नवीन लेखन...

मेकॉले कालबाह्य झाला





जग झपाट्याने बदलत आहे. या स्थित्यंतराचा वेग अतिप्रचंड आहे. आपले अस्तित्व टिकवून प्रगती साधायची असेल तर या वेगाशी आपल्याला जुळवून घेणे भाग आहे. जंबो जेटच्या युगात बैलगाडीने प्रवास करणे निव्वळ मूर्खपणा ठरणार आहे. या वेगाशी जुळवून घ्यायचे असेल तर आपल्याला बदलावे लागेल आणि हा बदल केवळ राहणीमानात करून चालणार नाही. आपली वैचारिक बैठकच आपल्याला बदलावी लागणार आहे आणि त्यात शिक्षणाची, शिक्षणपद्धतीची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. शिक्षण हे नेहमी कालानुरूपच असायला हवे आणि त्यात पुस्तकी पांडित्यापेक्षा व्यावहारिक ज्ञानावर अधिक भर असायला हवा. पूर्वी म्हणजे परकीयांचे भारतावर आक्रमण होण्यापूर्वी इथली शिक्षणपद्धती त्या अर्थाने अगदी रुळावर होती. गुरुकुलात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला सगळ््याच विषयांचे प्राथमिक आणि त्याच्या आवडीनुसार काही विषयांचे खास शिक्षण दिल्या जायचे. कालानुरूप विषयांमध्ये, त्यांच्या स्वरूपामध्ये, शिकविण्याच्या पद्धतीत बदल होत असे. ती एक आदर्श शिक्षणपद्धती होती. अर्थात पुढे या पद्धतीतही अनेक दोष शिरले हा भाग अलाहिदा; परंतु गुरुकुलातले शिक्षण अधिक वास्तववादी आणि व्यावहारिक होते एवढे निश्चित. ब्रिटिशांनी भारतात पाय ठेवल्यावर या देशाचे सार्वत्रिक खच्चीकरण सुरू केले. पारंपरिक कारागिरी नष्ट झाली. अनेक व्यवसाय मोडीत निघाले. भारत ही ब्रिटिशांची वसाहत होती आणि वसाहतीतील लोकांना केवळ कष्ट करण्याचा, गुलामी करण्याचा अधिकार असतो. त्यांना आर्थिक किंवा इतर कुठलेही स्वातंत्र्य नसते. भारतासारख्या खंडप्राय देशाला गुलामीत ठेवायचे तर निव्वळ लष्करी किंवा पोलिस बळावर विसंबून राहता यायचे नाही हे चाणाक्ष ब्रिटिशांनी लवकरच ताडले. इथल्याच लोकांचा बुद्धिभेद करून त्यांना आपल्या बाजूने उभे करण्याशिवाय ब्रिटिशांना पर्याय नव्
ता. या देशावर हुकूमत गाजविण्यासाठी लागणारे मनुष्यबळ त्यांना ब्रिटनमधून उपलब्ध होणार नव्हतेच, इथल्याच मनुष्यबळाचा त्यांना वापर करावा लागणार होता. असे निष्ठावंत आणि केवळ शिक्षित माणसे तयार करण्यासाठी त्यांनी इथली

