नवीन लेखन...

कुणाच्या खांद्यावर, कोणाचे ओझे?

आज प्रत्येकालाच आपल्या घरात सगळ्या सुखसोयी अशाव्यात असे वाटत असते आणि ते योग्यच आहे परंतू आर्थिक ओढाताण करून सगळ्या गोष्टी विकत घेणे कितपत योग्य आहे? अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि आवड आहे. काहींना कर्ज काढून वस्तू विकत घेतल्या की काहीतरी विशेष केल्यासारखे वाटते आणि पैश्याची बचत केल्याचा आनंद होतो. असो. एका बाबांची कैफियत मांडण्याचा छोटासा प्रयत्न !
[…]

रामकृष्ण मिशन सेवा समिती, अलिबाग

समाजकार्य करताना आपण जे काम करतो आहे, व ज्यांच्यासाठी करत आहे त्यांच्याविषयी मनात प्रेम, आत्मीयता व स्थिरता हवी. निश्चलपणे व आजुबाजुला असलेल्या अडथळयांची तमा न बाळगता इतरांसाठी झटणारे समाजसेवक त्यांना पदच्युत करण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तींना अजिबात घाबरत नाहीत. त्यासाठी लागणारे असामान्य धैर्य, स्वतःच्या तत्वांवर असलेला प्रचंड आत्मविश्वास, इतरांसाठी काहीतरी भव्य-दिव्य करण्यासाठी लागणारी जिद्द व अखंड सेवाभाग या सर्व गोष्टी अंगी बाणवण्यासाठी मनात शुध्दता व शरीरात बळ हवं असतं. जरी सर्व धार्मिक संघटना समाजातील तळागाळातील लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी झटतीलच असं नाही, परंतु आध्यात्मिक व धार्मिक प्रवचनांमुळे व सत्संगामुळे आपल्याला मनाला स्थैर्य मिळत, चंचलता कमी होते, आपल्या पुढचा मार्ग अगदी धुतलेल्या काचेसारखा चकचकीत दिसायला लागतो, जीवनाच्या निराशावादी, काळोख्या कप्प्यांमध्ये सुध्दा आशेचे काजवे चमचमायला लागतात, मनाला नवी उमेद व उभारी येते, इतरांची सेवा करताना कधीतरी डोकावणारे स्वार्थी व आत्मकेंद्रीत विचारसुध्दा बंद होतात, व प्रसिध्दीच्या आर्कषणापासून मनुष्य हळुहळू लांब होत जातो. […]

श्रद्धा, संपत्ती आणि आपत्ती

पद्मनाभस्वामी मंदिरातील अमाप संपत्तीचे काय करावे, असा प्रश्न सरकारला पडला आहे. मूळात मंदिराच्या संपत्तीचे विश्वस्त मंडळ नीट जतन करू शकत नाही, त्यामुळे सरकारने या मंदिराचा कारभार ताब्यात घ्यावा, या जनहित याचिकेनंतरच सर्वोच्च न्यायालयाने मंदिराच्या तळघरातील दालने उघडण्याचा आदेश दिला होता. आता सरकारच्या हाती हे घबाड लागलेच आहे तर अशा इतर अनेक घबाडांचा शोध घेऊन सरकारने आपल्या देशाचे दारिद्र्य काही प्रमाणात तरी दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा.
[…]

माणसाला प्रेरणा अधिक सुंदर जगण्याची …

थोरो म्हणतो त्याप्रमाणे तत्त्वज्ञानी होणे म्हणजे सूक्ष्म विचार जवळ असणे नव्हे किंवा एखादा पंथ किंवा संप्रदाय स्थापणे नव्हे! तर ज्ञानावर अपार प्रेम करणे व तद्‌नुरूप वागणे. साधे, स्वतंत्र उदार श्रद्धेचे जीवन जगणे होय. बेकन म्हणतो, प्रथम मनाच्या मंगल गोष्टी शोधा. त्या मिळवल्या म्हणजे उरलेसुरले आपोआपच मिळेल किंवा ते मिळाले नाही तरी त्याची खंत राहणार नाही. सत्य आपणास श्रीमंत करणार नाही; परंतु मुक्त मात्र करील. परंतु, कवी किट्‌सचे म्हणणे मात्र वेगळे आहे. सौंदर्यच सत्य आणि सत्यच सुंदर आहे. जीवनाचे रहस्यमय सौंदर्य नष्ट करण्याचे काम तत्त्वज्ञान करते. जीवनात सौंदर्य कशात आहे, तर त्याच्या रहस्यमयतेत आहे. म्हणून तर रामायण, महाभारत, होमरचे इलियड यांतील सौंदर्य कमी झाले नाही. शेक्‍सपियरने तर सर्व जगाला कवेत घेतले. पलीकडल्या झाडीत जो पक्ष्यांचा जीवनोत्सव चालला आहे, त्यात मला भाग घेता येत नाही, म्हणून मी कितीतरी वेळा अस्वस्थ झालो आहे. याला सुखवाद म्हणावे, कष्टवाद
[…]

नात यशस्वी होण्यासाठी

स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.
[…]

अनुत्तरीत राहिलेला प्रश्न, स्त्री अबला का सबला?

आज जगातील बहुतेक राष्ट्रात समाजिक स्थरावर व कायद्याने स्त्रीला बऱ्याच बाबतीती पुर्षांच्या बरोबरीचे स्थान दिले आहे. परंतू देशातील व जगातील स्त्रियांवरील अत्याचार होताना प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मीडियातून वाचले आणि बघितले की वाटते, कुठल्याही गोष्टी कायदे केल्याने किंवा त्याची कठोर अंमलबजावणी केल्याने उद्देश साध्य होतातच असे नाही. त्यासाठी स्त्रीच्या प्रती पुरुषातील पुरुषी अहंकार जावा लागतो, मानसिकता सकारात्मक असावी लागते. “स्त्रीही क्षणाची पत्नी व अनंत काळाची माता आहे” हे कालातीत सत्य लक्षात ठेऊन ते कृतीत आणले तरच आज स्त्रियांवर सर्वत्र होणारे अत्याचार थांबतील आणि समाजात ती सन्मानाने व ताठ मानेने जगायला शिकेल. स्त्रीने जर का चंडिकेचे रौद्र रुप धारण केले तर ती कुठलेही संकट सहज परतवू शकते. अशी कित्येक उदाहरण आपण पाहतो पण…….
[…]

सोहळा सोलडान्सचा

नृत्य ही दैवी देणगी असून तिच्यात केवळ मनुष्यप्राण्यालाच नाही तर सजीव सृष्टीलाही आनंदित करण्याची ताकद आहे
[…]

1 3 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..