नवीन लेखन...

अंगारकी आणि गणपती..

आज अंगारकी चतुर्थी. मंगळवारी येणाऱ्या ‘संकष्टी’ला अंगारकी म्हणतात कारण ‘अंगारक’ हे मंगळाचे नांव आहे. ‘अंगार’ म्हणजे आग..! अग्नीप्रमाणे तेजस्वी आणि दाहक असलेल्या मंगळाला म्हणूनच ‘अंगारक’ म्हणतात. मंगळ अग्नीप्रमाणे तांबडालाल दिसतो. इंग्रजीत मंगळाला Military Planet म्हणतात. ज्योतीषशास्त्रानुसार तो उग्र व विनाशक प्रवृत्तीचा पापग्रह मानला जातो, मग गणपती सारख्या शुभ देवतेचा मंगळासारख्या पापग्रहाशी आजच्या दिवशी येणारा संबंध येवढा […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग चार

आयुर्वेदीय चिकित्सा म्हणजे अॅलोपॅथीला पर्याय. असा जर कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आहे. पॅरासीटामोलच्या ऐवजी आयुर्वेदात काय आहे असे विचारणे म्हणजे मोहोरीच्या ऐवजी बेसन आहे का असे विचारल्यासारखे आहे. यांची तुलना कधीही करू नये. प्रत्येक पॅथीची स्वतःची अशी खास वैशिष्ट्य असतात. प्रत्येक शास्त्राचे स्वतःचे सिद्धांत असतात. त्यांचा योग्य तो आदर राखलाच पाहिजे. बीकाॅम झालेल्या विद्यार्थ्यांनी […]

जांभया येणे

कंटाळा आला, झोप येऊ लागली किंवा आजूबाजूच्या व्यक्ती जांभया देऊ लागल्या, की माणसाला जांभई येते. खोकला येणे, शिंकणे, उचकी लागणे, उलटी होणे या क्रियांप्रमाणेच जांभई येणे ही एक प्रतिक्षिप्त क्रिया (reflex action)आहे. जांभई येण्याच्या क्रियेमागे मज्जासंस्थेचे काही भाग कार्यान्वित होतात. मेंदूतील “बेसल गॉंग्लिया’ नावाच्या भागातील केंद्राच्या कार्याचा जांभई येण्याचा संभव असावा असे मानले जाते. जांभई घेताना […]

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गायक पं. विजय कोपरकर

विजय कोपरकर संगीतातील नावाजलेले व अवघ्या महाराष्ट्राला माहिती असलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९६२ रोजी झाला. वडील कीर्तनकार असल्यामुळे,विजय कोपरकर यांच्यावर लहानपणापासून गाण्याचे संस्कार झाले. वयाच्या आठव्या वर्षापासून गायनाला सुरुवात करून सुरवातीला मधुसूदन पटवर्धन त्यानंतर सुमारे पाच वर्षे डॉ. वसंतराव देशपांडे आणि मग पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे सात वर्षे त्यांनी गायनाचे शिक्षण घेतलं.विजय कोपरकर एका मुलाखतीत […]

किचन क्लिनीक – ताकाचे सामान्य व विशेष गुण

सर्व साधारणपणे ताक हे चवीला गोड,तुरट,आंबट,पचायलाहल्के, कफवातनाशक ,शरीर बल वाढविणारे,संडास घट्ट करणारे,भुक वाढविणारे व हृदयाला हितकर आहे. पण प्रत्येक पशूच्या दुधापासून बनविलेल्या ताकाचे गुणधर्म हे वेगळे असतात त्यामुळे काही जनावरांच्या दुधापासून तयार केलेल्या ताकाचे गुणधर्म आता आपण पाहूया: १)गाईचे ताक: भुक वाढविणारे,बुद्धिवर्धक,मुळव्याधीत गुणकारी,त्रिदोषनाशक आहे. २)म्हशीचे ताक: दाट,कफकर,सूज उत्पन्न करणारे किंवा असल्यास वाढविते,पचायला जड आहे. ३)शेळीचे ताक: […]

कर्तव्यदक्ष राजा

फार पूर्वी रशियात घडलेली ही एक गोष्ट आहे. त्या वेळी रशियावर निकोलस नावाचा राजा राज्य करीत होता. आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी त्याने ठिकठिकाणी सैनिक तैनात केले होते. अशाच एका अतिशय दुर्गम भागातील एका छावणीत एक सैनिक पहारा देत बसला होता. परंतु तो केवळ नावालाच पहारा द्यायला बसला होता. असे म्हणावे लागेल कारण त्याचे अजिबात लक्ष नव्हते. […]

इमानी सेवक

प्राचीन काळतील एका राजाच्या पदरी असलेल्या एका इमानी सेवकाची ही कथा आहेएका रुजाच्या राजवाड्यात एकसेवक होता. त्याचे वडीलही राजाच्या वडिलांच्या चाकरीत होते. मात्र सेवकाच्या वडिलांनी त्या सेवकाला बजावून ठेवले होते की, राजवाड्यात नोकरी करीत असताना अनेक प्रलोभने येतात, मात्र तू कोणत्याही मोहाला बीपडू नकोस. कोणतेही काम इमानदारीने कर, त्यातच तुझे हित आहे. त्याप्रमाणे तो सेवक आपले […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग तीन

आयुर्वेद समजून घेताना विशाल आयुर्वेद समजून घ्यायला, वृत्तीचा दिलदारपणा, चातकाची तहान, मनाचे मोठेपण, देवावर श्रद्धा, गुरूंवर विश्वास, भिकाऱ्याजवळचा निर्लज्जपणा आणि भावना टिपणारे तरूणीचे ह्रदय हवे. हे गुण नसल्यास ते आत्मसात करावे लागतील.तरच आयुर्वेद म्हणजे काय ते समजायला लागेल. कायद्यावर बोट ठेवून आणि महाविद्यालयात शिकून तीन तासात पेपर लिहून, पाच वर्षानी हातात उत्तीर्ण असे प्रशस्तीपत्र मिळाले तरी, […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग दोन

आयुषोवेदः आयुर्वेदः आयु विषयी ज्यात सर्व ज्ञान मिळते ते शास्त्र. आयुर्वेद म्हणजे जीवन जगण्याचे शास्त्र. याचाच अर्थ मृत्युविषयीचे संपूर्ण ज्ञान. आपापल्या कर्मफलानुसार, त्याने नेमून दिलेले ( नियत) आयुष्य जगता यावे, या वेळेअगोदर मृत्यु येऊ नये, यासाठी कोणते नियम आहेत, ते जाणून घेण्यासाठी आयुर्वेद शिकावा. जगण्यातले हे अडथळे दूर करण्यासाठी हे अडथळे ओळखता येणे महत्वाचे. यातील सर्वात […]

कोलेस्टेरॉल

चरबी वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे आणि त्यातून उद्भवू शकणारा हृदयविकार- हा संबंध सर्वानाच माहिती असतो. परंतु कोलेस्टेरॉल वाढणे केवळ आहाराशीच संबंधित नाही. कोलेस्टेरॉल शरीरात नेमके काय करते, चांगले आणि वाईट कोलेस्टेरॉलचे कोडे काय आहे आणि वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मानसिक स्वास्थ्य, संतुलित आहार व व्यायाम ही त्रीसूत्रीच कशी उपयोगी ठरते. आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांमधूनच कोलेस्टेरॉलची निर्मिती होते. […]

1 282 283 284 285 286 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..