परंपरागत शिक्षणपद्धती आधी मोडीत काढण्याचे

ठरविले. मेकॉले या ब्रिटिश शिक्षणतज्ज्ञाने पुढाकार घेतला आणि भारतात ‘बाबू’ तयार करण्याचे कारखाने सुरू झाले. आज ब्रिटिशांनी भारत सोडून साठ वर्षे झालीत; परंतु आजही ते कारखाने तसेच सुरू आहेत. आजही आपल्या शाळा-महाविद्यालयांमधून केवळ बाबूच बाहेर पडत आहेत. ब्रिटिशांनी आपल्या सोयीनुसार आणि भारतीयांची नोकरी करण्याची मानसिकता ओळखून इथली शिक्षणपद्धती बदलली होती; परंतु देश स्वतंत्र झाल्यावर त्यांचीच नीती पुढे का सुरू ठेवण्यात आली हे कळायला मार्ग नाही. गुलामीच्या मानसिकतेतून आम्ही आजही बाहेर पडू शकलेलो नाही. आजही आम्ही त्याच झापडबंद शिक्षणपद्धतीला कवटाळून बसलो आहोत. या साठ वर्षांत जग खूप बदलले आहे. या बदलाशी जुळवून घेणारी शिक्षणपद्धती मात्र आम्ही आत्मसात केलेली नाही. खरेतर अत्याधुनिक संफ साधनांमुळे आज जग इतके जवळ आले आहे की ‘आपलं गाव, आपलं शिवार’ या संकल्पनेला अर्थच उरलेला नाही. आपलं गावच काय, आपला जिल्हा, राज्य,देश हे शब्दही खूप संकुचित झाले आहेत. संपूर्ण जगच एक मोठे खेडे बनले आहे आणि या खेड्याची भाषाही खूप बदलली आहे. ही भाषा पाटी-पेन्सिल घेऊन शिकता येणार नाही. सगळी शिक्षणपद्धतीच बदलावी लागणार आहे. तसेही भारतातील पदव्यांना विदेशात काहीच किंमत नसते. तिकडे जाणाऱ्या इकडच्या ‘स्कॉलर्स’ना पुन्हा परीक्षा देऊन आपली योग्यता सिद्ध करावी लागतेच. आपल्याकडे ज्याप्रमाणे अमरावती विद्यापीठातील आणि कोहचाडे प्रकरणानंतर नागपूर विद्यापीठातीलही पदवीधराला पुण्या-मुंबईत फारशी किंमत दिली जात नाही त
सलाच काहीसा हा प्रकार आहे. ही परिस्थिती आता बदलावी लागेल. भारतीय विद्यापीठातील पदव जागतिक दर्जाची झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात अगदी पायापासून व्हायला हवी. मातृभाषेचा अभिमान वगैरे ठीक आहे; परंतु आज इंठाजी जागतिक भाषा म्हणून ओळखली जाते ही वस्तुस्थितीही स्वीकारायला हवी. आपल्या पाल्याला बाबूच करायचे असेल तर काही हरकत नाही; परंतु तो शिकून खरेच मोठा व्हावा असे वाटत असेल तर पालकांनी अगदी पहिल्या वर्गापासून आपल्या पाल्यांना इंठाजीचे बाळकडू द्यायला हवे. मातृभाषेचा अभिमान कायम ठेवूनही हे करता येईल. बहुभाषिक होणे ही बदलत्या काळाची गरज आहे आणि त्यात एक भाषा इंठाजी असणे जवळपास अनिवार्य आहे. त्या अनुषंगाने तातडीने करता येईल असा एक बदल म्हणजे सध्याच्या पाठ्यक्रमाऐवजी सगळ््याच शाळांमध्ये ‘सीबीएसई’ पाठ्यक्रम सुरू करावा. शिक्षणात व्यावसायिक कौशल्यावर अधिक भर असावा. दहावीनंतर उमेदीची पाच वर्षे घालवून ‘बी.कॉम’ होणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा बारावीनंतर अवघे सहा महिने संगणकाचा ‘टॅली’ कोर्स करणारा प्रत्यक्षात अधिक कमाई करतो. सांगायचे तात्पर्य, शिक्षण वाया जाणारे नसावे. तद्वतच आयुष्यातील दहापंधरा वर्षे बरबाद करणारेही नसावे. हे युग ‘ब्रेन डन’चे युग आहे. बौद्धिक संपदेची संपूर्ण जगात मागणी वाढत आहे. विदेशात रोजगाराच्या अनेक संधी भारतीय तरुणांना उपलब्ध होत आहेत. गरज आहे ती फत्त* त्यासाठी आवश्यक असलेली किमान पात्रता मिळविण्याची. ही पात्रता प्रचलित शिक्षणपद्धतीतून मिळविता येणार नाही. मध्यंतरी यवतमाळला एका शैक्षणिक परिषदेत उपस्थित राहण्याचा योग आला. शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके, तसेच या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ तिथे उपस्थित होते. त्या परिषदेत माझ्या भाषणाचा विषय होता ‘शिक्षणातील आवश्यक बदल’ त्यादरम्यान मी तिथे उपस्थित असलेल्या शिक्षकांपैकी क

