नवीन लेखन...

चांदण्यातील आठवणी

हवाच मजला तोच चंद्रमा तेच नभी चांदणें गतकाळाच्या आठवणी शिकवती आनंदातील जगणें   ।।धृ।।   आजीसंगे गच्चीवरती फुलराण्यांच्या कथा ऐकती बसुनी सारे एक वर्तुळी, टाळ्या पिटूनी गाती गाणें    ।।१।। गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें   फुलले होते यौवन सारे अंगी झोंबे शितल वारे पुनव चांदणे धुंदी आणी, बघूनी तारांगणे   ।।२।। गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें   सगे […]

२५ जुलै – आजचे दिनविशेष

२५ जुलै १६२९ : राष्ट्रमाता जिजाबाई यांचे वडील लखुजीराव जाधव यांचा मृत्यू. २५ जुलै १६४८ : विजापूर बादशाहाच्या आज्ञेने मुस्तफाखानाने जिंजी नजीक शहाजीराजांना कैद केले. शहाजीराजांवर वजीर मुस्तफाखानाचा विश्वासघातकी छापा पडला. आपल्यावर काही तरी घातकी संकट येणार आहे , आणि ते वजीराकडूनच येणार आहे हे आधी समजलेले असूनसुद्धा शहाजीराजे गाफील राहिले. झोपले. आणि वजीर मुस्तफाने त्यांना कैद केले. […]

देखल्या देवाला दंडवत

एका गावात एक कुंभार राहात होता. तो अतिशय सुबक मूर्ती बनवायचा. त्यामुळे दूरच्या गावांहूनही त्याच्याकडे बरीच गिर्‍हाईके येत असत. गणेशोत्सव जवळ आला होता. त्यामुळे कुंभाराकडे गणपतीच्या मूर्तीसाठी बरीच मागणी होती. एकेक मूर्ती तयार करून तो गिर्‍हाईकांकडे घेऊन जात असे. कुंभाराने गणेशाची एक अशीच मोठी सुबक मूर्ती बनविली व आपल्या गाढवावर लादून तो ज्याने ऑर्डर दिली त्याच्या […]

ज्याचे अन्न त्याला द्या !

संत गाडगेबाबा खानदेशात फिरत होते अंगावर फाटके-तुटके कपडे, दाढीचे खुंट वाढलेले, डोक्यावर मडके, एका कानात कवडी व हातात एक खापराची येळणी असा अवतार होता त्यांचा. सकाळीच ते एका गावात गेले. गावातील मुख्य मैदान त्यांनी झाडून स्वच्छ केले. तेवढ्यात गाडगेबाबा गावात आल्याची वार्ता हा हा म्हणता सर्व गावभर झाली. गावातील माणसे तिथे जमू लागली. गाडगेबाबांनी सर्व माणसांना […]

भली खोड जिरली

शाळेजवळच्या एका कोपर्‍यावर विक्रेत्यांची गर्दी असे. त्यात लहान मुलांना मधल्या सुटीत खाता येतील, अशा गोष्टी विकणारे बरेच असत. त्यात एकविक्रेता रोज चणे-फुटाणे व इतर काही पदार्थ घेऊन बसत असे. मधल्या सुटीत शाळेतील मुले आली की त्यांना तो पैसे घेऊन चणे-फुटाणे देत असे. मात्र हा विक्रेता लबाड होता. मुलांच्या निरागसतेचा फायदा घेऊन तो त्याच्याजवळच्या छोट्या मापाने चणे-फुटाणे […]

चाकोरी

नव्हतो आम्ही आमचे कधींही   बनले जीवन दुजामुळे  । कर्तेपणाचा भाव तरीही      येतो कां मनी ? ते न कळे  ।। कसा आलो या जगतीं    ठाऊक नव्हते कांही मजला  । कसा वाढलो हलके हलके     जाण आहे याची मला  ।। जेंव्हा झालो मोठा कुणीतरी   वाटू लागले कांही करावे  । काळाने परि दिले दाखवूनी   जीवन प्रवाही वाहात जावे  ।। परिस्थितीच्या […]

श्रीकृष्णाचे जीवन

जीवन होते कृष्णाचे आगळे    विविधतेनें भरलेले सगळे, गूढ, घनदाट जंगलापरी    सारे पैलू साकार करी ।।१।। जंगलामध्यें झाडे वाढती    छोटी छोटी झुडुपे उगवती, पसरे सर्वत्र वेलींच्या जाळी   जल सांचूनी बनली तळी ।।२।। गोड, आंबट, तुरट फळे    सुंगधी तशीच उग्र फुले, राघू, मैना, ससे, हरणे    तसेंच हिंस्र पशूंचे फिरणे ।।३।। जंगल दिसते भरलेले पूर्ण    बरे वाईट यांचे चूर्ण, […]

नाभी केंद्रांत आत्मा

आत्मा कोठे असतो, नाभी केंद्रात शोधाल का ? तो तर दिसत नसतो, मग त्यास जाणाल का ?….१, सर्व इंद्रिये वापरली, परि न झाला बोध, कोठे लपला आहे, न लागे कुणा शोध….२, विचार आणि भावना, संबंध त्याचा ज्ञानाशी मेंदूत आहे इंद्रिय, संपर्क त्यांचा सर्वांशी….३, मेंदूवरी ताबा असे, नाभीतील मध्य बिंदूचा समजून घ्या सारे, तेथेच आत्मा देहाचा…४, मातेचे […]

देवगडातल्या ‘गिर्ये’ गांवचं ‘श्री देव रामेश्वर मंदिर’

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील ‘गिर्ये’ हे एक दक्षिण कोकणातील कोणत्याही गावाप्रमाणे एक निसर्गसंपन्न गाव. सुप्रसिद्ध ‘विजयदुर्ग’ किल्ला याच ‘गिर्ये’ गावात वसला आहे व त्याचे आदिलशाही अम्मलातले नाव ‘घेरिया’ हा ‘गिर्ये’चाच अपभ्रंश आहे ( ‘गिर्ये’च घेरिया झालं की ‘घेरिया’चं गिर्ये यात नेहेमीप्रमाणे तज्ञांत मतभेद आहेत. आपला तो विषय नाही.). आता इतक्या वर्षानंतर ‘विजयदुर्ग’ हे वेगळे महसुली गाव […]

1 3 4 5 6 7 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..