नवीन लेखन...

आजचा आरोग्य विचार – भाग तेवीस

३१ धूमपान करणे हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे, हे फक्त आपली संस्कृती सांगते. अर्थात त्यात मद निर्माण करणारा तंबाखू नको, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि नीट लक्ष ठेवून वाचा. धुमपान असं लिहिलं आहे. धुम्रपान नाही. दैनंदिन धुमपान, प्रासंगिक धुमपान, चिकित्सास्वरूप धुमपान असे प्रकारही वर्णन केलेले आहेत. हे धुमपान प्रदूषण वाढवण्यासाठी नसून रोग कमी करण्यासाठी होते. […]

ज्ञानेश्वरांचें साहित्यिक रूप : एक विविधांगी चिंतन : भाग – १

ज्ञानेश्वर मोठे संत होते, तसेच ते मोठे दार्शनिक (तत्वज्ञानी) सुद्धा होते. आणि ( त्यांच्या रचना वाचून असें जाणवतें की) ते विविधरंगी साहित्यिकही होते. ज्ञानेश्वरांचा विचार करायचा तर त्यांचें तत्वज्ञान, अध्यात्म वगैरे पुढें येणें अपरिहार्य आहे . मात्र , या क्षेत्रातील प्रस्तुत माझें ज्ञान ‘शून्य के बराबर’ आहे. त्यामुळे अध्यात्म-तत्वज्ञान वगैरे विषयांवर सखोल चर्चा करायची धृष्टता मी करूं शकत नाहीं, कारण ( हिंदीत म्हणतात, त्याप्रमाणें ), ती ‘अनधिकार चेष्टा’ (प्रयत्न) होईल. आपली चर्चा मुख्यत: साहित्यिक अंगानें जाणार आहे . तिच्यात, अध्यात्म-तत्वज्ञान यांचें जें कांहीं विवरण येईल, त्यासाठी मी (अर्थातच) ज्ञानवंतांचा आधार घेललेला आहे. त्यात, जें कांहीं ज्ञान असेल, त्याचें ‘क्रेडिट्’ त्या-त्या ( नेम्ड् ऑर् अन्-नेम्ड् ) ज्ञानवंतांचें ; आणि रेफरन्स् च्या, अर्थाच्या, व इंटरप्रिटेएशनच्या ज्या कांहीं चुका असतील , त्यांची जबाबदारी माझी, हें सांगायला नकोच. […]

कठोर शिक्षा – भाग २

“ही मी त्याला दिलेली कठोर शिक्षा” रजनीने कथा संपवली. रजनीने कथा संपवली खरी, पण कथा संपली नाहीं ! “मी तुमच्या गप्पांत सामिल होऊं कां?” मागून एक आवाज आला. “ओ हो, तुम्ही यशवंत दळवी ? बाळूच्या लग्नाला आलांत ? ” अरविंदने ओळख दाखवली.”तुम्ही मफ्तीमध्ये आलात म्हणून आधी ओळखलं नाही. ” “हे नारायण प्रभू- सुविख्यात वकील आणि ह्या […]

आजचा आरोग्य विचार – भाग बावीस

२९. कर्णपूरण. म्हणजे कानात तेल घालणे. फक्त आणि फक्त भारतातच सांगितला जाणारा हा चिकित्सा स्वरूप आणि प्रिव्हेंटीव प्रकारचा एक उपचार. अन्य पॅथीमधे असे कर्णपूरण इन्फेक्शनच्या नावाखाली निषिध्द मानले आहे. त्याचे ‘रिट्रो इन्स्पेक्शन’ करण्याची तसदी पण कुणी घेत नाहीत. आमच्या पॅथीमधे नाही म्हणजे नाहीच, असा जो एककल्ली सूर काहीवेळा ऐकायला मिळतो, त्यांच्या कानानाकात तेल घालूनच ते लहानाचे […]

ज्येष्ठ संगीत संयोजक मास्टर केरसी लॉर्ड

आपल्या वाद्यांच्या परीसस्पर्शाने गाण्याचं सोनं करणारे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते ज्येष्ठ संगीत संयोजक मास्टर केरसी लॉर्ड यांच्या कलाकर्तृत्वाला दिलेला उजळा. […]

संगीतकार राम कदम

मराठी चित्रपट संगीत लोकप्रिय करण्यात ज्या मोजक्या संगीतकारांचे कर्तृत्व कारणीभूत ठरले त्यात राम कदम यांचे स्थान वरचे आहे. त्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. ‘पिंजरा’, ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘झुंज’, ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’, ‘पाहुणी’, ‘सुशिला’, ‘पारध’, ‘गड जेजुरी जेजुरी’ अशा कित्येक संगीतमय चित्रपटांची देणगी मराठीला मिळाली ती केवळ राम कदम यांच्यामुळे. त्यांच्या संगीतामुळे अनेक चित्रपट […]

मराठी गायक, संगीतकार, चित्रपटनिर्माता, दिग्दर्शक अवधूत गुप्ते

अवधूत गुप्ते यांची वेगळी अशी ओळख मराठी माणसाला करून द्यायची आवश्यकता नाही. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९७७ रोजी झाला. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ आणि ‘बाई बाई मनमोराचा’ या दोन गाण्यांच्या नादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर ‘सारेगपम’ या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते गाजले. त्यांची दाद द्यायची पद्धत, कौतुक करायची पद्धत काही वेगळीच होती. अंगावर काटा आला, […]

भारतातील पहिले लघुचित्रपट निर्माते हरीशचंद्र सखाराम भाटवाडेकर उर्फ सावे दादा

हरीशचंद्र सखाराम भटवडेकर यांना सावे दादा म्हणून ओळखले जायचे. त्यांचा जन्म १५ मार्च १८६८ रोजी झाला. दादासाहेब फाळके यांच्या पूर्वी हरीशचंद्र सखाराम भटवडेकर यांनी मुंबईत लघुपटांची निर्मिती करून भारतात चित्रपट सृष्टीला सुरवात केली होती. अजूनही सिनेमा सृष्टीत हरीशचंद्र सखाराम भाटवाडेकर यांचे नाव आदराने घेतले जाते. हरीशचंद्र सखाराम भाटवाडेकर हे खरे फोटोग्राफर. ल्यूमियर यांच्या भारतातील छायाचित्राच्या प्रदर्शनाने ते प्रभावित झाले, […]

ज्येष्ठ हिंदी अभिनेत्री नुतन

मिलन चित्रपटातलं सावन का महिना, सरस्वती चंद्र चित्रपटातलं चंदन सा बदन , कर्मा चित्रपटातलं दिल दिया है जान भी देंगे सुजाता मधलं जलते है जिस के लिये, बंदिनी मधलं मेरे साजन है उस पार आणि दिल ही तो है मधलं तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही ही नूतनजीची गाणी खूप गाजली. ही गाणी. व […]

1 2 3 4 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..