नवीन लेखन...

अतिथी देवो भव संस्कृतीची लागली वाट

भारतीय संस्कृतीनुसार घरी आलेल्या पाहुण्यांचे यथोचित स्वागत करून त्यांना काहीही त्रास ना होता आपला पाहूणचार घेता यावा, यासाठी कितीही कष्ट झेलण्याची तयारी सोसण्याची शिकवण दिली जाते. अतिथी देवो भव अर्थात घरी येणार्‍या अतिथीला देव मानण्याची शिकवण देणारी आपली भारतीय संस्कृती जगात महान आहे. मात्र या संस्कृतीला आणि तिने दिलेल्या आदर्श शिकवणुकीलाच काळिमा फासल्याचा प्रकार दुर्दैवाने आपल्या ऐतिहासिक अहमदनगर शहरात घडला.परदेशी नागरिकांच्या आपल्या देशाला भेटी देण्याच्या प्रकाराने आपली आणि त्यांच्या संस्कृतीची चांगली देवाण-घेवाण होते. परदेशी लोक त्यांच्या देशात येथे आलेल्या अनुभवांविषयी चर्चा करतात. एका अर्थाने त्यांच्या या पर्यटन आणि धार्मिक यात्रांच्या माध्यमातून आपल्या देशाचे नाव बाहेरच्या देशांत चांगले अथवा खराब होते. आपल्या देशाचे केंद्रीय विदेश मंत्रालय या तत्वाचा प्रचार व्हावा, यासाठी जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करते. नुकतीच अभिनेते अमीरखान यांचा सहभाग असलेली जाहीरात आपण सर्वांनी पाहिली असेल. यात काही परदेशी युवतींची छेड काढणार्‍या तरुणांच्या या कृत्याने आपल्या देशाची परदेशात कशी बदनामी होत आहे, हे अभिनेते खान पटवून देतात. मात्र यातून काहीही बोध घेण्याऐवजी अहमदनगरच्या खुर्शीद अयुब पठाण या इसमाने आस्ट्रेलिया येथील शोना इलिझाबेथ मॅकडरमॉर या महिलेला तब्बल साडेचार लाख रुपयांना फसविले. या महिलेप्रमाणे अनेक परदेशी नागरिक अहमदनगरच्या मेहेराबाद येथील मेहेरबाबांच्या समाधी दर्शनासाठी नेहमी येतात. ही महिला बाबांच्या दर्शनास जाताना पठाण याने तिचा विश्‍वास संपादन करून आपण खूप अडचणीत तिला असल्याचे सांगितले. पतसंस्थेच्या कर्जाचे ओझे असल्याचे सांगून त्या महिलेची सहानुभूती मिळवित पठाण याने एक महिन्याच्या बोलीवर तिला साडेचार लाख रुपये मागितले. तिनेही बिचारीने युनियन ट्रान्सफर व क्रेडिट कार्डच्या सहाय्याने पठाण यास पैसे दिले. विशेष म्हणजे हे पैसे त्या महिलेला परत देण्याविषयी दि.१४ ऑक्टोबर २०१० मध्ये उभयतांमध्ये नोटरी करारदेखील झाला. मात्र पठाण याने त्या महिलेला पैसे दिले नाहीत. पठाणने तिचा खर्‍या अर्थाने विश्‍वासघात केला. याची किंमत त्याला नंतर मोजावी लागणार तर आहेच. परंतु, या अनुभवाची सदर महिलेने तिच्या मायदेशी कितीवेळा चर्चा केली असेल, त्यातून आपल्या देशाची किती बदनामी झाली असेल आणि या सर्व प्रकारानंतर आता कुठेतरी याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. परंतु मूळ प्रश्‍न हाच आहे, की परदेशी महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी पठाण याला जी शिक्षा होईल, त्या शिक्षेने आपल्या देशाची परदेशात झालेली बदनामी भरून काढता येणार आहे का? क्षणिक स्वार्थासाठी आई, वडिल, भाऊ, बहिण, मित्र आणि कोणाचाही विश्‍वासघात करण्याची वाढत जाणारी स्वार्थी प्रवृत्ती किती घातक आहे, याचा कुठेतरी विचार होणार आहे की नाही? मग प्रश्‍न असा उरतो की एकमेकाला फसवून कमविलेले लाखो रुपये आपण मृत्यूनंतर आपल्या बरोबर नेणार आहोत का? नाही ना? मग कशासाठी हा सारा अट्टाहास आपण करीत आहोत आपण? याचा निदान नरकात जाण्यापूर्वी प्रत्येकाने गंभीरपणे विचार करावा.

— बाळासाहेब शेटे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..