नवीन लेखन...

घास रोज अडतो ओठी

हॉलमध्ये तुफान गर्दी . सगळीकडे झगमगाट . फॅशनच्या नावाखाली काहीही परिधान केलेल्या ललना आणि फाटलाय की टेलर ने वाकडी तिकडी कैची चालवून शिवलेल्या वस्त्राला फॅशन म्हणून स्वीकारलेले पुरुष दागदागिन्यांचं प्रदर्शन. परफ्यूमचा बेशुद्ध व्हायला लावणारा घमघमाट. काहींच्या तोंडी, त्यांनाच केवळ सुमधुर वाटणारा अल्कोहोलचा सुवास. हातात कुणीतरी कोंबलेला पेढा, सुपारी आणि उरलेल्या अक्षतांचं काय करायचं या संभ्रमात असताना, […]

जमशेदजी नसरवानजी टाटा

‘टाटा’ हे नाव आज भारतीय उद्योगजगतात कल्पकता, उपक्रमशीलता, सचोटी आणि संपूर्ण व्यावसायिकता यांच्याशी समानधर्मी असे मानले जाते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी टाटा उद्योगसमूहाची भक्कम पायाभरणी करणारे जमशेटजी टाटा यांनी अठराव्या शतकाच्या अखेरीस गुजरातच्या नवसारी नावाच्या एका छोट्याशा खेड्यात एक लहानसं रोपटं लावलं. […]

छत्रपती राजाराम महाराज

स्वराज्याची अर्थव्यवस्था भक्कम असावी याकडे त्यांचे लक्ष होते. अर्थव्यवस्था, लष्करी यंत्रणा, प्रशासन यावर त्यांची उत्तम पकड होती. जिंजीच्या वेढ्यात असताना मोगलांचे संकट टाळण्यासाठी झुल्फिकार खानाबरोबर त्यांनी अंतःस्थ मैत्री प्रस्थापित केली, राजाराम महाराजांनी कृष्णाजी अनंत सभासदांकडून “शिवचरित्र’ लिहून घेतले. हा मराठी भाषेचा आणि शिवचरित्राचा ऐतिहासिक ठेवा आहे. राजाराम महाराजांनी महाराणी ताराबाईंना युद्धकला, राजनीतीचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे ताराबाईंनी मराठा साम्राज्याचे मोठ्या हिमतीने संवर्धन आणि संरक्षण केले. […]

मेहता पब्लिशिंग हाउस’ चे अनिल मेहता

आनंद यादवांच्या ‘माळ्यावरची मैना’ या कथासंग्रहाने मेहता पब्लिकेशनचा प्रवास सुरू झाला. आत्तापर्यंत ४५०० हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. विविध भाषांमधील पुस्तकांच्या वाढत्या मागणीमुळे त्यांनी बंगाली, गुजराती, हिंदी, कानडी या भाषांमध्ये देखील पुस्तके करायला सुरुवात केली. […]

प्रसिद्ध लेखिका, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू

मीना प्रभू यांनी गोवा येथील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले होते. तसेच मीना प्रभू यांना दि. बा. मोकाशी पारितोषिक-२०१०, गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार-२०११, न. चिं. केळकर पुरस्कार-२०१२, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील मिळाले. […]

भारतीय बुद्धिबळ ग्रॅंडमास्टर अभिजीत कुंटे

बुद्धिबळ खेळाचा विचार करता अभिजित यांनी गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचा झेंडा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत उच्चस्थानावर फडकवत ठेवला आहे. गेली अनेक वर्षे अभिजित जागतिक स्तरावर पहिल्या १५० बुद्धिबळपटूंत स्थान टिकवून आहेत. […]

संगीतकार व गायक शंकर महादेवन

१९९५ पासून चित्रपटात पार्श्वगायन करणाऱ्या महादेवन यांनी गायिलेल्या कंडुकोदायन या तमिळ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. हिंदी, तेलगु, कन्नड चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले आहे. […]

तारक मेहता

तारक मेहता यांच्या लेखनामध्ये नेहमीच नव्या पिढीच्या विचारांचे प्रतिबिंब पाहायला मिळाले. ‘दुनियाने उंधा चष्मा’ या सदरासाठी आणि अनोख्या लेखन शैलीसाठी तारक मेहता ओळखले जायचे. गुजराती रंगभूमीसाठी तारक मेहता यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. […]

कथाकार आणि कादंबरीकार कुसुम अभ्यंकर

कुसुम अभ्यंकर यांचे माहेरचे नाव कुसुम दामले. रत्नागिरीतील डॉ.अभ्यंकर यांच्याशी लग्न झाले. लग्न झाल्यावर डॉ.अभ्यंकर यांच्या वैद्यकीय व्यवसायाला पूरक म्हणून कुसुम अभ्यंकर यांनी नर्सिंगचा कोर्स केला. […]

कादंबरीकार सुरेश जनार्दन द्वादशीवार

सुरेश जनार्दन द्वादशीवार यांनी १७ वर्षं विदर्भ साहित्य संघाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. तसंच त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळांचं आणि साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं होतं. […]

1 28 29 30 31 32 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..