नवीन लेखन...

प्रेझेन्टेशनच महत्त्व



अभियांत्रिकी पदवी घेऊन मुंबईत आलो आणि सोरोस एन्ड टौरस – एस एन टी या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत अभियांत्रिकी पदवीधर ट्रेनी म्हणून जॉब मिळाला. घर सोडतांना अभिनंदन, शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव झाला असला तरी मुंबईत कुणाला फार कौतुक दिसत नव्हते. बरोबरीन जॉईन झालेले दोघेही आय आय टी चे स्नातक होते. अगदी विश्वेश्वरय्या सारख्या रिजनल कोलेज मधून प्राविण्य मिळवून पास झालो असलो तरी – मुंबई आणि नागपूर जीवन शैलीत खूप फरक होता. सहज इंग्रजी झाडायची, टेलेफोन वर बोलण्याची ,स्टाइलीत वागण्याची एवढच काय लोकलन प्रवास – अगदी कशाचीच सवय नव्हती. त्यामुळे खूप ठरवूनही मनावर एक अनामिक स्पर्धात्मक दडपण होते.

सुदैवाने बॉस देव माणूस मिळाला. मुंबईतच लहानाचा मोठा झाला असला तरी मोठ्या भावाप्रमाणे सांभाळून घेणारा. साधारण दोन महिने झाले असतील.- बॉस ने केबिन मध्ये बोलावले आणि विचारले “कसं चाललंय ” ” सर, माझा पगार फक्त ७०० रुपये आहे. समजा माझी एखादी कल्पना अयशस्वी झाली आणि हजारोंचे नुकसान झाले तर?” कसे भरून देता येईल ” मी आपली मध्यम वर्गी भीती बोलून दाखविली. ” हे बघ- या क्षणापासून मी तुल कंपनी तर्फे १० हजार रुपयाची चूक माफ करतोय – मोठ्या आकड्यांना घाबरायचं नाही.हुशार आहेस. स्वतःच्या ज्ञानावर विश्वास ठेव आणि आपल्या अंतर्मनाच ऐक ” ” हो आणि एक, अत्त्यंत महत्त्वाचे -प्रेझेन्टेशनला महत्त्व दे. गोष्ट कितीही चांगली असली तरी ती उत्कृष्ट पणे आणि वेळेत मांडता आली पाहिजे – इट इज द पेकेज देट मेटर्स “

काही दिवसातच मी धाडसाने मांडलेली कल्पना – एक फिक्शचर, मीच डिझाईन केले,

बनवून घेतले व यशस्वी करून दाखविले.फक्त बारा हजार खर्च झालेत आणि एक ऑपरेशन आणि रिजेक्शन

कमी झाल्याने एका कामगाराची व वर्षाला सुमारे ३२ लाखांची बचत झाली. भरपूर कौतुक,बत्तीस हजारच बक्षीस व एक जादा वेतनवाढ मिळाली.

पुढे बॉसची बदली झाली.सल्ला ही विस्मृतीत गेला.आणि एक दिवस कंपनीतील एक इनडक्टो मशीन ट्युब्ज चोक झाल्याने शनिवारी बंद पडले. त्यामुळे एक संपूर्ण सेक्शन मधील २० कामगारांना कामाशिवाय कामाशिवाय पगार देण्याची वेळ आली.आणीबाणी होती म्हणून विषय अनोळखी होता तरीही मी ताबा घेतला,विषय अनोळखी होता. येलो पेजेस मधून अनेक फोन करून केमिकल्स ने ट्युब्ज स्वच्छ करणाऱ्या कंपनीचा पत्ता शोधून काढला.तातडीने बोलावून काम सुरु केले. दुपारी दोन ते रविवारी पहाटे ४ पर्यंत १४ तास अविरत काम करून मशीन सुरु झाले.काम करणारे लोक घरी गेलेत.रविवारी हाफ डे असल्याने मी माझी राहिलेली कामे आटोपून दुपारी घरी जायचे ठरवले.

नऊला ऑफिस सुरु झाले आणि मला दोन वर्षांनी सिनियर, मार्केटींगचा स्मार्ट इंजिनियर रमणी माझ्या टेबलावर आला. माझे तोंड भरून कौतुक केले व केल्या कामाचे सर्व बारीक सारीक तपशील जाणून घेतलेत. साडे दहाचे सुमारास माझ्या टेबलावर एक फाईल नोट आली. विषय होता – फॉर सर्क्युलेशन : .इनडक्टो मशीन रिपेयर रिपोर्ट. तपशील अचूक संपूर्णपणे मी सांगितला तसा- फक्त खाली सही होती “आर रमणी ”

त्या पाठोपाठ इनडक्टो मशीनशी काडीचाही संबंध नसलेल्या रमणीच्या खांद्यावर हात ठेऊन ‘सी इ ओ ‘ ऑफिस मध्ये आलेत. ” वेल डन रमणी. खूप मोठ्या संकटातून सोडवलस . तुझ्या प्रमोशन च्या वेळी नक्कीच मी हे ध्यानात ठेवेन. ऑल द बेस्ट.” रमणीच्या चेहर्याला आणि शर्टला लागलेले ग्रीस, विस्कटलेले केस आणि न लपलेला छद्मी आनंद माझ्या कायम स्मरणात राहिला.

क्षुब्ध होऊन माझ्या जुन्या बॉसला फोन केला. त्यानं मला प्रेझेन्टेशनला महत्त्व देण्याच्या सल्ल्याची आठवण दिली आणि सबुरीन घेण्याचा नवा सल्ला दिला. पुढे स्वतःच्या व्यवसायात मला प्रेझेन्टेशनचा सल्ला अत्त्यंत मोलाचा ठरला. समझने वाल्या सुलम उद्योजकांना मोराल ऑफ द स्टोरी काफी है.

पुरुषोत्तम आगवण मानद सचिव Chamber Of Small Industry Associations.Member, National Board of MSME

— पुरुषोत्तम आगवण

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..