नवीन लेखन...

लेक माझी

अशी कशी लेक देवा,
माझ्या पोटी येते
नाव सुद्धा माझं ती
इथेच ठेऊन जाते।।

पहिला घास देवा ती
माझ्या कडून खाते
माझाच हात धरुन ती
पहिलं पाऊल टाकते।।

माझ्याकडूनच ती
पहिलं अक्षर शिकते
तिच्यासाठी सुद्धा मी
रात्र रात्र जागतो।।

कुशीत माझ्या झोपण्यासाठी
गाल फुगवुन बसते….
मी आणलेला फ्रॉक घालून
घर भर नाचते।।

अशी कशी लेक देवा,
माझ्या पोटी येते
असे कसे वेगळे हे
तिचे माझे नाते।।

एक दिवस अचानक.. ती
मोठी होऊन जाते
बाबा, तूम्ही दमला का ?
हळूच मला विचारते॥

माझ्या साठी कपडे, चप्पल,
खाऊ घेऊन येते……
नव्या जगातील नविन गोष्टी
मलाच ती शिकवते।।

तिच्या दूर जाण्याने
कातर मी होतो
हळूच हसून मला ती
कुशीत घेऊन बसते।।

कळत नाही मला देवा,
असे कसे होते
कधी जागा बदलून ती
माझीच आई होते।।

देव म्हणाला, ऐक पोरा..
तुझे तिचे नाते
विश्वाच्या साखळीची
एक कडी असते।।

तुझ्या दारी फुलण्यासाठी
हे रोप दिलेले असते…
एक दिवस दुस-याच्या
घराची शोभा व्हायचे असते…
सावली आणि सुगंधाशी तर
तुझेच नाते असते।।

वाहत्या प्रवाहाला कोणी,
मुठीत कधी का धरते ?
मार्ग आहे ज्याचा, त्याचा
पुढेच असते जायचे।।

तुझ्या अंगणातली धारा ही
“जीवनदात्री” होते
आणि वाहती राहण्यासाठीच
“गंगा” ”सागराला” मिळते।।

एक तरी मुलगी असावी
उमलताना बघावी
नाजूक नखरे करताना
न्याहाळायला मिळावी

एक तरी मुलगी असावी
साजिरी गोजिरी दिसावी
नाना मागण्या पुरवताना
तारांबळ माझी उडावी

एक तरी मुलगी असावी
मॅचींग करताना बघावी
नटता नटता आईला तिने
नात्यातली गंमत शिकवावी

एक तरी मुलगी असावी
जवळ येऊन बसावी
मनातली गुपिते तिने
हळूच कानात सांगावी

एक तरी मुलगी असावी
गालातल्या गालात हसावी
कधीतरी भावनेच्या भरात
गळ्यात मिठी मारावी……!

एक तरी मुलगी असावी
एक तरी मुलगी असावी

— श्रीकांत पोहनकर

श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर 40 Articles
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..