नवीन लेखन...

आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन

नोकरी करताना वेळ नाही हे पालुपद फक्त स्वत:च्या संदर्भात, बाकी इतरांसाठी धावतपळत ती सगळी कामं करतच असते. एवढंच कशाला, नोकरी करून निवृत्त झाल्यावरसुद्धा ती घरातली सारी कामं स्वत:वर ओढून घेते. इतकी वर्ष माझं तसं घराकडे दुर्लक्षच झालं म्हणत पोळ्या करणा:या बाईला सुटी देते. आपण आहे ना काम करायला, मग कशाला पैसे खर्च करा म्हणत कामच करते. स्वत:वर पैसे खर्च करण्याआधी दहादा विचार करते. स्वत:च्या ‘फिटनेस’साठी तर एक पैसा खर्च करायलाही तयार होत नाही. ती विचार करते, त्यापेक्षा मी घरात थोडं जास्त काम करेन. भाजी आणायला गेल्यावर थोडं जास्त चालायला जाईन. पण हे एवढंच करून ती फिट राहू शकत नाही. त्यासाठी रोज वेगळा वेळ काढून व्यायामच करायला हवा. आणि स्वत:कडे अजिबात दुर्लक्ष न करता स्वत:साठी वेळ काढायलाच हवा. […]

जेम्सबॉण्ड 007 या जेम्स बॉण्डचा जनक इयान फ्लेमिंग

इयान फ्लेमिंग यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक नोकऱ्या केल्या. या नोकऱ्यांदरम्यान आलेला अनुभवच त्यांना जेम्स बॉण्डचे पात्र हुबेहूब साकारण्यात झाला असे म्हटले जाते. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात इयान यांनी ब्रिटनच्या नाविक दलाच्या गुप्तहेर खात्यात नोकरी केली आणि त्याच ठिकाणी काम करताना त्यांच्या डोक्यात साकारले ऑपरेशन गोल्डन आयचे कथानक. याच दरम्यान युनिटो २० असॉल्ट युनिट आणि टी फोर्स ह्या दोन गुप्तहेर संघटना उभारण्याचे काम त्यांच्या देखरेखीखाली झाले. युध्दकाळातील ही नोकरी आणि त्यानंतर केलेल्या पत्रकारितेतील नोकरीने जेम्स बॉण्डकरिता भरपूर खाद्य इयान यांना उपलब्ध झाले. या अनुभवावरच आधारित १९५२ मध्ये पृथ्वीतलावर अवतरला जेम्स बॉण्ड ००७. […]

अभिनेते, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर

अभिनेते, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचा जन्म २१ मे १९५६ रोजी चेंदणी कोळीवाडा येथे झाला. डॉ.जयप्रकाश घुमटकर हे ठाण्याच्या शैक्षणिक साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेली चाळीस वर्षे सातत्याने कार्यरत आहेत. चाळीस वर्ष साहित्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात व देशभरामध्ये ते करीत असतात. साहित्यातील विविध विषय आपल्या लेखणीद्वारे परखडपणे हाताळणारे जयप्रकाश यांनी हे […]

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक वहिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तिरस्कार करणारे समाजसुधारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. […]

अमेरिकी लेखक हॅरॉल्ड रॉबिन्स

दी सिक्रेट, दी ॲ‍डव्हेन्चरर्स, गुडबाय जेनेट, ड्रीम्स डाय फर्स्ट, मेमरीज ऑफ अनदर डे, दी बेट्सी, दी लोनली लेडी, दी इनहेरीटर्स, दी स्टॅलीयन, दी रेडर्स, दी स्टोरीटेलर, हार्ट ऑफ पॅशन, दी बिट्रेयर्स, टायकून, स्पेलबाइंडर, नेव्हर लीव्ह मी, स्टिलेट्टो, दी पिरान्हाज, सिन सिटी, दी कर्स, ७९ पार्क अव्हेन्यू, प्रीडेटर्स, अशा त्याच्या कादंबऱ्या लोकप्रिय आहेत. […]

