नवीन लेखन...

इस्लामी जगाची चित्रे

   [ccavlink]book-top#nachiket-0006#२३५[/ccavlink]

सुप्रसिद्ध लेखक श्री. ज. द. जोगळेकर यांच्या परिश्रमातून साकारलेले नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेले इस्लामी जगाची चित्रे हे पुस्तक म्हणजे सर्व सामान्य वाचक आणि इस्लाम व इस्लामी राजकारणाचे अभ्यासक यांच्यासाठी एक माहितीचा अभ्यासपूर्ण खजिनाच आहे.

भारतीय आणि जगाच्या संदर्भात इस्लाम ची प्रतिमा, स्वरूप आणि आक्रमक राजकारण हे नेहमीच चर्चेचे, कुतुहलाचे आणि संदेहाचे विषय राहिले आहेत. सुमारे 1400 वर्षांपूर्वी अरबस्तानात उदयास आलेल्या या नवीन पंथाच्या आक्रमक, साम्राज्य विस्तारवादी आणि धर्मप्रसारवादी धोरणाचा फटका जगातील अनेक संस्कृतिंना बसला. इराण, स्पेन, इराक, इजिप्त आदी देशांचे इस्लाममुळे सांस्कृतिक, धार्मिक आणि कट्टरवादी राष्ट्रात रूपांतर झाले हा इतिहास आहे. इस्लाममधील जिहाद, काफीर इत्यादी कल्पना भोवती एक गूढतेचे वलय गुंफले गेले आहे. त्यातच अलीकडे बोकाळलेल्या जिहादी दहशतवादाने आणि अमेरीकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याने संपूर्ण जगाचे लक्ष इस्लामने वेधले आहे. अनेक पाश्चात्य लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला इस्लामविषयी आपापली मते मांडू लागली आहेत. या सर्व लेखांतून 21 व्या शतकातील इस्लाम कसा असेल याची कल्पना येते. श्री जोगळेकरांनी यातील काही निवडक लेखांचा परामर्श घेत भारतीय, विशेषत: मराठी वाचकांना एक माहितीचा ठेवा उपलब्ध करून दिला आहे.

इस्लाममध्ये दोन अवधारणांचा मागोवा सापडतो. एक विचारधारा इस्लाम हा शांतीचा, प्रेमाचा, बंधुत्वाचा संदेश देणारा विचार आहे असे मानते तर या उलट इस्लाम म्हणजे परमेश्वराप्रत नेणारा एकमेव मार्ग आहे, त्यामुळे सर्व मानव समाजाला इस्लामच्या पंथात आणणे आवश्यक आहे, असा टोकाचा असहिष्णु विचार करणाऱ्यांनी जगाची विभागणी दारूल इस्लाम आणि दारूल हरब अशा दोन भागात केली आहे आणि दारूल हरब चे रूपांतर दारूल इस्लाममध्ये कसे व किती लवकर करता येईल याचा विचार व त्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न व मार्ग अवलंबिण्यात येतात.

तलवारीच्या जोरावर इस्लामचा प्रचार व प्रसार अनेक देशात झाला हा इतिहास सर्वांना माहिती आहे. एके काळी अरब आणि तुर्की साम्राज्यांचा मोठा दबदबा होता पण नंतर मात्र इस्लामी जगात अनेक राष्ट्रे उदयास आली. राष्ट्रवाद, समाजवाद आणि मार्क्सवादाचा प्रभाव इस्लामवर पडला आणि अलीकडे दहशतवादाच्या विळख्यात इस्लामचे तत्वज्ञान सापडले आहे. 1928 मध्ये मुस्लिम ब्रदरहूड या दहशतवादी संघटनेची स्थापना झाली तेव्हापासून तो सध्याच्या तालीबान आणि अल-कायदापर्यंत हा इस्लामी दहशतवादाचा प्रभाव आणि परिणाम सारे जग भोगते आहे.

लेखकांनी इस्लामची वैचारिक चित्रे, सुधारणावादी चित्रे आणि जगभरातील चित्रे अशा तीन भागात या पुस्तकातील विषयवस्तुचे विभाजन केले आहे. जिहाद चे आकर्षण, इस्लामी नेतृत्वाची अगतिकता, पैगंबराच्या व्यंगचित्रावरून निर्माण झालेला गोंधळ, इस्लामी वैचारिक जगतातील आंतरिक स्फोट अशा अनेक विषयांना स्पर्श केला आहे. डॉ. व्हफा सुलतान या मुस्लिम विदुषी चे विचार या पुस्तकात नोंदविले आहेत ते असे: ङ्कआमचे लोक (मुस्लिम) स्वत:च्या श्रद्धा नि शिकवणूक यांचे ओलिस (केीींरसश) झाले आहेत. ज्ञानामुळे जुनाट विचारातून माझी मुक्ती झाली. चुकीच्या श्रद्धातून मुसलमान लोकांची कोणी तरी मुक्ती केली पाहिजे.”