ती शिक्षक नियमितपणे ‘नेट सर्फिंग’ करतात असे विचारले. उपस्थित चार ते पाच हजार शिक्षकांपैकी अवघे पाच हात उंचावले. शंभर वर्षांपूर्वी पाटी-पेन्सिलला जे महत्त्व होते तेच आज संगणकाला आले आहे आणि आमचे शिक्षकच संगणकापासून शेकडो मैल अंतर राखून आहेत. ही खूप भयावह परिस्थिती आहे. मुलांना लहानपणापासूनच संगणकाचे ज्ञान देणे गरजेचे असताना शिक्षकच संगणकाशी परिचित नाहीत. अनेक शाळांमध्ये सरकारकडून संगणक पुरविले गेले आहेत; परंतु ते केवळ ‘शो-पिस’ ठरले आहेत. त्यांच्यावरची धूळही झटकली जात

नाही. इंटरनेट जोडणी असलेल्या संगणकाचे महत्त्व एखाद्या विद्यापीठापेक्षा कमी नसते. माहितीचा, ज्ञानाचा

प्रचंड खजिना त्याद्वारे मुलांना, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येतो; परंतु आपल्याकडील 95 टक्के विद्यार्थी संगणकापासून वंचित असतात. कारण त्यांना शिक्षित करण्याची जबाबदारी असलेला शिक्षकच संगणक निरक्षर आहे. परिणामी, आजच्या काळाशी सुसंगत शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत नाही. हे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक बनणार आहेत. ते नागरिक बनतील परंतु आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांच्यात योग्यता असेल का? सुशिक्षित असण्याची व्याख्या आता पार बदलली आहे. लिहिता-वाचता येणे म्हणजे सुशिक्षित असणे होत नाही. त्यांना फार तर साक्षर म्हणता येईल. खरेतर उद्या ज्याला संगणकाचे ज्ञान नाही तो अडाणीच समजला जाईल. स्वत:च्या बुद्धिमतेला संगणकाची साथ द्यावीच लागेल. मोबाईलप्रमाणेच संगणकाच्या किमतीही आता झपाट्याने खाली उतरत आहेत. यापुढे बहुतेक व्यवहार, अगदी किराणा दुकानातले व्यवहारही संगणकीकृत होतील. संगणक सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनेल आणि आम्ही ‘ग- गणपतीचा’, ‘भ- भटजीचा’ करत बसू. ही परिस्थिती बदललीच पाहिजे. सुरुवात प्राथमिक शाळांपासून व्हायला हवी. अगदी मास्तरांपासून शाळेच
या बाह्य रंगरूपापर्यंत सगळंच बदललं पाहिजे. जे बदलायला तयार नसतील त्यांना सत्त*ीने घरी बसवावे लागेल. ‘सीबीएसई’ किंवा तत्सम पॅटर्न सर्वत्र लागू करावा. आज अनेक शाळा खासगी संस्थांच्या ताब्यात आहेत आणि त्या बहुतेक राजकीय लोकांशी संबंधित आहेत. हा बदल त्यांना रुचणार नाही, परवडणार नाही. कारण प्रश्न त्यांच्या दुकानदारीचा आहे. शिक्षणाशी कुणालाच काही देणेघेणे नसते. सगळीकडे शिक्षणाच्या नावावर धंदे सुरू आहेत. परंतु नुकसान देशाचे होत आहे, भावी पिढीचे होणार आहे. त्यामुळे आता पालकांनीच आपल्या पाल्यांना खऱ्या अर्थाने दर्जेदार शिक्षण द्यायला सुरुवात करावी. काळाची पावले पालकांनीच जाणून घ्यावीत. मेकॉले आता कालबाह्य झाला आहे त्याला गाडा. सरकार गाडायला तयार नसेल तर आपणच इतर खासगी पर्याय स्वीकारून स्वत:चा मार्ग निवडण्यास पुढाकार घ्या. कारण शेवटी आपल्या पाल्यांचे भवितव्य आपल्यालाच घडवायचे आहे!

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..