नवीन लेखन...

बांगलादेशमध्ये होणारी गोवंशाची तस्करी आणि त्याचा दहशतवादावर परिणाम

बांग्लादेशमधून अफू, गांजा, चरसचीही तस्करी भारतात केली जाते. भारतातुन बांग्लादेशमधे गोवंशाची तस्करी भारतात केली जाते. तस्करी रोखण्यात यश आले तर, बांगलादेशी घुसखोरी पण कमी होइल. भारत-बांगलादेश सीमेवर तैनात असलेले सीमा सुरक्षा दल आता भारतातून बांगलादेशात होणार्‍या गायींच्या चोरट्या निर्यातीविरोधात उभे ठाकले आहेत. बांबूची काठी, दोरखंड घेऊन बांगलादेशी बाजारात नेले जाणारे गोधन रोखण्याचे काम जवान करत आहेत.

भारतातून दर वर्षी सुमारे २० लाख जनावरांची तस्करी बांगलादेशात होते. ०६ जुनला आलेल्या बातमी प्रमाणे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी आतापर्यंत सुमारे ९० हजार पाळीव जनावरे जप्त केली , ४०० भारतीय आणि बांगलादेशी तस्करांना पकडले आहे. जनावरे कापणे, गोमांस प्रक्रिया युनिट, कातडी कमावण्याचे, तसेच जनावरांची हाडे फोडण्याचे कारखाने अशी सुमारे १९० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बांगलादेशात आहे. बांगलादेशच्या एकूण अर्थव्यवस्थेपैकी या व्यवसायाचा वाटा तीन टक्के इतका आहे.

गोवंशाची मोठी निर्यात बांगलादेश, पाकिस्तान मधे
जगात भारत ही मांस निर्यातीची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान हे दोन्ही देश मांसभक्षी आहेत. त्यामुळे गोवंशाची मोठी निर्यात या दोन देशांनाच होते. हा क्रम वर्षभर सुरूच असतो. मांस काढल्यानंतर उरलेल्या अवयवांच्याही तेथे विविध वस्तू तयार केल्या जातात. या कारणामुळेच विदेशातही भारतीय मासांची मागणी वाढतच आहे.म्हणायला बंदी आहे, पण ती केवळ कागदापुरती. भारतात ज्या वस्तूंवर प्रतिबंध आहे, त्याची तस्करी करून तो माल या दोन देशांत जातो. मग या देशांतून मध्यपूर्वी आणि पश्‍चिमेच्या काही देशांत तस्करी होते.

जवानांना दंड आणि तस्करांना मलिदा
सीमेवरील आमच्या जवानांनी अशा काही तस्करांना प्राणाची बाजी लावून पकडले, दोघांना ठार मारले, त्यांना प्रशस्तीपत्र देण्याऐवजी मागच्या सरकारने चार जवानांनाच निलंबित करून टाकले.दोन तस्कर मारले गेले त्यांच्या कुटुंबीयांना एशियन ह्युमन कमिशन या संघटनेने पाच पाच लाख रुपये दिले! जवानांना दंड आणि तस्करांना मलिदा हा मागच्या सरकारच्या काळात न्याय होता.

मागचे केंद्रशासन गोमांस निर्यातदारांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवत होते. पशूवधगृह उभारणार्‍या व्यक्तीला शासनाकडून ५ वर्षांसाठी करात सूट दिली जात होती. त्यांना ५ कोटी रुपयांचे कर्जही दिले जाते. तसेच गोमांस निर्यातदाराला प्रति किलोमीटर ५ रुपये वाहतूक भत्ता दिला जात होता.

भारतातून तस्करी होणार्‍या गाईंची धक्कादायक कथा
भारतातून तस्करी होणार्‍या गाईंची कथा अधिक धक्कादायक आहे. दशलक्षावधि गाई दरवर्षी बांगला देशमध्ये खुष्कीच्या व जलमार्गाने तस्करी करुन पाठविल्या जातात. या धंद्यात दोन्ही देशातील मोठ्या प्रमाणात स्मगलरची त्यासाठी साखळी तयार झाली आहे. गाईंचे तांडे हाकत हाकत बांगला देशाची सीमा गाठली जाते. तस्करी उघडकीस येऊ नये म्हणून गाय, म्हैस, बकरे यांचे तोंड शिवून बंद करण्यात येते. जेणेकरून त्यांची ओरड ऐकायला जायला नको.

तेथे बीएएस्एफ’चे जवान आडवे आले तर त्यांच्याशी सशस्त्र संघर्ष केला जातो. या प्राण्यांना एक रासायनिक इंजेक्शन दिले जाते त्यामुळे ते एवढे चवताळतात की काटेरी कुंपणातून ते बांगला देशच्या हद्दीत जातात. अनेक ठिकाणी बांबूच्या क्रेन्स उभ्या असतात. या क्रेन्समध्ये प्राण्याना अडकविले जाते आणि काही सेकंदात त्यांना भारतीय हद्दीतून बांगला देशच्या हद्दीत फेकले जाते. शेकडो गाई, बैल व वासरे गंगा व ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहात ढकलले जातात आणि त्यांना प्रवाहातून पोहून बांगला देशमध्ये ताब्यात घेतले जाते.

