नवीन लेखन...

पंचम उर्फ आर.डी.बर्मन म्हणजेच राहुलदेव बर्मन

पंचम ऊर्फ आर. डी. बर्मन यांचे संगीत म्हणजे… एकीकडे तरल.. भावूक… संवेदनशील मनाचा मुक्त असा सांगीतिक आविष्कार; तर दुसरीकडे आरडीचं संगीत म्हणजे मदहोश करणारी जादू… चैतन्याचा झंझावात… उल्हास… जोश आणि जल्लोष…! नवसंगीताचा प्रवाह पन्नास वर्षापूर्वी सुरु करणार्याव आर.डी.बर्मन यानं खर्यात अर्थानं अभिजात नवसंगीत निर्माण केलं. त्यांचा जन्म २२ जून १९३९ रोजी झाला. वडील सचिनदेव बर्मन यांचे सहाय्यक म्हणून त्यानं आपली कारकीर्द सुरु केली. वडिलांच्या अखेरच्या वर्षापर्यंत तेच सहाय्यक होते. १९६१ मध्ये आर.डी.बर्मन यांचे खास दोस्त मेहमुद यानी निर्माण केलेल्या छोटे नवाब या चित्रपटासाठी त्यांनी प्रथम स्वतंत्रपणे संगीत दिले. त्यानी संगीत दिलेला पहिला हिट चित्रपट तिसरी मंजिल हा होता. हरे राम हरे कृष्ण या गीतात त्यानी मादल नावाचे वाद्य वापरले. शोले मध्ये गाजलेलं मेहबूबा मेहबूबा हे गाणं त्यानं अरबी धर्तीची स्वररचना करून रसिकांना खूष केले. मा.राहुलदेव आणि मा.किशोर कुमार यानी ही उडत्या चालीतील गीतची शैली गाजवली. सत्तरीच्या दशकात या गायनशैलीनं उधम मचवला. मा.आर. डी. बर्मन हे त्या काळात आपली वेगळी शेली तयार करणारा एक आगळा संगीतकार होते. त्यांनी जगभरातील संगीताचा अभ्यास केला. जे संगीतीक आवाज नाहीत त्यांना देखील त्यानी संगीतात स्थान देऊन अत्यंत आगळ्या रचना तयार केल्या. एवढेच नव्हे तर मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है ही गुलजार यांची गद्यप्राय रचना त्यानं संगीतबद्ध करून आशा भोसले यांच्या कडून अशी काही हळव्या सुरांची कलाबूत लावून गाऊन घेतली की त्या गीताला फिल्मफेअर पारितोषिक लाभले. अमर प्रेममधील रैना बीत जाये या गाण्याची ठुमरीच्या अंगानं जाणारी रचना, छोटे नबाबमधील घर आ जा घिर आये बदरवाँ, पडोसनमधील शर्म आती है मगर आज ये कहना होगा, परिचय मधील बिती ना बिताई रैना, किनारा मधील नाम गुम जायेगा, अशी अनेक साधी, गुणगुणण्यासारखी मधुर गीते मा.आर. डी. बर्मन यांनी दिली आहेत. पंचमदांनी इंडस्ट्रीला बरीच वाद्यं दिली.. जसं स्पॅनिश गिटार, मादल, फ्लेंजर इत्यादी. बेस गिटार हे असंच त्यांनी भारतात आणलेले वाद्य. भारतात बेस गिटारचा वापर असलेलं पहिलं गाणं पंचमदांनी बनवलं. १९७० ची तरुण पिढी धुंदावून सोडलेलं ते गाणं होतं, “गुलाबी आँखें जो तेरी देखी‘ (दि ट्रेन). नेपाळी “मादल‘ हे असंच पंचमप्रिय वाद्य. ते प्रथम वापरलं त्यांनी आपल्या वडिलांच्या संगीत संयोजनाखाली म्हणजे “ज्वेलथीफ‘मधल्या “होटों पे ऐसी बात‘ या गाण्यात. या गाण्याचं संपूर्ण ऑर्केस्ट्रेशन पंचमचं…..बहारों के सपने, प्यार का मौसम, कटी पतंग, अमर प्रेम, हरे राम हरे कृष्ण, शोले, आंधी, यादों की बारात, बुढ्ढा मिल गया, अशा तब्बल ३०० हून अधिक सिनेमांना पंचमदांनी संगीताचा साज चढवला. राहुलदेव बर्मन यांनी १९४२ -ए लव्ह स्टोरी हा चित्रपट संगीत दिलेला शेवटचा आर. डी. बर्मन यांचे४ जानेवारी १९९३ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..