नवीन लेखन...

वक्तव्ये आणि मिडिया

परवा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून श्री. कुमार केतकरांनी केलेल्या वक्तव्यावरून भलताच गदारोळ झाला. त्यातच दुसर्या दिवशी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या देवेन्द्राजी फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवीन वादाला तोंड फुटले. त्यात नवीन म्हणजे त्याच दिवशी पत्रकार दिन असल्यामुळे आपल्या जागरूक अशा टीव्ही मिडीयाने अनेक मान्यवरांच्या चर्चा या विषयावर घडवून आणत कुमार केतकरांच्या वक्तव्याचे समर्थन आणि देवेन्द्रजींच्या वक्तव्याचा विपर्यास करत कुमारजी कसे बरोबर आणि देवेन्द्राजी कसे चूक याबद्दल आपली मते मांडत, आपण धर्मनिरपेक्षतेचे किती समर्थन करतो हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. वास्तविक देवेन्द्रजींचा वक्तव्य हि एक प्रतिक्रिया होती. आणि प्रतिक्रिया हि नेहमी कोणत्या तरी क्रिये नंतर येते. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून आपण काय बोलतो याचा भान ज्येष्ठ विचारवंत कुमार केतकरांनी ठेवणे अपेक्षित होत. आपण असाल पत्रकार, संपादक, विचारवंत व्यासंगी अभ्यासू व्यक्तिमत्व त्याबद्दल काही शंका नाही. परंतु आपली हि बुद्धीमत्ता, आपला व्यासंग कुठे किती आणि कसा वापरायचा हेही कळन गरजेचा आहे. कोणत्याही माणसावर टीका करा आपल्या घटनेने आपल्याला तो अधिकार दिलाच आहे पण कोणावर टीका करताना जो अधिकार आपल्याला घटनेने दिला आहे तोच अधिकार समोरच्यालाही त्याच घटनेने दिला आहे, याचेही भान ठेवा आणि आपल्या क्रिये नंतर येणाऱ्या प्रतिक्रियेसाठी तयार राहा.