ज्येष्ठ भारतीय साम्यवादी नेते व कामगार पुढारी श्रीपाद अमृत डांगे

श्रीपाद अमृत डांगे यांच्या बद्दल अशी गोष्ट सांगितली जाते की डांगे यांच्या नेतृत्त्वातून आणखी दोन गोष्टी जन्माला आल्या. महाराष्ट्र राज्याची निमिर्ती झाली आणि फ्लोरा फाउंटनला हुतात्मा स्मारक निर्माण झाले. त्यात शेतकरी आणि कामगारांच्या एकजुटीची प्रतिमा आली. महाराष्ट्र राज्यनिमिर्तीसाठी दिल्लीतील विद्वानांनी १ एप्रिल ही तारीख ठरवली होती. यशवंतराव चव्हाणांनी हा बेत कॉ.डांगे यांना सांगितला तेव्हा ते म्हणाले, ‘अहो, शहाण्यांना मूर्ख बनवण्याचा जागतिक दिन तो, आणि त्या दिवशी तुम्ही नव्या राज्याची गुढी उभारणार? ते जमायचं नाही. हा लढा मुख्यत्वे मुंबईच्या कामगार वर्गात लढलेला आहे. तेव्हा मे दिन हाच महाराष्ट्र दिन होईल. नेहरूंना समजावण्याची जबाबदारी माझी.’ कॉ.डांगे नेहरूंना दिल्लीत जाऊन भेटले. ‘आम्हाला एप्रिल फूल करताय का?’ असा प्रश्न त्यांनी केला. नेहरूही हसले आणि त्यांनी १ मे ही तारीख मान्य केली. आणि १ मे महाराष्ट्र दिन झाला. […]

भारतीय फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना

प्रसन्ना यांनीच भारताला परदेशी भूमीवरचा आपला पहिला टेस्ट सिरीज विजय न्यूझीलंडमध्ये मिळवून दिला. त्या सिरीजमध्ये त्यांनी एकूण २४ विकेटस काढल्या होत्या. कारकिर्दीतल्या १०० विकेट्सचा टप्पा गाठायला त्यांना अवघ्या २५ मॅच लागल्या. तो देखील एक विश्वविक्रम ठरला होता, जो पुढे त्यांचा वारसदार समजल्या जाणाऱ्या आर. अश्विनने पन्नास वर्षांनी मोडला. […]

भारतीय प्रबोधनाचे जनक राजाराम मोहन रॉय

राम मोहन बाबू स्मशानात जाउन सती जाणार्याथ स्त्रीयांच मन वळवायचा, त्यांना सती जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत. ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनीन १७९८ साली कलकत्त्यामधे सर्वप्रथम सतीबंदी कायदा लागू केला. परंतु हा फक्त कलकत्ता शहरापुरताच लागू होता. त्यानंतर विल्यम कॅरे हा ख्रीश्चन मिशनरी आणि विल्यम विल्बरफोर्स या दोघांनी सती प्रथेविरुद्ध आंदोलन आणि प्रचार सुरु केला. याची दखल घेउन कंपनी सरकारन १८१३ मधे सती जाणाऱ्या स्त्रीयांची मोजणी सुरु केली. […]

सिलोन रेडिओचे निवेदक गोपाल शर्मा

‘गोपाल शर्मा’ यांनी काही खास शब्द वापरात आणले. ‘आवाज की दुनियाके दोस्तो’ हा शब्दप्रयोग त्यांचाच. (त्यांच्या आत्मचरित्राचं नावही हेच आहे. ) ‘शुभाशिष’, ‘शुभरात्री’, ‘बंधूवर’ हे शब्दही त्यांनीच प्रथम रेडीओवर आणले.
‘शहाजहाँ’ चित्रपटातील कुंदनलाल सैगल यांच्या एका गीतात, महंमद रफींचा अल्प सहभाग आहे. ‘अपनी पसंद’ या कार्यक्रमात गोपालजींनी हे गाणं लावलं आणि रफीचा आवाज असलेली ती ओळ त्यांनी श्रोत्यांना लागोपाठ तीन-चार वेळा ऐकवली. […]

वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई

त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात टाइम्स ऑफ इंडियापासून केली आणि वयाच्या २६ व्या वर्षी ते मुंबई आवृत्तीचे सिटी संपादक होते. सहा वर्षे टाईम्स ऑफ इंडिया मध्ये नोकरी केल्यावर राजदीप सरदेसाई यांनी १९९४ मध्ये न्यू दिल्ली टेलिविझन (एनडीटीव्ही) मध्ये संपादक म्हणून नोकरीला सुरुवात करून टेलिव्हीजन पत्रकारिता मध्ये त्यांनी पदार्पण केले. आपली स्वत: ची कंपनी ग्लोबल ब्रॉडकास्ट न्यूज (जीबीएन) तयार करण्यासाठी त्यांनी एनडीटीव्ही सोडली. […]

1 5 6 7 8 9 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..