“दि लिगसी ऑफ जिहाद” या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा संदर्भ देत श्री जोगळेकरांनी इब्न बराक यांचे विचार दिले आहेत ते इस्लामी जिहाद म्हणजे काय यावर चांगलाच प्रकाश टाकणारे आहेत. “मुस्लिम समाजात पवित्र युद्ध (केश्रू थरी) हे धार्मिक कर्तव्य आहे. कारण मुसलमानांचे ते जागतिक मिशन आहे. मन वळवून किंवा सक्तीने सर्वांचे इस्लामीकरण करण्याचे दायित्व त्यांच्यावर आहे. सर्व राष्ट्रांवर प्रभुत्व मिळविण्याचे इस्लामवर दायित्व आहे.” आजही अल-अझहर, नगाफ आणि झासटोन या विद्यापीठातील विद्याथर्यांना जिहाद हा गैर मुसलमानांविरूद्धचा कायदेशीर आदेश आहे आणि जगाच्या अंतापर्यंत तो चालू राहील अशीच शिकवण दिली जाते.”

इस्लामाबादच्या कायदे आझम विद्यापीठात न्यूक्लीयर फिजीक्सचे प्राध्यापक परवेझ हुडबॉय यांचा “ग्लोबल अजेंडा” त 2006 साली प्रकाशित झालेल्या लेखाचा संदर्भ देत पाकिस्तानात उच्च शिक्षणाची कशी हेळसांड होत आहे याचे विदारक चित्र लेखकांनी उभे केले आहे. इराकमधील ख्रिश्चनांची होणारी ससेहोलपट, बुरख्यावरून युरापीय देशात निर्माण झालेला वाद, लंडनमधील बॉम्बस्फोट आणि अतिरेक्यांचा तेथील तळ, देवबंदच्या शिकवणुकीचे परिणाम ही प्रकरणे मुळापासून वाचण्याची आणि अभ्यासण्याची आहेत. देवबंद हे नाव देवीबन या हिंदु शब्दापासून कसे तयार झाले याचा मागोवा घेत हिंदू संस्कृतिचा हळूहळू मुस्लिम मनावर होणारा प्रभाव कमी करण्यासाठी देवबंदचा कसा उपयोग 18 व्या शतकात शाह वलीउल्लाह याने करून घेतला, सूफी संप्रदाय हिंदुमध्ये लोकप्रिय असल्याने त्याविरूद्ध देवबंदी कसे उभे राहिले याचे वर्णन यात आढळते. “धर्मावरची श्रद्धा उडाल्याने व मुसलमानी समाज हिंदू रितीरिवाज पाळू लागल्याने ब्रिटिशांचे राज्य आले.” अशी अनेक उद्‌बोधक वाक्ये ठायी-ठायी या पुस्तकात आढळतात.

श्री जोगळेकर आज 90 च्या घरात आहेत. याही वयात त्यांचा व्यासंग, अभ्यासाची तयारी आणि लेखनाचा उत्साह दांडगा आहे याची जाणीव हे पुस्तक वाचल्यावर होते. लेखकाने हा ग्रंथ पांडित्यपूर्ण नाही, असे विनयाने म्हटले असले तरी त्यांचा या विषयावरील अभ्यास व व्यासंग यातून निश्चितच अभिव्यक्त होतो यात शंकाच नाही. 

नचिकेत प्रकाशन चे श्री. अनिल सांबरे यांचेही अभिनंदन करणे समयोचित ठरेल कारण एका महत्वपूर्ण विषयावरील अभ्यासपूर्ण पुस्तक त्यांनी मराठी वाचकांना उपलब्ध करून दिले आहे. इस्लामी जगतात काय सुरू आहे, कोणत्या दिशेने वारे वाहत आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

इस्लामी जगाची चित्रे

श्री. ज. द. जोगळेकर

नचिकेत प्रकाशन, नागपूर – 440015

ISBN : 978-93-80232-53-9, 

मूल्य :रू.२२०/- फक्त

[ccavlink]book-bot#nachiket-0006#२३५[/ccavlink]

— श्री.अनिल रा. सांबरे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..