गाईंच्या स्मगलिंग बरोबर बनावट नोटा, शस्त्रे यांचे स्मगलिंग
बांगला देशमध्ये डेली स्टार नावाच्या एक दैनिकाप्रमाणे भारतातून एक कोटी गाई बांगला देशमध्ये दरवर्षी आणल्या जातात. ऑब्जर्व्ह रिसर्च फाऊंडेशनच्या अहवालानुसार दररोज वीस ते पंचवीस हजार गाई, बैल व वासरे भारतातून बांगला देशमध्ये चोरट्या मार्गाने नेल्या जातात.

भारतातून पाचशे ते तीन हजार रुपयाला घेतलेली गाय बांगला देशात वीस ते चाळीस हजार रुपयांना विकली जाते. त्यांचे मांस, कातडे व हाडे येथून अन्य देशात निर्यात केले जातात. भारतातील स्मगलिंग केलेल्या गाई हे बांगला देशच्या अर्थशास्त्रात मोठी भर घालणारे माध्यम आहे. स्मगलिंग करुन आणलेली गाय चरत चरत आपल्या देशात आली असे स्मगलर सांगतात.

बांगलादेशी हे मांस खातातच पण एक बिलियन म्हणजे एक हजार कोटी रुपये किंमतीच्या कातड्याच्या वस्तू बनवून जगभर पाठवितात व भारतातहि त्या वस्तू येतात. भारतातून स्मगलिंग करुन गाई बांगला देशात नेल्या जातात आणि त्यांच्या कातड्याच्या बनवलेल्या वस्तू भारतात रितसर आयात केल्या जातात. या स्मगलिंग बरोबर बनावट नोटा, शस्त्रे यांचे स्मगलिंगहि जोड धंदा म्हणून केले जाते.

तस्करीतील पैसा आतंकवादासाठी पुरवणे
तस्करीतून निर्माण झालेल्या अवैध व्यवसायाच्या साखळीतून आतंकवादाला चालना मिळते. ती साखळी घुसखोरी व हवाला व्यवहार करण्यासाठी वापरली जाते.या गोधन तस्करीतून निर्माण होणारा पैसा आतंकवादी बनवण्यासाठी, त्यांना पोसण्यासाठी अथवा त्यांना शस्त्रे पुरवण्यासाठी वापरला जातो. भारत-बांगला सीमारेषेवर निर्माण होणार्‍या अवैध मशिदी आणि मदरसे हे तस्करीसाठी, तसेच त्यातील गुंडांना जिहादी विचारसरणी शिकवणे, दहशतवाद पसरवणे, आदी सर्व गोष्टींसाठी अड्डे बनतात.

काँग्रेसकालात पी. चिदंबरम् बांगलादेशच्या दौर्यावर गेले असतांना बांगलादेशने भारतीय सीमा सुरक्षा दल आमच्या नागरिकांची नाहक हत्या करते, असा कांगावा केला. त्यामुळे आमच्या गृहमंत्र्यांनी ‘गोतस्करांवर खर्या गोळ्या झाडू नयेत, तर रबरी बुलेट झाडाव्यात’, असा आदेश काढला.

या गोतस्करांना पकडलेच, तरी त्यांच्यावर सीमा सुरक्षा दलाला कारवाईचे अधिकार नाहीत. त्यामुळे त्यांना या गोतस्करांना स्थानिक पोलीसांकडे हस्तांतरित करावे लागते. ते पोलीस स्थानिक असल्यामुळे या गोतस्करांचेच पक्के भाई, असतात. त्यामुळे सीमा सुरक्षा दलाचे जवान असे हस्तांतरण करून पुन्हा सीमेवर पोहोचण्याआधीच तेच गोतस्कर पुन्हा नवीन गोधन तस्करी करण्यासाठी उपस्थित असतात.

सर्रास लाच घेऊन तस्करी
अनेक वेळेला सर्रास लाच घेऊन तस्करी होऊ देण्याचेही प्रकार होतात. पकडलेले गोधन सीमा सुरक्षा दलाला भारतीय ‘कस्टम्स’ खात्याकडे जमा करावे लागते. ‘कस्टम’ खाते त्या गोधनाचा लिलाव करते. लिलावात पुन्हा हेच गोतस्कर ते गोधन पुन्हा तस्करी करण्यासाठी विकत घेतात.

याच साखळीतून बनावट नोटा भारतात आणल्या आणि वितरित केल्या जातात. म्हणजेच भारतातील गोधन खरेदी करतांना याच नोटांद्वारे खरेदी करा. खरेदी अजून स्वस्त पडते.

भारतातून जनावरे, अन्नधान्य, शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि मादक पदार्थांची तस्करी केली जाते. त्याचप्रमाणे बांगलादेशातून विघातक शस्त्रास्त्रे अतिरेकी कारवायांसाठी भारतात आणली जातात. उपजीविकेसाठी लाखो बांगलादेशी दरवर्षी भारतात घुसतात आणि त्यांच्यापैकी अनेक लोक घातपाती कारवायांमध्ये सामील होतात. बांगलादेशच्या सीमेवर अजूनही मजबूत असे कुंपण घालण्याचे काम पूर्ण झालेले नाही. दोन्ही देशांमध्ये असलेली सीमा आजही पूर्णपणे सुरक्षित नाही. सीमा पूर्णपणे सील केली जात नाही, तोवर जनावरे, अन्नधान्य, शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि मादक पदार्थांची तस्करी, घुसखोरीची समस्या संपणार नाही आणि अंतर्गत सुरक्षेला निर्माण झालेला धोकाही संपणार नाही.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..