाही म्हणून लोक बिना मास्क ने फिरतात आणि आजारी पडतात.मग सुरुवातीला आपले घरगुती उपचार त्यातून नाही बरे झाले कि डॉक्टर चे उपचार.यात आपण अडकून पडतो.काहींनी तर आपले प्राण हि गमवलेत.म्हणून सुरवातीपासून च चौरस आहार आणि तब्बेती कडे दुर्लक्ष न करता राहायला पाहिजे.आता जवळपास सगळ्याच लोकांच्या घरात पिझ्झा बर्गर ची जागा आयुर्वेदिक काढ्याने घेतली आहे.म्हणून शारीरिक आरोग्य जपण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या.कारण “जान हे तो जहाँ हे “.

शारीरिक आजार जडला कि त्यावर आपण लगेच उपचार घेऊ शकतो पण मानसिक आजार च काय.काही लोक तर नुसते कोरोनाच्या धास्तीने च गेलेत कारण मानसिक कमकुवतपणा

शारीरिक आरोग्यासोबत मानसिक स्वास्थ्य तेवढेच गरजेचे आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी मनात सकारात्मक विचार आणणे महत्वाचे आहे.मनात आलेल्या नकारात्मक विचारांवर ताबा मिळवणे गरजेचे आहे.त्यासाठी सुद्धा बरेच उपचार आहेत पण लोक ह्या विषयावर मन मोकळे पणाने बोलत नाही.शरीराचं काही दुखले कि आपण डॉक्टर कडे जातो पण मन दुखले तर काय. म्हणून काही माणसे जपा ज्यांच्याजवळ तुम्ही तुमचे मन मोकळे करू शकता

आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते सुंदर जगण्यासाठी तसे आरोग्य हि जपले पाहिजे मग ते शारीरिक असो किंवा मानसिक असो.

— वृषाली लवेश चौधरी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..