नवीन लेखन...

अर्थसंकल्पासंदर्भातील अशाच काही गोष्टी

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारीला ११ वाजता लोकसभेत अर्थसंकल्प मांडला.  अर्थसंकल्पाविषयी काही रंजक गोष्टींचा आढावा घेऊया!

१९९९ सालापूर्वी संध्याकाळी ५ वाजता अर्थसंकल्प मांडला जायचा. इंग्रजांनी भारतासाठी अर्थसंकल्प मांडण्याची सुरूवात केली, त्यावेळी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ संध्याकाळी ५ वाजताची ठरवण्यात आली होती.

मात्र १९९९ मध्ये एनडीए सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ बदलून सकाळी ११ वाजताची केली.

१९९२ पासून भारतात अर्थसंकल्प टीव्हीवर प्रक्षेपित करण्यात येऊ लागला.

अर्थसंकल्पासंदर्भातील अशाच काही गोष्टी….

– स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून आर. के. षण्मुखम चेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

– स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 साली मांडण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 पासून ते 31 मार्च 1948 पर्यंत या कालावधीसाठीचा हा अर्थसंकल्प होता.

– 1950  मध्ये प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांनी हा अर्थसंकल्प मांडला होता.

– 1955-56 च्या अर्थसंकल्पाचे सर्व दस्तावेज पहिल्यांदा हिंदी भाषेत छापण्यात आले होते. यापूर्वी दस्तावेज इंग्रजी भाषेतच छापण्यात येत होते.

– मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंह, विश्वनाथ प्रताप सिंह आणि मनमोहन सिंह या चार माजी पंतप्रधानांनी अर्थमंत्रिपदाचीही धुरा सांभाळली आहे.

– पंतप्रधानपदी विराजमान असताना जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थमंत्रिपदाची जबाबदारी होती.

– जवाहरलाल नेहरू यांनी 1958-59 सालचा अर्थसंकल्प मांडला. पुढल्या वर्षी 28 फेब्रुवारीच्या दिवशीच अर्थसंकल्प मांडण्यात येईल, अशी घोषणा त्या दिवशी करण्यात आली.

–  मोरारजी देसाई यांनी एकूण 10 वेळा अर्थसंकल्प मांडला आहे तर पी. चिदंबरम यांनी 8 वेळा अर्थसंकल्प मांडला आहे.

– अर्थमंत्री असताना 1991 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरण धोरणाच्या अंमलबजावणीची घोषणा केली होती.

– 2017-18 पासून रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्ररित्या सादर  न करता त्याचा सर्वसाधारण अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला.

— मराठीसृष्टी टिम 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

*

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..