नवीन लेखन...

लग्नानंतर बाहुबली

काल दि.15 मे. रोजी धक धक गर्ल माधुरी दिक्षीत (नेने)हीचा वाढदिवस देशभरात मोठ्या उत्साहानं पार पडला. खरचं तिचं 51 व्या वर्षात पदार्पण, रात्री झोप लागेपर्यंत विचार करीत होतो , उत्तर सापडलेच नाही. .

परवा एका whatsup group वर असाच एक message आला. ‘एका नवर्याचे मनोगत- लग्नाआधी नाजूक, सुंदर असलेली बाहुली लग्नानंतर बाहुबली केव्हा होते कळतच नाही’. आणि त्यापाठोपाठ अनेकांना फुटलेलं हसू आणि वाटलेली गम्मत.

विचार केला आणि लक्षात आलं, खरंय अगदी… लग्नात अगदी शेलाटी बांध्याची, नाजुकशी वाटणारी गोड नवरी किती लवकर रूप पालटते. लवकर म्हणजे अगदी ५-१० वर्षातच संपूर्ण कायापालट होतो तिचा. काही जणी वजनाने दुप्पट होतात, तर काही अचानक मोठ्या, वयस्क वाटायला लागतात. ‘एकदा लग्न झालं की दोन वर्षात अश्याच होतात (म्हणजे बाहुबली होतात) सगळ्या मुली’ हे वाक्य तर अगदी ऐकिवातलंचं. नवर्याच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण सोपं जातं तिला पण मग बाहुली राहणं का जमत नसेल? खरं तर कोणत्याच मुलीला बाहुबली होण्याची हौस नसते. पण लग्नंतर तिच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या, बाळंतपण,आईपण, कामाचा भार आणि अनेक इतर छोट्या मोठ्या गोष्टीत तिचा आवश्यक असणारा सहभाग यातून स्वतःसाठी वेळ काढणं जमतच नाही तिला, मग ती नोकरी करणारी असो किंवा नसो. तिलाही वाटतं, पूर्वीसारखंच चार चौघीत आपण उठून दिसावं. दुकानात लावलेल्या mannequin वरचा ड्रेस आपल्यालाही तसाच शोभून दिसावा. साडी छान दिसण्यासाठी नेसावी, skirt, jeans काहीही मोकळेपणाने घालता यावं आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे नवर्याने आपलं कौतुक करावं.

स्नेहा नावाची माझी एक मैत्रीण आहे. ती तिच्या नवर्याच्या तब्ब्येतीची, खाण्यापिण्याची (डाएट ची) अगदी व्यवस्थित काळजी घेते. नवरा सकाळी उठून मोर्निंग वॉकला जातो तेव्हा ही कमी तेलातली भाजी, पोळी कोशिंबीर, salad असा सगळा डबा तयार करते. दुपारी/मधल्या वेळेत खाण्यासाठी म्हणून एखादं फळ, सुका मेवा,ताक असं देखील न चुकता पॅक केलेलं असत आणि दररोज असा नेटका डबा घेऊन नवरा कामाला जातो. मुलांच्याही बाबतीत तेच. नेटका आणि संपूर्ण डबा. संध्याकाळी त्यांना ground ला नेणं, dance क्लास किंवा अजून काही असेल तर तिथे नियमाने नेणं-आणणं हे सगळंच ती करते. रात्रीच उरलेलं अन्न ती नवर्याच्या, मुलाबाळांच्या तोंडी लागू देत नाही पण ते टाकवतही नाही म्हणून तिच्या स्वतःच्या वाट्याला breakfastच्या रुपात येतं. अगदी रोज नाही तरी जेव्हा अन्न उरतं तेव्हा नक्कीच. ‘आज सकाळी वॉकला जाणं जमत नाहीये, तर संध्याकाळी जाईल‘ असं म्हणत अनेक आठवडे निघून जातात पण तिच्या नुकत्याच सोडलेल्या व्यायामाच्या संकल्पाला मुहूर्त लागत नाही. नवर्याचा पूर्ण support आहे तिला.. तो नेहमीच सांगतो तिला, शिळं खात जाऊ नकोस, व्यायाम करत जा, वॉकला जात जा. वजन कमी कर. तिने वेळोवेळी beauty parlor ला जावं असंही त्याला वाटत असतं पण तीच कंटाळा करते असं त्याचं ठाम मत आहे.

