नवीन लेखन...

अभिनेते, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर

 

अभिनेते, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचा जन्म २१ मे १९५६ रोजी चेंदणी कोळीवाडा येथे झाला.

डॉ.जयप्रकाश घुमटकर हे ठाण्याच्या शैक्षणिक साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेली चाळीस वर्षे सातत्याने कार्यरत आहेत. चाळीस वर्ष साहित्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात व देशभरामध्ये ते करीत असतात. साहित्यातील विविध विषय आपल्या लेखणीद्वारे परखडपणे हाताळणारे जयप्रकाश यांनी हे अनेक नामवंत साहित्यिकांमधून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.

जयप्रकाश यांना शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती, त्यांनी १९७४ मध्ये ठाण्यात कलासरगम या नाट्यसंस्थेत प्रवेश घेतला, अभिनयाचे धडे गिरविण्यास सुरुवात केली आताचे सुप्रसिद्ध नाट्य सिने दिग्दर्शक कुमार सोहोनी, विजय जोशी यांच्या सोबत अनेक नाटकात काम केली.

त्यामध्ये काका किशाचा,जाळ्यात गावलाय मासा आदी गाजलेल्या नाटकात काम केली, त्यानंतर १९७५ ते १९८० च्या काळात त्यांनी ‘माधुरी थिएटर्स’ नावाची स्वता:ची नाटक कंपनी स्थापन केली आणि लेखक दिग्दर्शक श्याम फडके, काका रणदिवे यांच्या सोबत बिन पैशांचा तमाशा, बाई बिगर भानगड नाही, पै पै आणि पै, बायको उडाली भुर ही नाटके रंगमंचावर आणली आणि ती त्याकाळी ती गाजली सुद्धा. १९८१ मध्ये जयप्रकाश यांनी चित्र प्रकाश ही फिल्म कंपनी स्थापन करून डोमकावला या चित्रपटाची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती

पण हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही आणि त्यांचे २२ लाख रुपये अक्षरशः डब्यात गेले आणि ते आर्थिक खड्यात गेले, पण त्यांनी आत्महत्या केली नाही, नैराश्यावर मात करून पुन्हा नव्या उमेदीने उभे राहिले. त्यानंतर त्यांनी ‘भानामती’ या चित्रपटाची निर्मिती केली, याचे दिग्दर्शन व मुख्य सरपंचाची भूमिका सुद्धा यात त्यांनी केली होती. यावेळेस मात्र हा चित्रपट पूर्ण होऊन व खूप गाजला, यात पैसे मिळून १९८१ झालेले आर्थिक नुकसान भरून निघाले.

आपल्याला चित्रपट निर्मिती का जमली नाही, आर्थिक फटका का बसला यावरती कुढत न बसता त्यांनी १९८१ ते २००० पर्यंत चित्रपट क्षेत्राचा अभ्यास करून, नवीन चित्रपट निर्मात्यांना आर्थिक फटका बसू नये,, ते खड्डयात जाऊ नये यावर मार्गदर्शन करण्यासाठी ’चित्रपट कसा काढावा’ या नावाने एक पुस्तक लिहिले, या पुस्तकाला त्यांचे मित्र सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांची प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकाला त्यांना राज्यपातळीवरचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघून त्याचा लाभ नवीन चित्रपट निर्मात्यांना झाला आहे.

