नवीन लेखन...

मेरू आणि टॅब कॅबला मराठी समजत नाही

मेरू आणि टॅब कॅबला मराठी समजत नाही..मराठीचा निवडणूकीय पुळका येणारे राजकीय पक्ष काय करतायत? मी आता काही वेळापूर्वी ‘मेरू’ आणि ‘टॅब कॅब’ या टॅक्सीं कंपन्यांना अंधेरीवरून दहीसर येथे जाण्यासाठी टॅक्सी हवी म्हणून फोन केला..दोन्ही कंपन्यांनी आम्हाला मराठी समजत नाही आणि म्हणून तुम्ही हिन्दी किंवा इंग्रजीत बोला असा विनंतीवजा आदेश दिला..भयंकर अपमानीत वाटलं मला..मी अशा मुजोर टॅक्सीन् […]

स्वातंत्र्यदिन-गीत – (२) : सुंबरान मांडलं ऽ

स्वातंत्र्याच्या वाढदिवशीं सुंबरान मांडलं ऽ आजपुरतं आनंदाला आवतान धाडलं ऽ ।। रोज-रोज रडन्याचा कट्टाळा आला रं येका दिवसापुरतं दु:ख खोलखोल गाडलं ऽ ।। आयतं मिळालं म्हनुन, किंमत न्हाई रं त्याची ठाऊक हाये कां रं, रगत किती सांडलं ऽ ? धर्माच्या कुर्‍हाडीनं आईचं तुकडं कां ? सांग की रं, कशासाठी भाऊ-भाऊ भांडलं ऽ ? जातपात अन् जमात, […]

स्वातंत्र्यदिन-गीत – (१) : पुढे काय ?

स्वातंत्र्य मिळालें, पुढें काय ? चालेल पुढें हें मढें काय ? स्वातंत्र्यासाठी फुकटच लाखों पडले अम्हि-तुम्हि घेतले धडे काय ? सत्तर वर्षें स्वातंत्र्याला होतिल रे गाजण्यांयोग्य पण घडे काय ? सांडलें रक्त हें खरेंच आहे, परी अविरत त्याचे चौघडे काय ! राज्यावर शिवबांच्या बाजिराव-दुसरा ! मग राज्य बुडालें, अडे काय ? जो खाली, तो तर खाली-खाली […]

आहाररहस्य ६

आहाराचा विचार कोणत्या कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो हे आपण पहात होतो. या सूत्रातील पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, सात्म्यता. म्हणजे बाकी दुनिया गयी भाड मे, मला काय पचणारे आणि माझ्यासाठी अमुक पदार्थ चालण्णार आहे की नाही. हे ठरवणे. एखाद्याला पंधरा दिवस सलग पुरणपोळ्या खाल्या तरी पचतात, एखाद्याला पन्नास जिलब्या पण पचतात. पण तोच नियम सर्वांना लागू होईल […]

‘शब्दनाद’ – पगार, वेतन, Salary..

सर्वांच्या जिव्हाळ्याचा शब्द. अगदी ठार अडाण्यालाही या शब्दाचा अर्थ पटकन समजतो. महिन्याचे १ ते १० असे दहा दिवस पगाराचे असतात. मी जी माहिती आपल्याला देणार आहे ती आपल्यास नसल्याने आपले काहीच बिघडणार नाही मात्र माहित असल्याने ‘पगार’ घेताना (पगार नाही) मजा मात्र दुप्पट वाढेल..! मित्रांनो हा कोणत्याही भाषिकाला अगदी आपला वाटणारा शब्द मुळात ‘पोर्तुगीज़’ आहे हे […]

मुंबईतील पुतळे – हलवलेले आणि हरवलेले – ‘लॉर्ड कॉर्नवॉलीस’

‘हलवलेल्या व हरवलेल्या पुतळ्यां’च्या तिसर्‍या भागात ‘लॉर्ड कॉर्नवॉलीस’ या भारताच्या तत्कालीन गव्हर्नर जनरलच्या पुतळ्याची माहिती आहे..हा ‘पुतळा’ त्याच्या नांवा-ठिकाणासकट लोकांच्या विस्मृतीत गेला आहे.. तरी या पुतळ्यांने जी धमाल त्या काळी उडवली होती त्यातून हिन्दू समाजाच्या मानसिकतेचं चांगलंच दर्शन होतं.. त्याची माहिती मी पुढच्या चौथ्या व शेवटच्या भागात देणार आहे. आपल्या एशियाटीक सोसायटीच्या समोर असलेलं ‘हॉर्निमन सर्कल’ […]

आशा आणि अपेक्षा..

आशा आणि अपेक्षा या दोन जुळ्या बहिणी…. जिथे जिथे आशा असेल तिथे तिथे अपेक्षा भेटणारच… मनुष्यप्राणी आशेवरच जगतो… आणि सतत कसलीतरी अपेक्षा करतोच करतो.. माणुसच कशाला.. अगदी कोणताही प्राणी तेच करतो.. आपण कोणाकडूनतरी कसलीतरी अपेक्षा करतो.. आपल्याला आशा असते की आपली ती अपेक्षा पूर्ण होईल.. कधीकधी आशा आणि अपेक्षा अगदी १०० टक्के पावतात आणि सहजगत्या प्राप्त […]

मन तन बंधन

चंचल मन हे चंचल धारा,  पंख पसरीत उडे भरारा  । झेप घेवूनी उलटी सुलटी,  लक्ष तयाचे चमकत तारा  ।। लुकलुकणारे तारे अगणित,  नभांग सारे प्रसन्न चित्त  । ताऱ्यावरूनी ताऱ्यावरती,  झोके घेते सहज अविरत  ।। वेळ क्षणाचा पुरतो त्याला,  टिचक्या टपल्या मारीत गेले  । आवर घालणे कठीण होता, चटकन निसटून हातून गेले  ।। कोठून येते त्याला शक्ती, […]

अदृश्यशक्ती

एक अनामिक अदृष्यशक्ती  ! ………. त्याला काही लोक नशीब……. असेही म्हणतात…… बघा काय म्हणणार या गोष्टींना…. गुहागर मुंबई एसटी बस एका ढाब्यावरून जेवण करून निघणार होती. प्रचंड पाऊस पडत होता आणि दोन प्रवासी न चढल्यामुळे कंडक्टर छत्री घेऊन त्यांना शोधायला उतरला होता. केवळ दोघांमुळे संपूर्ण बस निघू शकत नसल्याचे पाहून बाकीचे प्रवासी वैतागलेले होते. “ओ मास्तर चला जाऊद्या, राहूदे त्यांना पावसातच […]

अमेरिकेत येणारी मराठी मंडळी

नुकताच घडलेला हा किस्सा आहे. अमेरिकेतून परत येताना मला सेओलच्या विमानतळावर एक मराठी गृहस्थ भेटले. त्यांनी आपणहून माझी ओळख करून घेतली. चांगले ‘कोकणस्थ ब्राह्मण’ होते. सहा महीने अमेरिकेतील मुलीकडे राहून परत निघाले होते. ते कोणत्यातरी खासगी बँकेत नोकरीला होते व ती बँक आर्थिक संकटात सापडल्यामूळे त्या बँकेचे एका सार्वजनीक बँकेत विलिनीकरण झाले होते. त्यांच्या पत्नीचा टि. […]

1 5 6 7 8 9 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..