अश्या अनेक स्नेहा आपल्या ओळखीच्या असतात आणि त्यांचे support करणारे नवरे सुध्दा. पण ज्या , dedication नी ती नवऱ्याच्या आणि मुलांच्या तब्येतीची काळजी घेते, त्याच dedication ने नवराही तिच्यासाठी efforts घेतो का, तिची काळजी घेतो का हे विचारात घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मुलींना स्वतःकडे लक्ष देणं जमत नाही ह्याचं खरं कारण म्हणजे नवर्याकडून मिळणारा support हा शाब्दिक असतो. म्हणजे त्यांना खरोखर बायकोने maintained राहावं असं वाटत असलं तरी त्यासाठी घरातल्या छोट्या मोठ्या कृतीत/कामात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची त्यांची तयारी नसते. वीकेंडला ‘आज काहीतरी वेगळ कर breakfast आणि जेवणात’, ‘वीकेंड breakfast वैशालीला आहे माझा मित्रांसोबत’, असं सांगण्याऐवजी ‘मी करत जाईन वीकेंडला breakfast, तू वॉकला जात जा’ असं सांगणारा नवरा म्हणजे खरा supportive. बायको रोज ऑफिसमधून घरी आल्यावर (कितीही थकलेली असली तरीही )काहीही कुरकुर न करता स्वयंपाक करते हे फ़क़्त appreciate करून remote घेऊन TV समोर न बसता तिला थोडी मदत करणारा, अगदी स्वयंपाकात मदत नाही करता आली तरी, आपलं जेवण आपण वाढून घेणारा, मुलांची जेवणं आटोपणारा आणि अभ्यास घेणारा, दुसर्या दिवसाची दोघांच्या ऑफिसच्या आणि मुलांच्या शाळेच्या डब्याची तयारी करणारा नवरा म्हणजे खरा supportive.

बायको जॉब करणारी नसेल तर हिच गोष्ट आणखीनच कठीण होऊन बसते कारण, ‘दिवसभर बायकोला काही काम नसतं, त्यामुळे तिला वेळही मिळतो, आरामही होतो आणि स्वतःची अशी SPACE सुद्धा मिळते’ असं समजणारा एक मोठा वर्ग आहे. पण खरोखर तसं असतं का हे प्रत्यक्ष ते आयुष्य जगल्याशिवाय लक्षात येत नाही. अगदी सहज, सोपी वाटणारी आणि अनेकदा लक्षातही न येणारी अनेक कामं त्या वेळात तिला करायची असतात, त्यातही मुलांना वेळ देण्याचं सर्वात मोठं आणि महत्वाच काम ती करत असते. कधी मैत्रिणींना भेटायचं असेल किंवा कुठे बाहेर जायचं असेल तरी, नवऱ्याचं आणि मुलांचं जेवण तयार केल्याशिवाय तिला बाहेर पडता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. याउलट मित्रांना भेटायचं ठरलं की बायकोला ‘आज मी जेवायला नाहीये घरी’ एवढं सांगून नवरा मोकळा होतो. शिवाय वेळेचंबंधन नसतंच.
वीकेंडला जसा तुम्हाला बदल हवा असतो तसाच तुमच्या बायकोलाही, ती जॉब करणारी नसली तरीही. आणि हे समजून घेऊन तिला स्वतःसाठी वेळ देता यावा म्हणून आपल्या कामात, वेळेत ADJUSTMENT करणारा नवरा म्हणजे खरा SUPPORTIVE. असा नवरा असेल तर खरोखर लग्नाआधी बाहुली असणारी बायको ही लग्नानंतरही बाहुलीच राहू शकते यात शंकाच नाही. म्हणून पुरुषांनी खरोखरच विचार करायला हवा… लग्नानंतर आपल्या घरी आलेल्या बाहुलीला बाहुबली बनवण्यात आपला तर हातभार नाही ना?

— संकलन : अशोक साने

फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..