नवीन लेखन...

कठोर शिक्षा – भाग २

“ही मी त्याला दिलेली कठोर शिक्षा” रजनीने कथा संपवली.

रजनीने कथा संपवली खरी, पण कथा संपली नाहीं !

“मी तुमच्या गप्पांत सामिल होऊं कां?” मागून एक आवाज आला.
“ओ हो, तुम्ही यशवंत दळवी ? बाळूच्या लग्नाला आलांत ? ” अरविंदने ओळख दाखवली.”तुम्ही मफ्तीमध्ये आलात म्हणून आधी ओळखलं नाही. ”
“हे नारायण प्रभू- सुविख्यात वकील आणि ह्या सौ प्रभू ” अरविंदने ओळख करून दिली.
“प्रभू वकील तर प्रसिद्ध आहेतच. आज त्यांच्या सौ. ची ओळख झाली.” यशवंतने अभिवादन केलं. “थोड्या वेळापूर्वी सौ. प्रभूनी प्रतिपादन केलं, ते मी खरं धरूं की निव्वळ गप्पा? थापा ? ”
” हे खरं आहे, मिस्टर दळवी. अक्षरन् अक्षर खरं आहे” रजनीने बिनदिक्क्त कबूल केलं.
” कोर्टात कबूली द्याल, मिसेस प्रभू ?” य़शवंतने सवाल टाकला. “तुमच्या मदतीला खुद्द प्रभू वकील आणि साने वकील आहेत. तुमचं म्हणणं तुम्ही आत्ता मागे घेऊं शकतां. आज मी ड्यूटीवर नाहींये, पण तुमच्या बोलण्यावरून मी तुम्हांला अटक करूं शकतो.पण मी तसं करणार नाहीे. तुम्ही आपणहून उद्या पोलीस स्टेशनवर या. प्रभू वकील, तुम्हीही या. आपण या विषयावर बोलूंया”

य़शवंत दळवी दिसेनासा झाला.लग्नाला आलेली मंडळी पांगली.

“हे तू काय केलंस रजू ?” नानूने घरी आल्यावर रजनीला विचारलं. “पोलीसासमोर कबूली देण्याची काय गरज होती? एकदा केस पोलीसांच्या हातात गेली की मग खूप वर्षे रख़डते.”
“मी काय करूं? मला रहावलं नाहीं.” रजनीने उसासा टाकला.
“बरं. आपण उद्या काय करायचं ते ठरवूं. आज तूं नव्या साडीत खूप छान दिसत होतीस” नानूने विषय बदलला.
********

दुसरे दिवशी नानू आणि रजनी वडाळा पोलीस स्टेशनला हजर झाले. यशवंत दळवी वाट पहातच होता.
“या वकील साहेब. ” त्यांने स्वागत केलंं. “हवालदार सावंत, दोन कप चहा मागवा.” “आधी चहा मग चर्चा” य़शवंतने सुरुवात केली.
नानूने आणि रजनीने चहा पिऊन संपवला.

“हं. मग काय म्हणतां? मिसेस प्रभु, तुम्ही विनोद चव्हाण नांवाच्या इसमाला दारूमध्ये वीष घालून ठार मारलंत, होय नां?”
“होय.” रजनीने दबल्या आवाजांत उत्तर दिलं.
“मी म्हणतो, ‘नाहीं’ ” य़शवंतने ठांसून सांगितलं.नानूला आणि रजनीला आश्चर्याचा धक्काच बसला. “तुमच्या आधी कोणीतरी येऊन त्याच्या दारूत वीष घालून पाजून त्याला ठार केलं आहे असं आम्हाला आढळून आलं आहे”. यशवंतने खुलासा केला.
” मग आम्हाला इथे कां बोलावलंय?” नानूने विचारलं.
“तुमच्या मदतीने आम्हांला खरा खुनी शोधायचा आहे” यशवंत म्हणाला.
“ते कसं काय?” नानूने विचारलं.
“सांगतो”. यशवंतने सुरूवात केली.

“विनोदच्या खुनाची बातमी कळतांच आम्ही त्याच्या फोटो – स्टूडियोवर छापा घातला. संशयास्पद ठिकाणी काही फोटो सांपडले. सौ. प्रभूना कबूल केल्याप्रमाणे सर्व फोटो-नेगेटिव त्यांनी सौ. प्रभूना देण्याऐवजी कांही फोटो-नेगेटिव एका गुप्त ठिकाणि लपवून ठेवले होते, त्यात रजनी-चे फोटो मिळाले. ते ताडून पहाण्यासाठी मी बाळकृष्ण सानेच्या लग्नाला पाहुणा म्हणून आलो. माझी खात्री पटली की ते रजनीचेच आहेत. ते तुम्हांला परत करावे हा एक हेतू, आणि तुमच्या मदतीने खरा खुनी शोधायचा हा मुख्य हेतु”. यशवंतने भाषण संपवलं.

“या फोटोंचा खुनाशी काय संबंध?” नानूने विचारलं.
“या फोटोंचा रजनीशी संबंध आहे हे उघड आहे. पण रजनीने हा खून केला नसावा अशी आमची खात्री झाली आहे. खून करणारा माणूस काळा का गोरा, निर्ढावलेला किंवा प्रथमवीर हे आम्ही आमच्या तंत्राने आधीच ओळखतो. मयताच्या हातांत आत्महत्येची चिट्ठी (suicide note)सापडली आहे. ही त्याच्याच हस्ताक्षरात असल्याचा Handwriting Experts चा रिपोर्ट आहे. आत्ता मला सांगा, मिसेस प्रभू, ही नोट तुम्ही मयताच्या हातांत पेरून ठेवली होती कां? हो किंवा नाही, एव्हढंच सांगा” यशवंतने विचारलं.

“मला खरोखर या सुई साईड नोट बद्दल काहींच माहीत नाही ” रजनी म्हणाली.
“तेच मी म्हणतो. आत्ता आणखी एक प्रश्न” यशवंतने विचारलं.
” बोला. मी उत्तर द्यायला तयार आहे ” रजनी उत्तरली.
“विनोदला ठार करण्याच्या तुमच्या प्लॅन बद्दल तुम्ही कोणाशी वाच्यता केली होती? एखाद्या मैत्रीणीशी, सहचारिणीशी? स्पष्टच विचारतो, हे वीष तुम्ही कुठून आणि कसं मिळवलंत?”

— अनिल शर्मा

Avatar
About अनिल शर्मा 15 Articles
वास्तव्य – बेंगलूरू-कर्नाटक, वय एक्क्यांशी, शिक्षण मराठी भाषेतून झाले. सध्या वृद्धाश्रमात रहातो. एके काळी वकीलीचा व्यनसाय केला. आता स्वस्थ बसून संगणकावर काहीेतरी लिहीत आसतो.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..