नवीन लेखन...

एका असामान्य जिद्दीची कहाणी

मार्ग जितका काटेरी, यश तेवढेच उत्तुंग’ असा यशाचा मूलमंत्र सांगणार्‍या धीरुभाई अंबानी यांच्या वाटचालीत अनेक अडथळे आले. पण, या प्रतिकूलतेवर त्यांनी कशी मात केली, हे सांगणारं ‘प्रतिकूलतेवर मात’ हे पुस्तक मेहता पब्लिशिग हाऊसने प्रकाशित केलं आहे.
‘विचारांचे भव्य इमले उभारा, निराळ्या पध्दतीने विचार करा, जलद गतीने विचार करा, काळाच्या पुढचा विचार करा, सर्वोत्तमतेचं ध्येय ठेवा’ हे धीरुभाई अंबानी यांनी अनुसरलेलं कॉर्पोरेट तत्त्वज्ञान होतं. या तत्त्वज्ञानाच्या आधारावर त्यांनी गुजरातधील एका छोट्या खेड्यापासून रिलायन्स उद्योगसमूहापर्यंतचा व्यापक पल्ला गाठला. ही वाट अनेक अडचणींनी व्यापली होती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी ही वाटचाल केली आणि जगापुढे आदर्श उभा केला. या यशोगाथेचा विचार करताना त्यांनी प्रतिकूलतेवर नेमकी कशी मात केली हे उलगडवून दाखवणारं ‘प्रतिकूलतेवर मात’ हे पुस्तक मेहता पब्लिशिग हाऊसने प्रकाशित केलं आहे.
‘मार्ग जितका काटेरी, यश तेवढेच उत्तुंग’ हे सूत्र सांगणार्‍या धीरुभाई अंबानी यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या शौर्याची, अथक प्रयत्नांची आणि उमेदीची विलक्षण कहाणी या पुस्तकातून वाचायला मिळते. धीरुभाईंचे सुपुत्र मुकेश अंबानी यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली असून मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. ‘ प्रतिकुलता असूनही, किशोरवयीन स्वातंत्र्यसेनानी, संपूर्ण विश्वास-एक जीवनमार्ग, आव्हानं, अशक्य ?- ते काय असतं ?, विशालहृदयी नेता आदी टप्प्यांमधून धीरूभाईंचे नेमकं व्यक्तिमत्व उलगडतं. धीरूभाईंनी म्हटलं होतं, ‘आपण स्वप्न बघण्याचं धाडस केलं पाहिजे आणि तेसुद्धा भव्य स्वप्न बघण्याचं.’ हे स्वप्न त्यांचे दोन्ही सुपूत्र आज अंमलात आणत आहेत. या संपूर्ण परिवाराने अशा ठरावीक गृहितकांवर अढळ श्रद्धा ठेवत मिळवलेलं यश आवर्जून तपासून पाहण्याजोगं आहे. ‘ही आहे आम्ही पाहिलेल्या एका आश्चर्यकारक, दंतकथेसारख्या व्यक्तिमत्त्वाची स्फूर्तिदायी कथा’ अशी सुरुवात करत मुकेश अंबानी यांनी प्रस्तावना लिहिली आहे. खेड्यातील एका शाळा शिक्षकाच्या पोटीजन्मलेल्या माझ्या पित्याने अंगभूत साहसी वृत्तीच्या जोरावर विषमतेच्या शृंखला तोडण्यासाठी संघर्ष केला. मी त्यांच्याकडून शिकलो की यश व समृध्दीच्या वलयात नम्रता हा सर्वश्रेष्ठ गुण असतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचा सामर्थ्यस्त्रोत म्हणजे अविचल मनोधैर्य राखणं होय. ही गोष्ट त्यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते, असं मुकेश अंबानी यांनी प्रस्तावनेत नमूद करण्यात आलं आहे.
या पुस्तकाचे लेखक ए. जी. कृष्णमूर्ती यांना धीरुभाईंचा दीर्घकाळ सहवास लाभला होता. त्यामुळे धीरुभाईंच्या व्यक्तिमत्त्वातील असंख्य पैलू त्यांनी जवळून अनुभवले आहेत. प्रत्येक माणसाला पहिला विजय मिळवायचा आहे तो स्वतःवर, हे धीरुभाईंनी आपल्या जीवनप्रवासातून दाखवून दिलं. धीरुभाईंच्या कारकिर्दीच्या क्रमानुसार या पुस्तकातील प्रकरणांची रचना करण्यात आली आहे. धीरुभाई आणि रिलायन्सचं यश इतकं अपूर्व आहे की बर्‍याच लोकांना त्यांच्या संपत्तीच्या झगमगाटापलीकडचं पाहताच येत नाही. धीरुभाईंचं यश हा बागेतला फेरफटका नव्हता तर कष्टसाध्य यश या शब्दप्रयोगाला त्यांनी दिलेला सर्वस्वी नवा आयाम आहे. मार्गामध्ये किती का आव्हानं उभी राहोत, आपण आपल्या मार्गाने अविरत चालतच रहायचं. मग एक दिवस यश तुमच्या हातात येतंच, हा संदेश धीरुभाईंनी आपल्या वाटचालीतून दिला. त्याचीच कहाणी ‘प्रतिकूलतेवर मात’ या पुस्तकातून साकारली आहे.प्रतिकूलतेवर मात

लेखक : ए. जी. कृष्णमूर्ती
अनुवाद : सुप्रिया वकील
प्रकाशक : मेहता  प्रकाशन
किमत : ७० रुपये

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..