चित्रपट कसा काढावा?, या सोबतच तऱ्हेवाईक नातेवाईक, विचित्र विश्व, विद्रोही जोतिबा, गोलघुमट-कोळीवाडा ते नौपाडा-एक प्रवास, साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक-लेखाजोखा असे अनेक विविध विषय त्यांनी आपल्या लेखणीद्वारे परखडपणे हाताळले आहे. यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या युगपुरुष-डॉ. बाबासाहेब आंबेडकर-शोध आणि बोध या प्रबंधाला तर राष्ट्रीय पातळीवरचा दिल्लीचा सर्वोच्च दलित साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा लाभला होता. त्यानंतर प्रकाशित झालेल्या बुध्दधम्माच्या वाटेवर या पुस्तकाने तर साहित्य वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली होती. या पुस्तकालाही त्यांना दिल्लीचा सर्वोच्च दलित साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. सर्वोच्च दलित साहित्य अकादमी पुरस्कार दोन वेळा लाभलेले ते साहित्य क्षेत्रातील एकमेव लेखक आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आत्मकथनपर त्यांनी लिहिलेल्या गोलघुमट-कोळीवाडा ते नौपाडा-एक प्रवास या पुस्तकाने तो काळ विशेष गाजवला होता. त्यामुळेच त्यांना सर्वत्र गोलघुमट या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यामुळे की काय त्यांनी काव्य क्षेत्रात गोलघुमट हे नाव धारण केले आहे. त्यापैकी त्यांचे गाजलेले कवितासंग्रह पानगळीची सळसळ, टवाळकी, खिल्ली, पोपटपंची आणि प्रेमासाठी वाट्टेल ते हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. या काव्यसंग्रहामधील त्यांच्या संविधान, गुलाम,वळवळणारे किडे,चोरावर मोर, चौकीदार, पुन्हा येईन, सोंगाड्या या कवितांनी तर महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला होता. डोंबिवली येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक सुद्धा त्यांनी लढवली होती. पण त्यांना अपयश आले होते. पण अपयशाने खचून न जाता त्यांचा साहित्य प्रवास आजही सुरू आहे. निवडणूकीच्या राजकारणात त्यांच्यावर पुणे येथे काही लोकांनी शाईफेक हल्ला सुद्धा केला होता. साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणूकीच्या राजकारणावर प्रकाशझोत टाकण्यासाठी त्यांनी साहित्य महामंडळाच्या राजकारणावरती बऱ्या वाईट घटनांवर एक पुस्तक लिहिले होते त्या पुस्तकाचे नाव होते साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक-लेखाजोखा. त्यामुळे की काय अध्यक्षपदाची निवडणूक पध्दती बंद होऊन नियुक्ती पद्धती सुरू झाली असे साहित्य वर्तुळात बोलले जाते. त्या वर्षापासूनच साहित्य महामंडळाने निवडणूक पध्दती बंद करून घटक संस्थांकडून नावे मागवून अध्यक्षपदाच्या नियुक्तीची प्रथा (वशिलेबाजीने) पुन्हा सुरू करण्यात आली. सध्या गद्य आणि पद्य असे दोन्ही विषय ते समर्थपणे हाताळत आहेत.

बुवाबाजी, लांडी लबाडी करणारे,भोंदू साधू, पुजारी तसेच अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या लोकांवर परखड भाष्य करणारे”बा”मन हे खळबळजनक पुस्तक लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या मराठी साहित्य मंडळ या सरकारमान्य प्रख्यात संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ते बिनविरोध निवडून आले आहेत. जयप्रकाश यांनी अभिनेते म्हणून होणार सून मी त्या घरची, वैरी मंगळसूत्राचा,महिमा काळभैरवाचा, आमदार माझ्या खिशात, भक्ती नागनाथाची, धाव रे विठ्ठला,एक डाव सत्तेचा आणि भानामती या चित्रपटात अभीनय केला आहे. आणि आता त्यांचा “चमेलीबाईचा खून कोणी केला?”हा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी घुमटकर क्लासेस, घुमटकर इंजिनिअरिंग कॉलेज आदी शिक्षण संस्थांमार्फत ५०,००० हजारांच्यावर विद्यार्थ्यांना शिकविले आहे. तसेच त्यांना आपल्या पायावर उभे राहणे शिकवून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास विविध अंगांनी सुद्धा केला आहे. तसेच त्यांचे कित्येक विद्यार्थी देशात आणि परदेशात उच्च स्थानावर कार्यरत आहेत.
जयप्रकाश यांना आत्तापर्यंत महाराष्ट्र जनमुद्रा पुरस्कार, ठाणे जिल्हा साहित्यरत्न पुरस्कार, साहित्यभूषण पुरस्कार, साहित्य साधना पुरस्कार, ठाणे महानगरपालिकेचा ठाणे गौरव पुरस्कार तसेच महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना आत्तापर्यंत लाभलेले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन या प्रख्यात संस्थेच्या महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांतर्फे त्यांना नुकताच महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला.

एक अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेल्या डॉ.जयप्रकाश घुमटकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4156 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..