श्री. देवेन्द्राजी फडणवीस यांच्या प्रतिक्रियेवर दिवसभर चर्चा घडवून आणणाऱ्या टीव्ही मिडीयाला कुमार केतकरांचे वक्तव्य चुकीचे आहे असा नाही वाटला का? का त्यांना ते समजला नाही कि समजून घ्यायचाच नव्हत. आपल्या सोयीच तेवढाच बातमी म्हणून दाखवायचा आणि नाण्याची दुसरी बाजू कितीही बरोबर असली तरी चूक म्हणूनच दाखवायची असा अट्टाहास करणारे निखील वागळे यांच्यासारखे काही पत्रकार आहेत. त्यातच ती बातमी जर कोणत्याही हिंदू विरोधी किवा हिंदुत्ववादी विचारसरणी विरोधी असेल तर ब्रेकिंग न्येज म्हणून दाखवली जाते. वास्तविक पत्रकारिता हि कोणत्याही जाती, धर्म कोणत्याही पक्ष किवा व्यक्ती विरोधी नसावी असा मला तरी वाटत. जे वास्तव असेल तेच तेवढाच लोकांपर्यंत पोहोचाव हेच अपेक्षित असत आम्हा जनतेला. पण सद्यातरी तस होताना दिसलं नाही अनेक मुद्यात वस्तुस्थितीला मुरड घालत आपल्याला हवी तीच बातमी दाखवण्याकडे टीव्ही मिडीयाचा तरी कल दिसतो. त्याचाच पुन: प्रत्यय गेले काही दिवस येत आहे.
श्री. कुमार केतकर यांच्या विरोधात काही बोलायची माझी योग्यता नसेल हि. हे मान्य करायला मला कोणतीच अडचण नाहीये. त्यांचा वय, अनुभव, अभ्यास सगळाच खूप जास्त आहे. पण त्यांची अशी वक्तव्य वाचली किवा आईकली कि, खरोखरच यांची पत्रकारिता, अभ्यास खरा आहे का? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. एखाद्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून टीका करताना हे महाशय श्री. नरेन्द्राभाई मोदी यांच्या वर इतके घसरले कि, त्यात आपण किती जास्त प्रमाणात कॉंग्रेस समर्थक आहोत हेच उघड करून बसले. त्यांच्या त्या वक्तव्यात विचारिक टीका किवा पत्रकाराची टीका न राहता ती कॉंग्रेस च्या समर्थनासाठी किंबहुना कॉंग्रेस च्या बचावासाठी केलेले एक निरर्थक वक्तव्य होऊन बसली. बर एवद्यावरच न थांबता हे महाशय कृषिमंत्री शरद पवार साहेबांवर हि घसरले. एकुणातच ते तिथे साहित्य संमेलनात कॉंग्रेस चे प्रचारक म्हणून आल्याचे त्यांच्या वक्तव्यातून उघड होत होते. आणि जर ते राजकीय प्रचारक म्हणून तिथे बोलत असतील तर विरोधकांनी त्यांना त्यांच्याच शब्दात उत्तर देणे अपेक्षित होते. आणि तेच मा. देवेन्द्राजी फडणवीस यांनी केले असा एक माणूस म्हणून मला तरी वाटते.
या सगळ्या विषयावर जी काही चर्चा झाली त्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती. कि देशभरात निकोप वातावरण हवे अशी चर्चा करणारी आपली मिडिया वास्तवात स्वत किती निकोप आहे याचे आत्मा परीक्षण करणे गरजेचे आहे. त्यांनी हे हि लक्षात घ्यावे कि आपण एखादी बातमी दाखवता त्याची समीक्षा करता तेव्हा ती प्रथम क्रिया आहे कि प्रतिक्रिया याचा हि उहापोह करावा. आणि जर ती प्रतिक्रिया असेल तर ती प्रतिक्रिया ज्या क्रियेची आहे त्या क्रियेवर हि चर्चा व्हावी. नुसता “देवेंद्र फडणवीस कुमार केतकरांना वेडा म्हणाले देवेन्द्रजीना हे शोभाता का?” हाच प्रश्न विचारण्यापेक्षा ते वेडा का म्हणाले. याची कारणहि दाखवली तर लोकांची आपल्या वृत्तवाहिनीवरील विश्वासहर्ता वाढेल हे नक्की. तसेच आपल्या धर्मनिरपेक्षतेचे प्रदर्शन करताना एकाद्या धर्मावर आपण नकळत अन्याय तर करत नाही ना? याचे हि भान ठेवा. मी हिंदू आहे मला माझ्या धर्माचा अभिमान आहे. मला बाकीच्या धर्माबद्दल हि आदर आहे पण याचा अर्थ असा नाही तो आदर दाखवण्यासाठी मी स्वधर्माचा तिरस्कार करायला हवा. परंतु आपल्या सध्याच्या वार्तांकनात तो विरोध जास्त असतो. कोणत्याही राजकीय पक्षांपेक्षा जनतेला धर्माधर्म मध्ये झुंजायला भाग पडण्यास हीच भूमिका जास्त धोकादायक ठरू शकते. “त्यामुळे एका वेळी ६/६ नाटकी धर्मनिरपेक्ष लोक चर्चेला बोलावता आणि हिंदुत्वाच्या बचावासाठी कोण एका व्यक्तीला समोर उभा करता. ओरडून त्या व्यक्तीला बोलू न देता आपला मुद्दा त्याच्या माथी मारता आणि शेवटी बघा यांचा धर्मवाद कसा चुकीचा आहे असा निष्कर्ष काढून मोकळे होता.” हा सगळा भंपकपणा आपल्या अंगलट येऊ शकतो. हे जर आपल्याला चुकीचे वाटत असेल तर आपल्या बातम्यांवर सोशल मिडिया वर येणाऱ्या प्रतिक्रिया वाचाव्यात त्यात १० पैकी ९ लोक आपला निषेध करतात. आपण ज्या लोकांसाठी बातम्या देता ते आपला निषेधच करीत असतील तर आपण कुठे तरी चुकतोय हा विचार करण्याची वेळ आता आली आहे.
बाकी माझा खर मत असा आहे कि कोणीही धर्मनिरपेक्ष नसतो. स्वताला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे महाभाग हे जास्त धर्मांध असतात. हे गेले कित्येक वर्षात सिध्द झालाय. कारण स्वताला धर्मनिरपेक्ष सिध्द करण्यासाठी हे लोक दुसर्या धर्माचा नकळत पुरस्कार करत असतात… बाकी आपण सुज्ञ आहोतच…
आपला,
शैलेश देशपांडे

— शैलेश देशपांडे उर्फ श…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..