नवीन लेखन...

विश्वासातील खोडसाळपणा ?

आमच्या शेजारी वयोवृद्ध ताराबाई, ज्याना आम्ही मावशी म्हणत असू,रहात होत्या. निवृत्त शिक्षिका, वय ९८ पूर्ण. जीवनाचे शतक पूर्ण करण्याचा आत्मविश्वास. ह्या वयांत देखिल आनंदी व समाधानी राहण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असे. स्मरणशक्तीपण त्याना साथ देत होती. वर्तमानपत्रातील फक्त ठळक हेडलाईन्स त्या वाचीत असे. मी अनेक वर्षे पूजाअर्चा व ध्यानधरणा ह्या दैनदिन विधी करीत असतो. ईश्वरी साक्षात्कार […]

तू

र्‍पियकाराला र्‍पेयसी मेटलयावर काय वाटत ते वरणन केले आहे.
[…]

गुळवेल एक नैसर्गिक अमृतकुंभ…!!!

” गुडूची कटुका तिक्ता स्वादुपाका रसायनी |

संग्रहिणी कषायोष्णा लध्वी बल्याग्नि दीपनी ||

दोषज्यामतृडदाहमेहकासाश्च पाण्डूताम |

कामला कुष्ठवातास्रज्वरकृमीवमीर्हरेत ||”

-(भाव प्रकाश )

गुळवेल ह्या वनस्पतीला भारतीय उपचार पद्धती तथा आयुर्वेदात फार महत्व आहे. आयुर्वेदात गुळवेलाला अमृता हे नाव दिले आहे. नावाप्रमाणेच ही वनस्पती अमर आहे,जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली तरीही ही वनस्पती सहजतेने जीवंत असते.

रासायनिक घटक- ग्लुकोसीन, जीलोईन, १.२ टक्के स्टार्च, बर्वेरीन, ग्लुकोसाईड, गिलोइमिन, कैसमेंथीन, पामारीन, रीनात्पेरीन, टीनास्पोरिक, उडनशील तेल, वसा, अल्कोहोल, ग्लीस्टोराल इत्यादी घटक आढळतात.

एवढे महत्वपूर्ण घटक असलेल्या या वनस्पतीमध्ये ‘मायक्रोबैक्टेरीयम ट्युबरकुलौसिस’ (Tuber Culosis), ‘एस्केनीशिया कोलाई’ या आतडे आणि मूत्रसंस्थेवर परिणाम करणाऱ्या रोगाणु ला नष्ट करते, तसेच विषाणू समुह व कृमी आदी नष्ट करण्याची क्षमता या दिव्या वनस्पतीमध्ये आहे. […]

संधी आहेच, तर प्रहार मुळावर करावा !

अण्णांना सध्या देशभरातून मिळणारा पाठिंबा पाहता हे सरकार अण्णांचे आंदोलन चिरडून टाकण्यात यशस्वी होईल असे वाटत नाही. सरकारला माघार घ्यावीच लागेल. 1857 च्या उठावानंतर ब्रिटिश सरकारने भारतीय आंदोलकांना काबूत ठेवण्यासाठी जे कायदे तयार केले त्याच कायद्यांचा हे सरकार आपल्याच लोकांविरुद्ध वापर करीत आहेत; परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. लोकांचा आवाज असा दाबता येणार नाही. त्यामुळे सरकारला तडजोड करावीच लागेल; परंतु ही तडजोड स्वीकारताना अण्णांनी व्यवस्था परिवर्तनाच्या चक्राला गती देण्याचे काम करावे. व्यवस्थेत बदल झाला आणि तोही आमुलाग्र झाला तर ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई जिंकली, असे म्हणता येईल!
[…]

मुक-बधिर शाळा, अलिबाग

कुठलीही सुंदर गोष्ट हृदयात साठवून तिचा अनुभव घेण्यासाठी ऐकण्याच्या शक्तीची खुप गरज असते. नुसतं पावसात भिजणं, आणि त्या पावसाचा आणि कडाडणार्‍या विजांचा आवाज शांतपणे ऐकत भिजणं यात खूप फरक असतो. आईची पाठीवर प्रेमाची थाप पडली तर आपल्याला बरं वाटतच, परंतु जोडीला तिचे प्रेमाने ओथंबलेले शब्द कानांवर पडले तर आपला आनंद अजून द्विगुणीत होतो. […]

लोकशाहीत सरकार निरंकुश कशी काय राहू शकते ?

लोकशाहीत कोणतीही सरकार निरंकुश असूच शकत नाही.लोकशाहीत जनता सर्व शक्तिमान असून सत्ताधारी जनतेचे नोकर आहेत. जो विनावेतन व आपल्या घरावर तुळसीपत्र ठेवून जनसेवा करत असेल, त्यालाच जनतेचा नेता म्हणता येऊ शकते ! अन्यथा सर्व नोकर आहेत. संसदेला विशेषाधिकार असले तरी जनतेपेक्षा जास्त नाहीत, हे कसे विसरता येईल ? सत्तेच्या नशेत काहीही वक्तव्य करणे कायदेशीर आहे काय ? सत्ताधाऱ्यांनी जेव्हा-जेव्हा निरंकुश बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा-तेव्हा जनतेने त्यांना सत्तेवरून खाली खेचले, हा इतिहास सांगण्याची गरज नाही.
[…]

वाचवा रें वाचवा ….!!!!! या आण्णा पासुन…… भारत सरकारचा टाहो.

राळेगणसिद्धीचे समाजसेवक अण्णा हजारे आतां सगळ्या देशाचे गांधीवादी युगपुरुष झाले आहेत . ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत आणि त्यांचा लढा आता सगळ्या देशाचा झालाआहे.
[…]

एक मुलगी

एक मुलगी

एक मुलगी चालते आहे आपला रस्ता

खोल शांतशा डोहातील ती तरंग नुक्ता

जंतर मंतर जादू तंतर नाही तिला ठाव

तिचे तिला ठावूक आहे आपले कुठले गाव

होऊन अधीर वाऱ्यासोबत ती भांडत बसते

आपले खेळ ती ताऱ्यासोबत मांडत असते
[…]

प्रथम ट्रस्ट, अलिबाग

अलिबागमधील प्रथम ट्रस्टने अशाच काही अभ्यासात मागे पडलेल्या मुलांना केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रथम आणण्याचा जणु विडाच उचलला आहे. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांमधील अनेक पैलु हेरुन, त्यांच्यामधील जिद्दीला व आत्मविश्वासाला नवसंजीवनी देण्याचे महान कार्य ‘प्रथम’ अनेक वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये करत आहे. […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..