ग्वाल्हेर घराण्याचे गायक नारायणराव व्यास
नारायणराव व्यास हे पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य होते. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९०२ रोजी कोल्हापूर येथे झाला. ते ख्याल, भजन व ठुमरी गायनासाठी ते विशेष प्रसिद्ध होते. मा. नारायणराव व्यास यांचा जन्म संगीत उपासकांच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील, काका हे कोल्हापुरात संगीत क्षेत्रात नाव कमावून होते. विख्यात संगीतकार व गायक शंकरराव व्यास हे नारायणरावांचे वडील बंधू होत. […]
