नवीन लेखन...

दिल्ली शहराची आत्मकथा

 

जीवाचा थरकाप उडवून देणारी घटना काल घडली आणि माझ्या नावावर कलंकाचा एक डागच माथ्यावर लागला. इ .सन १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला. देशाची राजधानी म्हणून माझी निवड झाली. माझं भाग्य इतकं मोठं होतं कि या देशाची घटना लिहिणारे विख्यात कायदेपंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण मी माझ्या डोळ्यासमोर पाहिला आहे हे माझे महत्भाग्य आहे. आज पर्यंत अनेक राजकीय परिवर्तने मी माझ्या डोळ्यादेखत पाहिली आहेत. अनेक राजकीय नेते आणि त्यांची कारकीर्द माझ्या समोर घडली आहे . किती सुवर्णमय दिवस होते ते, अगदी लहानग्या पासून ते वयोवृद्धापर्यंत अगदी सर्व लोकांपर्यंत माझी ख्याती दिल-वाल्यांची दिल्ली अशी होती.

पण माझ्या सुखाला कोणाची तरी नजर लागावी तशी घटना माझी डोळ्यासमोर घडली. अत्याचार जिथे पाहायला हि मिळत नव्हता तिथे अत्याचाराने अगदी सीमा पलटली होती. शहरात येणार्‍या लोकांची संख्या वाढत होती त्यामुळे ज्या गोष्टी नको होत्या त्या गोष्टी घडत होत्य. खून दरोडा बलात्कार यांचा तर कहरच होत गेला. माझ्या नवाला काळिमा फासला गेला. भारत संविधान म्हणजेच लोकशाही असणारा देश पण इथे अतिघुसखोरिमुळे माझ्या नावावर गुन्हेगाराची यादी वाढतच गेली. इथूनच माझ्या नावाला लागलेली उतरती कळा होय परप्रांतीयांची येणारी झुंड हि माझ्या बदनामीला कारणीभूत ठरली कारण इथे गुन्हे करणारा माणूस हा परप्रांतीय आहे. याच धर्तीवर अनेक प्रज्ञावंत लोक होऊन गेले. याच भूवर खून दरोडे बलात्कार करणारी मंडळी पण आली. पण माझा काय दोष मी असे काय केले ज्यामुळे मला मान शरमेने खाली घालावी लागते. ह्या गोष्टी ज्यावेळी माझ्या समोर घडतात तेव्हा मन अगदी भडकून उठते कि या लोकांना जाऊन यमसदनी पाठवावे पण माझा नाईलाज होतो. कारण मी माणूस नाही. राग येतो इथल्या राजकारण्यांचा. त्यांनी तर मला अगदी नागडं करून सोडले आहे. आज माझ्या नावाची बदनामी झाली याला कारणीभूत कोण? या आधी मी खूप चांगले दिवस पाहिले होते. त्यावेळी मला असं वाटलं नव्हतं कि मी असेही दिवस पाहीन. म्हणून मी इतकी चांगली संस्कृती पाहिली होती आणि आजची संस्कृती मी माझ्या डोळ्यादेखत पाहते आहे. इथे न समाजाचा कोणी आहे ना या रयतेचा कोणी आहे. पण पैसा हे आज इथले प्रभावी साधन आहे. इथले रक्षक भक्षक झाले आहेत. वाली हा रयतेला राहिलाच नाही. कुठे शिवाजी राजांची राजधानी आणि कुठे मी, मला माझी लाज वाटते. आज मलाही वाटते कि का शिवाजी राजे माझ्या भूमीत जन्मले नाहीत एवढीच खंत राहिली आहे.

गुन्हेगारीचा कळस व्हावा तशी घटना त्या दिवशी घडल.. रात्रीची वेळ होती आणि रस्त्यावर एक जोडपं उभं होतं. त्यांचं लग्न झालं होतं कि नाही हे माहित नव्हतं. पण ते दोघं रस्त्याच्या बाजूला उभे होते आणि थोड्या वेळानं तिथे एक खाजगी गाडी आली. त्या दोघांनी त्या गाडीत प्रवेश केला. पण त्या दोघांना आपण राक्षसांच्या दारी जातोय असं वाटलं नाही. काही वेळानं त्या गाडीत असणारी माणसे त्या दोघांकडे पाहत होती आणि त्यांच्या नजरेचे भाव बदलत होते आणि नको ते घडले. त्या नराधमांनी त्या मुलीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. अतिशय किळसवाणा प्रकार होता. माणसाने माणुसकी विसरून राक्षसी वृत्ती वापरली, मन अगदी भारावून गेले. काय दोष होता त्या मुलीचा. इतके होऊनही त्या नराधमांना आजही शिक्षा झाली नाही हीच खरी दुःखद बाब आहे. राजकारणी मस्तावालेत त्यामुळे जनतेचे रक्षक पोलिस तेसुद्धा नाकर्मी झालेत. माणसाने तर माणुसकी सोडली आहे. इथे आता दिल्ली म्हटलं कि कोणीही सांगतं, जिथे अत्याचाराला सीमा नाही ती दिल्ली.

माझ्या बांधवानो आता तरी जागे व्हा. अत्याचाराला आळा घाला. तुमच्या या मातेची तुमच्याकडे एकच मागणी आहे कि या भारत भुमी ला असे बदनाम करू नका. तुम्ही सारी माझी लेकरे आहात मग जर मी तुमच्यात कधी भेदभाव करत नाही, मग तुम्ही का करता. माणसा सारखे वागा, जनावरासारखी प्रवृत्ती सोडून द्या आणि शांतीने, प्रेमाने जगा, एवढीच इच्छा आहे. माझी या वेड्या आईची मागणी पुरी करा मुलांनो , विनंती आहे या या वेड्या मुलीची.

जय हिंद जय भारत

रविंद्र मनोहर सावंत

— कुमार.रविंद्र मनोहर सावंत उर्फ रवि

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..